Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४७
श्री
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री देशमुख व देशपांडीये पा। सुपे गोसावी यासि
स्नेहांकित दत्ताजी राम वकील व माणकोजी गोविंद आशिर्वादपूर्वक नमस्कार विनंती उपरी येथे आनंदगीर गोसावी याचा एक सिस्य रा। खंडोजी राजे भोसले याचे खुर्दखत निजामशाहचे वेळचे घेऊन आला आहे त्याचे विशई आह्मास रा। रौद्रराव यानीही सागितले आहे तरी आनदगीर याचा इनाम मौजे मुजेवाडी पा। मजकूर येथे चार चावर तहकीक आहे भोगवटा पडिला आहे ऐसे तुह्मास तहकीक ठाऊक असले तुह्मी वतनदार आहा तहकीक करून एक अर्जदास्ती रा। राऊसाहोस पाठवणे व एक पत्र आह्मास लेहून पाठवणे आपणही रा। राऊसाहेबास लिहिले आहे त्याचे आज्ञापत्र येईल तेणेप्रमाणे वर्तणूक करणे तोवरी गोसावी गावावरी लावणी करील तरी सुखे करू देणे जरी इनाम चालवा ह्मणऊन आज्ञा आली तरी चालवणे पत्र नये तरी लावणीप्रमाणे वसूल घेणे जैसी हकीकत असल तैसी बयानवार लेहून पाठविणे रा। छ १३ माहे रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ॥
शके १६७१ फाल्गुन.
चिरंजीव राजश्री पुरुषोत्तम महादेव यास दामोदर महादेव आसीर्वाद. उपरी. नबाब वजीराचा मुकाम बदाऊवर शष्टीस बुधवारीं आहे तेथेंच सुभेदार मार्गप्रतीक्षा करतील. सुभेदाराची भेट जालियावर जें करणें तें करतील. मुलकाचा बंदोबस्त व पाहाडांत जाऊन पठाणरोहिल्यास मारायाचा विचार करतील. पठाण रुद्रपुरास पावले ++++ पाव वगैरे नबाबाचे फौजेसुद्धां बदाऊ जवळ आहेत. कळले पाहिजे. हे आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ॥
शके १६७१ मार्गशीर्ष वद्य २
* राजमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांसी आज्ञाजे. राजभार तुह्मी चालवाल हा भरवसा स्वामीस आहे. पहिले सांगितले खातरजमाती चिटणिसांनी असेल केली. तुमचे मस्तकीं हात ठेविला आहे. वस होईल. तो तुमचे पद प्रधान चालवील. अंतर तर शफत असे. त्यांचे आज्ञेंत चालन सेवा करन. राज राखन बहूत काय लिहिनं. सुदन असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्रीकाशी
शक १६७१ कार्तिक वद्य ४
तालिक
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ७५ शुक्लनाम संवत्सरे कार्तीक वद्य चतुर्थी गुरुवासरे श्रीक्षेय कुलावतंस श्रीराजा शाहूछत्रपती स्वामी यांनी वेदशास्त्रसंपन्न श्रीक्षेत्र प्रमुख समस्त क्षेत्रस्थ वैदिक पंडित ब्राह्मण यास परभू याजक ब्राह्मणाविषयी निर्णयपत्र करून दिल्हें ऐसे जे सप्तऋषीहून बावाभट्ट आठल्या याणें परभूजातीय साक्षाद्राह्मणद्वारावा वैदिकादिककर्मानधिकारी असाधारण लिपिलेखन वृत्युपजीवी बाबूराव परभू यास श्रीयात्रेस नेऊन तेथें परभूस वैदिककर्मार्थ सकळ पंडित लोभ दाखवून प्रार्थिले. तथापि त्याहीं निषेधे केलियानंतर श्री प्रयागीं जाऊन वेदमूर्ति नारायण दीक्षितप्रभृति शिष्ट ब्राह्मण निषेध करीत असतां तेथील हाकीमाचे बळानें प्यादे बसवून परभूचें होमातिरुद्राख्य वैदिककर्म करवून सप्तऋषीस आला. कर्माचे आचार्यादि ऋत्विग्व तत्संसर्गी श्रीस गेले त्यांचा श्रीस्थ समस्त वैदिकपंडिताही बहिष्कार करून बावाभट्टादिकांचे बहिष्कारार्थ सप्तऋषीस पत्रे पाठविली त्या पत्रावरून व यात्रिक शिष्टजनमुखेंही निर्णय करून बावाभट्टादिकांचा सप्तऋषिस्थ माहुली संगमप्रभृति समस्त क्षेत्रस्थद्विजमंड + बहिष्कार + लीने केला. त्यानंतर श्रीमध्यें परभू याजक कृष्ण दीक्षित देवधर व बाबाभट्टाचा बंधु यज्ञेश्वरप्रभृति याहीं अनेक उपद्रव करूनही राजा नवलराय यांजवळ फिर्याद होऊन चोपदार पाठवून श्रीस्छ ब्राह्मण नेले. त्यामध्यें राजा नवलराय याही दाहा दाही ब्राह्मण हे कर्म सत्य किंवा मिथ्या ? ब्राह्मण सत्य भाषी वा मिथ्या भाषी हा निर्णय करावयाकारणें आमचा दरबारास पाठविलेल्या उपरि ब्राह्मणाचा कलह दूर करावा ह्मणावून अंह्मी बावाभट्ट कृष्ण दीक्षितादिकास अनेकवार सांगितले. परंतु त्याही व विनंती केली जे सभा करून निर्णय करावा. सभ्यमुखें करून आपण आपराधी जाहलो तर यथोक्त प्रायश्चित करू. त्या करिता येथें धर्मसभा करून उभय गोदातीरस्थ महाबल वैराज माहुली संगम कराहाटक करवीर परशुराम क्षेत्रस्थ विज्ञवृत्धसमस्त ब्राह्मण व समस्त प्रधानवर्ग बसून बावाभट्टादिकाचे समक्ष न्याय केला. तेथें प्रश्नोत्तर भावें करून व त्यांचा हस्ताक्षरांचा अनेक पत्रावरून व आद्यंत कर्माचे साक्षि नागजोशी व नागोजीराव प्रभृति यात्रिक कर्मकालीं प्रयागीं होते. त्यास त्रिस्थळी यात्रेचा शपथ घालून त्याचा साक्षीप्रमाणें व प्रयागी अतिरुद्रकर्माचे आचार्ये सदाशिवभट्ट पिंगले यांही व अणखी कितीयेक होमकर्त्यां ब्राह्मणांही अनुतापपुरःसर ब्राह्मणास शरण जाऊन प्रायश्चितें बहुत क्षेत्री घेतली. त्यावरूनहि अयाज्ययाजनाद्यपराध बावाभट्ट कृष्ण दीक्षितादिकांचे आंगी सप्रमाण लागला ते मिथ्यावादी जाहले. त्यानंतर बावाभट्ट कृष्णदीक्षितप्रभृतींस प्रायश्चित करावयाची अज्ञा केली. जर प्रायश्चित न करा तरि आमचा देश सोडून जा ऐशीही अज्ञा केली. त्यासमयीं प्रायश्चित्त मान्य करून घरास जातों ऐसे ह्मणोन देशांतरास गेले. त्याउपरि तुह्मांस श्रीस्थ प्रमुख समस्त ब्राह्मणास हे निर्णयपत्र करून दिल्हें असे. सर्वप्रमाणें तुह्मी सत्यवक्ते बावाभट्ट कृष्ण दीक्षीतप्रभृति सर्व प्रमाणे मिथ्यावादी. अपराधी प्रायश्चित्तावाचून अव्यवाहार्य आहे. तयास्तव बावाभट्ट कृष्णदीक्षितप्रभृति परभू याजक जोपर्यंत ज्ञातीस शरण येऊन राजअज्ञापुरःसर प्रायश्चित्त न घेत तोंपर्यंत यांशी कोणी अन्नोदकव्यवहार न करावा. बहुत काय लिहिणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ॥
शके १६७१ कार्तिक शुद्ध ९
चिरंजीव राजश्री सदोबा यांसी वाळाजी बाजीराव आशिर्वाद उपरी येथील कुशल ता। छ ७ जिल्हेज जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष काल आह्मी वाडियांत गुरुवारीं गेलों होतों. त्यास सौभाग्यादिसंपन्न मातुश्री बाईसाहेब वाडा पहिला यांनी आह्मांस सांगितले कीं, च्यार पांच डेरे व राहुट्या व कनाता लग्नप्रसंगाकरितां देणें. कार्य जाहल्यावर आपले नेणें. ह्मणोन बोलिली. आह्मी मान्य केलें. त्यास मध्यम सामान डेरे व राहुट्या व कनाता जेजूरीस आल्याच आहेत. त्यास, सामान फार जुनें नसावें, व नवेंही नसावें. मध्यम पाहिजे. त्यांत फार थोर डेरे नलगेत. सामान पक्ष मध्यम प्रतीचे सामान.
डेरे ४ कनाता १२, जाजमें ३
येणें प्रमाणे घेऊन येणें. कदाचित तुह्मी पुढें आलेत, तरी मागें जेजूरीस माणसें पाठऊन कनाता, डेरे, जाजमें, आणवणें. सारांश, लिहिले प्रमाणें मध्यम सामान आणणें. हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४६
श्रीसकलतीर्थरूप राजश्री आनंदगीर बावा मोकाम नीब यासी
बाळके नरसोजी नाईक व राणोजी नाईक पिसाळ देसमुख प्रा। वाई चरणा मस्तक ठेऊन सिरसा। दंडवत उपरी कृपा करून आंबे पाठविले परंतु बावाचा भंडारा कधी जेवला नाही तुह्मी आह्मास जैसे सदानंद आणि कृस्णा असे तुह्मी आह्मास जे गोस्टीस अंतर पडेल ते चालवीत गेले पाहिजे आमचे मायबाप आहा मी काय माहाराजाचे चरणराज आहे जे घडीस चाकरी फर्मावाल ते घडी हाजीर आहे अवंदा आंबे काही मजला खायास मिलाले च नाही बावाजीने जेव्हडे दाहावीस पाठविले ते च तरी बालकास आणखी पाठविले पाहिजे मायबाप आहा ह्मणून नेणतपणे लिहितो कळले पाहिजे बहुत काय लिहिणे मी बालक आहे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्रीमार्तंड
शके १६७१ कार्तिक शुद्ध २
राजश्री दामोधर महादेव गोसांवीं यांसि : — अखंडित लक्ष्मी अलंकृत राजराजमान्य स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत विनंती सुहुरसन खमसैन मया अलफ तुह्माकडे सरकारचा ऐवज ते ऐवजी ब॥ देणें समजाविसमुळें रुपये
१०८७ विसाजी रोहकळे
३०९ सिदोजीदलवी
१२३ गोजाजीवणगें
७७ सखोजीगाईकवाड
----------
१५९६
पंधराशें शाहाणव देविले असते. सदरहु
पावते करून कबज घेणे. छ २ जिल्हेज.
हे विनंती.
बार. रु.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्रीशंकर शके १६७१ आश्विनवद्य २
रवाना छ १७ जिल्काद.
तिर्थरूप राजश्री बाबा वडिलाचे शेवेशी
अपत्ये दामोदरानें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशळ ता। छ १५ माहे जिलकाद, मुक्काम धुळकोट, नजीक बर्हाणपूर, वडिलांचे आशिर्वादें यथास्थित असे. विशेष. भादवा वद्य १० सोमवारचे आशिर्वादपत्र खास दस्तुरें जाबीकासदाबरोबर आश्विन सुदि १० मंगळवार अवंतीकेस पावलें. तेथें आज्ञा कीं:: खंडोपंत जाऊन भेटले. आमच्या नावें पत्र पाठविलें. पैठणावर त्याच्या तर्फेनें अबदुल हुसेनखान आणिलें. त्यांशी उदंड कांहीं बोललों, तूर्त त्यांस श्रीमंताच्या स्नेहाचे आगत्य तें गोष्ट आपल्या हातीं नाहीं. याकरितां वर्हाडी गोष्टी सांगून समाधान करून मार्गस्थ केले. जर शहराजवळ दोन तीन च्यार मजली असिले तर जाऊन भेटतो. नाहींतर, न जाणो, आह्मी आज सातार्यास जातों, तेथील अभिप्राय ध्यानास आणून तुह्मास लिहूं , ह्मणून आज्ञा केली. त्यास वडिलीं जें कांहीं भाषणें केलीं असतील तें उत्तमच केली असतील. अवंतिकेहून मार्गांत वरचेवर खबर पोहोंचली कीं, शहागडाजवळ गंगा उतरून दरमजल गेलें. लांबले. मग जाणें सल्हा न देखिली. पुढें परतल्यावर वडिलांचे मर्जीनुरूप पाहून घेऊं. टोंक्यापाशीं अगर पुण्यस्तंभाजवळ गोदा उतरून परभारें आधी वडिलाचे भेटीचा लाभ घ्यावा, मग श्रीमंत स्वामीचे से॥ जाऊन गावास यावें. ऐसा बेत होता. परंतु श्रीमंत सातार्यास गेले वडीलही श्रीमंतापाशी गेले. आह्मी ऐशाप्रसंगी जरूर यावें. परंतु आज्ञेखेरीज सातार्यास कसें यावें ? या संदेहास्तव नाशकास गेलो व हे पत्र वडिलांकडे पाठविलें. उत्तर येतांच स्वार होऊन शेवेशी येऊं. परंतु जोंवर वडील व श्रीमंत स्वामी सातार्यास अथवा पुण्यांत एकत्र आहेत तोवरच आम्हास बोलाविले पो। कीं, सर्व गोष्टीचा निश्चय होय. उत्तराची मार्गप्रतीक्षा आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४५
जिवाजीने व अकोबाने चरणावर मस्तक ठेऊन सिरसा। नमस्कार विनंति उपरी बावानी दया करून आंबे पाठविले पाच ते पावले तरी सदानंद आणि कृस्णा व रा। अवधूतराव जसे दिसे बावा आह्मास मी काय बालक आहे जे गोस्टीस अतर पडील ते वडीलानी संभालीत गेले पाहिजे जैसे जे घडीस बावा सांगतील ते घडीस हाजीरच आहे बहुत काय लिहिणे मी बालक असे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री पौ छ ६ रबिलाखर.
शके १६७० फाल्गुन शुद्ध १
श्रियास चिरंजीव राजश्री दादा यासी प्रति बापूजी महादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ १ माहे रबिलोवल, मुकाम नजिक करोखनगर कपिलाभागीरथीतीर वजिरान्मुमालिकाचें लष्कर, जाणोन स्वक्षेम लिहित जावें. विशेष. तुमचें पत्र छ ८ मोहोरमचें कलबुर्ग्याजवळील आलें ते पावलें. वर्तमान सविस्तर विदित जालें. रा॥ गोविंद तमाजी यांचा कागद आला होता, त्याजवरून सविस्तर विदित जालें असेल, ह्मणून लिहिलें. त्यासी, गोविंदराव तमाजीचीं पत्रांवरी पत्रें येत असतां तुमचें पत्र न आलें याचें कारण काय ? हें न कळे. जर त्याजवळी आलें असेल, तरी पोहोंचेलच. हौरंगाबादेहून दरमजल तुळजापुरास जाऊन देवब्राह्मणांस भोजन घालून देवीदर्शन करून लश्करास आला. नवाब नासरजंगास कळतांच त्यांणीं गुलाम महमदखां नामें सरदार पाठविला. जाऊन भेटलों. बहुतसा आदर केला. बहुमानवस्त्रें मेजमानी पाठवून बहुत शिष्ठाचार केला. बोलून बहुतच कुशल; पातशाहाची चाकरी करावी; वजीर इत्यादिकांसी स्नेह असावा; श्रीमंतस्वामीसी नित्यानीं स्नेह वृद्धिंगत व्हावा; मुलुकाचा बंदोबस्त असावा; प्रजा सुखी राहावी. आह्मी प्रसंगोचित पातशाहाकडीलं कृपेच्या, व वजिराकडील स्नेहाच्या, समर्पक गोष्टी सांगितल्या; त्यावरून बहुत संतोष जाहाला. दखणी रायांचा इत्का भरवसा नवता जे, इत्का कुशल आहे. अखेर असफज्याहाचा पुत्र आहे. पातशाहाचे पिलास पोहूं शिकावें लागत नाहीं. तुह्मी येवडा सरदार हातास आणिला. तीर्थरूप कैलासवासी यांचा मनोरथ पूर्ण केला. आह्मां त्रिवर्गांस पूत केले. ईश्वर तुह्मांस सलामत राखो ! छ ५ मोहोरमीं कृष्णनदी जवळून निरोप घेऊन, बहुत राजी करून, सातार्याकडून कूच केलें. औरंगाबादेहून दिढाशा कोसांवरी आलों. अतःपर सातारियासी पावल्यावरी श्रीमंत स्वामींची व तीर्थरूप बाबांची भेट घेऊन सविस्तर वर्तमान लिहून पाठवूं. ते प्रांतीचें वर्तमान लिहिणें. त्यासी तुमचेंच शरीर होय जे ऐसी ऐसी मेहनत केली. आह्मी फरुखाबादपर्यंत आलों आहे. इत्कियांतच इत्की क्लेश वाटतात, लिहिता पुरवत नाहीं. तुमचें सप्तर्षीस पावलियाचें वर्तमान येईल तेव्हां समाधान होईल. बहुतकाय लिहिणें ? हे आशीर्वाद.
१६७०
जे समईं पठाण सरहिंदेवर आला, इकडून कमरदीखां व सफदरजंग गेले, व श्रीमंत स्वामीच्या फौजा नेवाईवर आल्या, तेसमई रोहिल्याचें कामाचे शर्तीवर पांच पाउले मृत सार्वभौमासी ठराविले होते. ते पंचत्व पावल्यावर बाळच्या पादशाहासी व वजिरासी तागादा करीतच होतो. हे गोडगोष्टीनें टाळाटाळ करीत होते. हें वडिलास श्रुतच आहे. सांप्रत आह्मी दिल्लीहून चालणार तेव्हां बहुतां प्रकारें वजिरास समजावून सांगितले. पादशाहाचे घरांत तों पैका नाही. तेव्हां वजिरानीं अडिचा पावल्याची तनखा सांभेरवर केली व अडिचा पावल्याची बंगाल्यावर करून देतों ह्मणून नेम केला. व सांभरचा फौजदार आह्मांबरोबर दिधला जे, यास दखील करून, तुह्मी आपला एक ब्राह्मण व शंभर राऊत ठेवून, जो पैका येत जाईल तो शिबंदी फिटल्यावर आपल्या तनखाईत घेत जाणें. आह्मी विचारलें कीं, हे गोष्ट बहुत कार्याची आहे. अनायासे तनखाचे वाहाण्यानें सांभेरांत पाय पडिला ह्मणजे अजमेरच्या सुभ्यांत दखल जाला. बलकी सांभेरेंत बीं रुतल्यावर बखसी पासूनहि हर कोणाचे नांवे करून घेऊं. होत होत सर्व बंदोबस्त होईल. ऐसे ध्यानास आणून हे गोष्ट कबूल केली. सांभरच्या फौजदारास घेऊन जैपुरास आलों. सवाईजीस अनेकांप्रकारे समजाविलें. परंतु ते न मानीत. सहसा अमल न देत. त्यांस, मकारपूर्वकाचे स्नेहाचा मोठा भरंसा ! नाइलाज होऊन निरोप न घेतां उठून आलों. टोंकेंत पावल्यावर दोनेकसे राऊत जमा करून, फौजदाराचा नायब व आह्मी आपला एक भला माणूस परभारें सांभरेस पाठविला. जे दाबदुब करून अंमल घेयावा, सवाईचा विचार केवळ अविवेकी. हे गोष्ट ऐकतांच, दोन तीन हजार स्वार पाठविले. केवळ निग्रहासच पेटले.