श्री शके १६७२ फाल्गुन शुद्ध ६
राजश्री दामोधरपंत रावजी व पुरुषोत्तमपंत गोसावी यांसीः--
छ अखंडीतलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर व जयाजी शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असावे. विशेष. पत्र पाठविलें प्रविष्ट जालें. आपला मुक्काम कोणे ठिकाणीं आहे, आह्मीं कोण ठिकाणी यावें, ह्मणून लिहिलें. ऐसियासी, उदईक गुरुवारीं कुच करून झुणकीवर पांचा कोसाचा मुकाम नेमिला आहे. त्यास, सत्वर आलिया तळावरच भेटी होतील, अथवा मजलीस भेटी होतील. सत्वर आलें पाहिजे. छ. ४ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सुद.
श्रीह्माळसा-
कांतचरणीं तत्पर
खंडोजीसुत मल्हा-
रजी होळकर.
हिशेब दि।। सरदेशमुखी तहबंद करारनामा सन खरसैन