Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
पु ८२/१
॥ श्री॥
शक १६६९ आषाढ शुद्ध ६
राजश्री पिलाजी जाधवराउ गोसावी यासीः-
.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥
बालाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद. सुहुर सन समान अर्बैन मया व अलफ. तुह्मीं के॥ पुण्याचे मुकामीं हुजुर येऊन विनंती केली कीं, वसईचे मसलतेस आपण श्रम साहास करून स्वामीसेवा केली. याजकरितां प्रांस मजकूरी कांहीं नूतन इनाम करून दिल्हा पाहिजे, ह्मणोन. त्यावरून मनास आणून तुह्मांवर कृपाळू होऊन मौजे साडारे ता। अगर वसई पा। सायेवान पैकीं इनाम वाडी बनाम मठी पाखाडी बु॥ बिघे ७ १॥ सात बिघे दीड पांड पैकीं वजा बितपसील:-
बावखळ पांड पाच वाडीचे कुडणाखाले चौफेर घेरी-
.।. यास व पाटाखाले व झाडोर्याचे
घरें वाडवळांची ३ तीन. सायवट वगैरे पांड दाहा.
८२
----
२
एकूण जमीन पांड साडेसहा .॥.
पांड .।१॥.
एकूण एक बिघा दीड पांड. बाकी जमीन बिघे ६ सहा. यांत लागवड बागायत झाडोरा बि॥:-
नारळीचे देडवांपैकी सुपारीचीं झाडें ५.
वजा देड. गैर बारदार.
७ गैरबारदार. फणस ढाला उतार १.
२ उमेदवार. आंबे झाडें ८ पैकीं वजा०
३ झिटे. बाकी ----------- सुमार.
१० रोपे. ८
बाकी बारदार.
६२
एकूण आकार देखील जमीन व झाडझाडोरा मक्ता पाचवे सालची भर बेरीज रुपये ४० चाळीस व घरपटी वाडवडळांची घरें ३ एकूण रुपये ५ पांच एकूण रुपये पंचेतालीस रुपयांची वाडी सदरहू प्रमाणें कुलबाब, कुलकानू, हालीपटी, व पेस्तरपटी, खेरीज हेकदार, तुह्मांस इनाम करून दिल्हा असे. तरी सदरहू वाडी आपले दुमाला चतु:सीमापूर्वक करून घेऊन, तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें इनाम अनुभवून सुखरूप राहाणें. जाणिजे छ ४ रजब. बहुत काय लिहिणें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्रीशंकर.
पै॥ छ २१ रबिलावल.
शके १६६९ अधिक चैत्र शुद्ध १४.
राजश्रियाविराजीतराजमान्यराजेश्री बापू व राजश्री दामोधरजी स्वामीचे सेवेसीः-
पो। लक्ष्मण शंकर सा। नमस्कार विनंती उपरी येथील वृत्त अधिकचैत्र शुध १४ मु॥ अमरपुर स्वामीचे कृपेकरून यथास्थित असो. विशेष. बहुत दिवस झाले पत्र पाठवून परामर्ष न केला, हें उचित नव्हें. कैलासवासी महादेवभट्टभाऊ आम्हांवरी कोणेप्रकारें कृपा करीत होते हें तुम्ही जाणत असतां आम्हांवरी निष्ठुरता झाली आहे. तुमचा उत्कर्ष ऐकोन परमसमाधान होत आहे. आम्ही सर्व प्रकारें तुमचे पदरचे जाणोन सदैव परामर्ष करीत असावें. लष्करासमागमें सरदेपर्यंत गेलो होतों. येथून रा॥ उभयतां सरदार व रा॥ बाबास्वामींनीं आह्मांस इकडील पारपत्यास ठेविलें आहे. इकडील कार्यभागाचा बंदोबस्त जेष्ठ आषाढपर्यंत लागतो करून श्रीयात्रेस सडे जावें ऐसा निश्चय आहे. स्वामींनी पूर्वी दस्तकें त्रिस्थलीची पो। होती. परंतु बुंधेल्याचें बेमानास्तव जाणें न जालें. प्रस्तुत लि॥ प्र॥ इकडील कार्यभाग नेमस्त करून जावें हे मानस आहे. याकरितां कृपा करून त्रिस्थळीचीं साहित्यपत्रें व दस्तकें घेऊन, माणसें, पडदाळें, पालखी समागमें जितका यात्रासमुदाय येईल इतकियांचा उद्धार करून यात्रेचीं साहित्यपत्रें पाठऊन यात्रा सुरक्षीतपणें होऊन येतें केलें पा।. पदरचें जाणोन ममतेस अंतर न करितां सदैव सांभाळ करावा. आपला कुशलार्थ निरंतर पत्रद्वारें पाठवीत जावें. बुंधेलखंडची मजमूची नेमणूक आहे, हें कोणाजवळी प्रविष्ट करावी हें लिहिलें पाहिजे. कृपा असों दीजे. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४१
श्री
श्रीशिवभक्तीपरायण तपोनिधी भवानगिरी गोसावी यास प्रती राजश्री राजा शिव छत्रपती उपरी तुह्मी पत्र पाठविले तें पावले मौजे इडमिडे प्रांत वाई हा गाव अन्नछत्रास स्वामी चालवितात ऐसे असता गावाकडे सात पाचा वर्षाची बाकी १८ खडी पावेतो आहे त्याचा निर्वाह गावकरी करून देत नाहीत चौ खडीचे पेव चोरानी नेले त्याची निसबत चौगल्याकडे लागली आहे परतु तो कथळा करितो बोलाउ पाठविल्याने आपणाकडे देत नाही साप्रत हुजूर गेले आहेत ऐशीयास आह्मी स्वामीसनिध दतगिरी गोसावी व त्र्यबक जिवाजी पाठविले आहेत हे वर्तमान विदित करितील ते मनास आणून पारपत्य केले पाहिजे ह्मणून लिहिले ते कळो आले व दतगिरी गोसावी व त्र्यबक जिवाजी हुजूर आले याणीही निवेदन केले ऐशीयास मौजे मजकुरचे पाटील कुलकर्णी हुजुर आलेयाचे वर्तमान मनास आणिता गावीचा हिशेब कितेब मनास आणून निर्वाह करावा लागतो याकरिता पाटील कुलकर्णी व चौगला यास राजश्री जगजीवन नारायण देशाधिकारी प्रात वाई याकडे पाठविले आहे तरी तुह्मीही त्याजकडे जाणे ह्मणीजे ते मौजे मा।रचा हिशेब कितेब मनास आणितील व बाकी कोण्हेबाबेची कैसी वोढते हे रुजु मोझ्याने खरेखुरे करितील आणि तुह्मास मागतील तेणेप्रमाणे तुह्मी उसूल घेणे जाजती तगादा येकजरा न लावणे पेव चोरानी नेले याचा करीना मनास आणिता चौगला ह्मणतो की आपण चोर दाऊन देतो त्यास चौगला ज्याणे पेव काहाडून नेले आहे त्यास दाऊन देईल त्याजपासून तुह्मी आपल्या गल्याचा निर्वाह करून घेणे चौगल्यास उपसर्ग न लावणे पेवाच्या कथळ्यामुळे त्याजपासून जे घेतले असेल ते मजुरा देणे वरकडी मठाकडे बाकी वोढते त्याचा निर्वाह जगजीवन नारायण रुजू मोझ्या हिशेबकितेब पाहोन विलायतशर्तप्रो। विल्हे करून देतील ते खाणे जाजती तगादा गावास एकंदर (पुढे लिहिले नाही)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री. ॥
शके १६६८
श्रीमंत महाराज मातुश्री आई साहेबाचे सेवेशी.
विनंती सेवक बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना सेवकाचे वर्तमान ता + + + + पर्यंत साहेबाचे कृपावलोकनें करून यथास्थीत असे. विनंती वगैरे. साहेब आपले सनदेनें राजश्री गोविंद खंडेराव चिटनवीस यास दिल्हें. असें असतां कोल्यावर राजश्री जगजीवन पंडित जाऊन मोर्चे लाविले आहेत. मशार निलेची मुलें माणसें ते जागा. केवळ त्यांचे आबरुवरच उठावें, हें त्यांस उचित नव्हे. ते साहेब धनी आहेत. साहेबाचे हुकमाखेरीज कोण आहे ? उत्तम पक्ष, मशारनिलेकडे ठाणे आहे, तैसे असों द्यावें. सेवक हुजूर येऊन ते समयीं साहेब आज्ञा करतील, त्याप्रमाणें वर्तणूक करून. गोविंदराव राज्यांतील सेवक काहीं मवास नव्हे. साहेबीं ठाणें द्यावयाची आज्ञा केली तरी आह्मी ठाणे देऊं. अन्यत्राप्रमाणें त्याची इजत घ्यावी असें नाहीं. ठाणें मशारनिलेकडे येऊन पंडीत मशारनिलेकडे मातबर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ॥
पु॥ ८८
शक १६६८
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यासीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥
बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद. सु॥ सबा अर्बैन मया व अलफ. राजश्री इंद्रोजी कदम वेसावियास आहेत. त्यांस हिंदुस्थान प्रांतीं पाठवावें लागतें. याजकरितां फौजसुद्धां हुजूर आणविले आहेत; ते हुजूर येतील. त्यांचे मोबदला नामी सरदार तेथें खबरदारीकरितां ठेविला पाहिजे. यास्तव राजश्री मानाजी पायगुडे यास, तेथें जाणें ह्मणून लिहिलें आहे. तरी मानाजी पायगुडे यांस पत्रदर्शनीं वेसावियास पाठवून देणें. बहुत काय लिहिणे ?
( लेखन सीमा )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ॥
शके १६६८ पौष शुद्ध ८
चिरंजीव राजश्री सदोबा यांसी बाळाजी बाजीराव आशीरर्वाद उपरी येथील कुशल ता। छ ७ जिल्हेज जाणोन स्वकीये कुशल लिहीत जाणें. विशेषः- राजश्री स्वामींनी सौ॥ मातुश्रीबाई साहेब यांज कडील रवानगीचे लाखोटे ४ च्यार दिल्हे ते पाठविले असेत, ते त्यांस पावते करावे. सौ॥ मातुश्री बाईसाहेब सातारां कधीं येणार? काय विचार केला आहे ? मुकाम कोठें कोठें नेमले आहेत ? तें लिहिणें. श्रीपत रायाची बहुत करून समजाविसी जाहलीच आहे. माघारें मात्र यावयाचे आहे. येतील. आजचे नवल विषेश वर्तमान ल्याहावया योग्य नाही. हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ।।
पु ८३
शक १६६८ आश्विन शुद्ध ३
० श्री ॅ
राजाशाहू नरपति हर्ष-
निधान बाळाजी बाजी-
राव मुख्य प्रधान.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यासीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य --स्ने॥
बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद. सुमासबा अर्बैन मया व अलफ. तुह्मीं, राजश्री महादोबा यांस पत्र लिहिलें, त्यांत बंदिवानाचे मुक्ततेविसीं लिहिलें, तें कळलें. ऐशास, येविसीं लिहिणें तें राजश्री अंताजी नारायण यांस लिहिलें आहे. तुह्मीं आपला कारकून त्यांजपाशी पाठवून देणें. बंदिवानाचा झाडा काढून लिहितील, तदनरूप मुक्त करणें तें केली जातील. जाणिजे. छ २ रमजान. * बहुत काय लिहिणें ?
(लेखन सीमा)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४०
बदरदीन साहबासी
दरबदगी हजरत आज दिवाण पा। वाई
साहेब सदर दाईमदौलतहू
.ll आर्दास अज बंदगी बादे कमीन कमतरीन बंदेगानी बंदेसनीकर मुलाजी पा। व आताजी पा। मोकदम मौजे नीब पा। मा। जमेपाशे अर्दास झा ता। छ १ माहे जमादिलाखर साहेबाचे नेकनजरे करून कमीनाचे बखैर सलाबत असे इ॥ मौजे मजकुरी इनाम चावर नीम आहे व मौजे गोवे चावर नीम आहे हा लंगरखाना दसनामाचा आहे यास महतकदम सालाबाद कोण्ही वजीरानी अगर हरकोन्ही येत होते त्यानी या इनामास जरासे तसवीस दिल्हे नाही व रुका घेतला नाही व वाकडे नजरेने पाहिले नाही हा थोर जागा आहे थोरले खान साहेब होते ते ए जागा दोनी च्यारी मोर्तब
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ॥
नकल
शके १६६८ श्रावण शुद्ध १३
राजश्री गोविंदराव चिटणवीस गोसावी यांसि
सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य रा॥ दमाजीराऊ गायकवाड राम राम विनंती येथील कुशळ जाणून स्वकीये कुशललेखन करीत असावें विशेष. सातार मुकामी. सर्व बोलणें जाहलें आहेच. असें असतां चिरंजीव मुलास आधार मिळून आपला आहे. गुजराथप्रांतीं पोहोंचलों ह्मणजे बोलण्याप्रमाणें तजवीज करितों. चिरंजीव आपले जवळ ठेवून बरदास्त ठेवावी. आपले असामीवर कारकून पाठवावा. करारा प्रमाणें नेमणुक चालवीन व पागा आली तरी बंदोबस्त राहील. नेम ठरला. खासा आला असतां पंचवीस हजार व पागेस येकवीस हजार व कारकुनांस पांच हजार ऐकूण एकावन हजार देत जाऊ. यास अंतर करणार नाही. दरबारचे काम काजाचें बोलणें सर्व आपणाकडे मन मोकळेपणानी ही सरदारी आपली समजून जे करणें ते करावें. मी आपल्याशी शफतपूर्वक आंतर करणार नाहीं. वारंवार काय ल्याहावें ? चिरंजीव आपणासी मजकूर समजावितील त्यावरून ध्यानास येईल. रा। छ ११ रजब बहुत काय लि॥ हे विनंती.
पो। छ १७ रमजान सन सबा आर्बैन मयावआलफ
संवत १८०३
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ॥
शके १६६७
सुहरसन सात अर्बैन मया व अलफ.
आह्मी चाळीस वर्षे गांव टाकून गेलों. ते समयीं कारकीर्द तुकोजी भोसले, हवलदार किले पांडवगड, यांनी बोपर्डीवर तोहमत ठेऊन, पाटील कुळकर्णी गडास नेऊन, खंड घेतला. त्यापै॥ कुळकर्णाचे वाटणीचे रु॥ २२३ ऐवज तुह्मी दिल्हे. दसरोजी पाटील यांनीं कजिये खोकले करून, चांदकच्या थलास गावकर तुह्मी जाऊन, त्यांचा पैका गावसमंधें करार केला. त्याची तिजाई तुह्मावरी पडली. ते रु॥ तुह्मी व नरसीपंत यांनीं दिल्हे. आनंदराव पुडदुलखानी यानें गावची पाहणी करून, पडची वहितें करून, हिशेब करून, गावची उगवणी करून घेतली. त्यापै॥ रुपये १२४ एकशे चौवीस तुह्मांपासून घेतले. व किरकोळथोडे बहुत पडले आहे ह्मणता. त्यास, आपण गावांत सोध करून, खरें जें असेल, त्याचा विभाग निम्मे बापभाऊ वजा करून, व निमे तुह्मी, आह्मी, व रा॥ मल्हारपंत ऐसे तिघेजण भाऊ, आपले वाटणीस येईल तें, त्याची निशा करूं. सदरहु तीन कलमाचे रु॥ व दसरोजी यानें तुमचीं घोडी व रा॥ नरसोपंत यांचे पेंव काढून नेलें. त्याचा सोध करून सर्व तकशीमेचा तुह्मा देऊन. त्याचे कतबे सिधभट ढवळेकर यांचे नावाचे रा॥ नरसीपंत व रामाजीपंत याचे कतबे व हिसेबाची तबलख होती ती राजकादेवकांत गमाविली.