लेखांक २५५
श्री
सदानंद मठ निंब
राजश्री बसवतराउ खासखेल हजुराती यासि
प्रती भवानगीर गोसावी आसिर्वाद उपर येथील क्षेम जाणून ता। कार्तिक वद्य सप्तमीपावेतो वर्तमान यथास्थित असे विशश श्री स्वामीची झोळी हक पुर्वापार प्रा। वाई व प्रात कुडाळ येथे श्री स्वामीचा हक आहे ऐसीयासि साप्रात कोणी पाटील खलेल करितात तरी आपण प्रांत वाई व प्रांत कुडाळ यांस ताकीदपत्रे हुजुरची व आपली दिली पाहिजे पूर्वापार हक दर गावास एक टका व एक मण गला व तेली याच्या घाण्यास तेल पाच सेर व साळी याच्या मागास कापड तीन हात व धणगरास मागास घोंगडी व चांभाराच्या दुकानास जोडा व सोनाराच्या दुकानास रुपे एक मासा येणेप्रमाणे आहे तरी आपण प्रात वाई येथील संमत वाघोली व निंब व कोरगाव संमत व कुडास देश यास ताकीदपत्रे दिलीयाने तुमच्या राज्यास व तुह्मास कल्याण चितून आपणाकडे सतोशगीर गोसावी पाठविला आहे याजपाशी पत्रे दिली पाहिजेत बहुत ल्याहावे तरी आपण सूज्ञ असेत हे आसिर्वाद