श्री शके १६७२ मार्गशीर्ष शुद्ध ९
नकल
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदर महादेव स्वामीचे सेवेसीः--
सेवक माहादाजी केशव दि॥ राजश्री विठ्ठल शिवदेव सा। नमस्कार विनंति उपरी. श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीहीं गुजराथचे रसदेचे ऐवजीं रुपये दीड लक्ष रुपये समजाविस नालबंदीस देविले. त्यापैकीं नासिकचे मुकामीं रुपये १००००० एक लक्ष मा। धोंडाजी नाईक नवाळे भरून पावलों. मिती मार्गेश्वर शुद्ध ९ नवमी, शके १६७२, प्रमोदी नाम संवत्सरे, सु॥ इहिदे खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे ? छ. माहे मोहरम. बौ। ॐ