शके १६७२ आश्विन
+ + सावंतसिंग व ठिला मोदी व पुरोहित जगन्नाथ व शेरसिंगजीचा पुतण्या एसे सदरांकडे जायानिमित्य हजार स्वारांनिसी येऊन दीपावळीस येथें पावलें. श्रीजीची भेटी हि घेतली. किशनकुंडावर सर्व उतरले आहेत. श्रीजीसी लागूं आहेत कीं, एखादा भला माणूस आपल्याकडून हि समागमें देणें. त्यासी, येथून कनहीरामजीस पाठवायाची तजवीज ऐकिली जाते. परंतु कन्हीरामजी ह्मणतात की, विना पंडिताचे रजाबंदीखेरीज माझ्यानें कसें जावतें. त्यासी,
पहावें, कसे तजवीजीनें व सरंजामानें कोण जातो. जरी रजावंदीने घेऊन जाईल तर त्याजबराबरी जाणें नाहीं तरी त्याजबराबरी जावें हें माझी तजवीज आहे. यासी जे सलाह हौलत असेल ते स्वामींनी आज्ञा करावी, की तदनुरूप वर्तणूक केली जाईल. राजश्री नारोशंकर यानी झांशीहून बाळाजी टोका याजबराबर खजाना साडे आठ लक्षांचा पाठविला होता तो बर्हानपुरच्या सुभेदारानें उतरून घेतला, व बाळाजी टोक्यासी धरून कैद केलें, व शहरच्या सुब्यानें पेशखाना बाहेर उभा करविला. व श्रीमंत स्वामीनीं हि डेरा दसर्याचे मुहूर्ते बाहेर केला. उभय पक्षीं निगादास्त फौजबंदी ज्यारी आहे. व जानोजी निंबाळकर श्रीमंतासमीप पुण्यासी गेले. पेशवे जाऊन घेऊन आले. बहुत सन्मानेकडून ठेऊन घेतलें आहे. व मोरोपंत हे हि नवाबासी रुसूद करून ++ बाराहून अन्य ठिकाणीं जाऊन निराळे बसले. ताराबाईनीं रघोजी व फत्तेसिंग व दमाजी गायकवाडाकडील सूत्र तुर्काकडे लाविलें आहे. दमाजीगायकवाडाचा पुत्र नवाबासमीप शहरीं आहे. विठ्ठल शिवदेव व पवार वरकड सरदार जे गुजरातेकडे मार्गस्त जाहाले होते ते नाशिकापावेतों येऊन पावले असतां, मागती या गडबडीनें श्रीमंतासमीप परतून गेले. व दमाजी निघाला ह्मणून जे वदंती उडाली होती ते सर्व इष्कल आढळली. या गडबडीकरितां सरदारांस हि बोलाविले आहे. त्याजवरून मकारनामकाची वासना तुर्त रोहिल्याकडील मामिला फैसल केल्या विरहित परतायाची दिसत नाहीं. व जकारनामक जाऊं ह्मणतात. व पलबंदी हि पार उतरायाची होऊन वजिराकडे फरखाहंदचे रुखें कुच सरदारांहीं केलें. वजीर हिकडे माणिकपुराहून येणार, भेटी उभयपक्षीं जाल्यावर, पहावें, कोणीकडील रुख करितात ? हें तो सर्व हि स्वामीसमीप तथ्य लिहिले. श्रीमंत दादासाहेब व नानासाहेबाचे येत असेल ते खरें ! परंतु, इकडील वर्तमान जे कांहीं ऐकण्यांत आले ते निवेदनार्थ विनंति केली असे. हरि गोविंदजी सुटले. पांचांची निशापात ग्रहस्थांची परभारे जाहाली. त्याजमुळें जकार याजकडील गृहस्थांन विषम मानून त्याजपावेतों लिहिलें होतें. त्याजवरून आह्मांला हि ताकीद येऊन पावली कीं, सर्व हि मिळोन वर्तावें. कदाचित् निराळे निराळे वर्तणुक करावयाची कामाची गोष्ट नाही. तर यासी माझी का--