श्री
शके १६७२ मार्गश्रीर्ष वद्य ८
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री मल्हार मुकुंद गोसावी यांसी :--
स्नो। बाळाजी बाजीराव आशीर्वाद. सु॥ इहिदे खमसैन मया व अलफ. मातुश्री आईसाहेब यांचे कोठीचे बैल वगैरे ५० पन्नास बरोबर चवडापा कोटवाला बईल चारणीस घेऊन मौजे कुंबठे पा। वरूल येथें चारणीस नेले होते. त्यास मल्हारी डोंब याणें कुंडलवाडीचे हुंडे भाडें करून घेऊन आला; आणि बैलांस अटकाव केला. आजी सबब कीं, चवडापामा।र याच्या भावाकडे रुपये आहेत ह्मणून बहुतांना येऊन बैल अटकाविले आहेत. त्यास, वाणीमजकूर हा मातुश्रीचा कोटवाला, याजकडे लिगाड काय आहे ? तरी तुह्मी मल्हारी डोंब याजला ताकीद करून बैल सोडवून आपले हद्देंतून ताटमुटसुद्धां रवाना करणें, हुंड्या भाड्याचे रुपये जे होतील ते चवडापाचे पदरीं घालवणें. जाणिजे. छ २१ मोहरम.
(लेखनसीमा.)