श्री शके १६७२ मार्गशीर्ष वद्य १
नकल
राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोधर महादेव हिंगणे स्वामीचे सा। :-
सेवक महादाजी केशव दि॥ राजश्री विठल शिवदेव नमस्कार विनंति उपरी. श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीहीं गुजराथचे रसदेचे ऐवजी औरंगाबादेस रु॥ ५०,००० अंक पनास हजार देविले ते मु॥ नासिक येथें भरून पावलों. बहुत काय लिहिणे ? सके १६७२ प्रमोद नाम संवत्सरे, माहे मार्गेश्वर वद्य प्रतिपदा. हे विनंति.