लेखांक २५७
श्रीसंकरप्रसन
तीर्थस्वरूपमुहुर्ती महामेरू देवमाने याविराजित राजमान्या राजश्री कमलनयन गोसावी मोकाम निंब स्वामी गोसावी याचे सेवेसी
.॥ विनंती विद्यार्थी शंकराजी राजे मोहिते देशमुख का। बालाघाट सास्टागी दडवत विनती उपरी स्वामी यानी आशीर्वादपत्र केशवगिरी गोसावी हाती पाठविले ते उत्तम समई पावोन परम संतोष पावलो कितेक वर्तमान इनामाचे विसी लिहिले तरी आह्मी राजश्री सुभेदार साहेबास लिहिले असे तेही भले धर्मप्रायन आहेती त्यापासून धर्मकार्यास अंतर पडणार नाही व आह्मीही जैसा प्रयत्न करू ए तैसा करून देवाचे कार्यास अंतर न पडे व नंदादीपाविशी लिहिले तरी तो विवेक बरे च होईल कितेक वर्तमान केशवगिरी गोसावी सांगता सेवेसी विदित होईल आह्मी विद्यार्थी असतोत घडीघडी निरोप जो असेल तो लिहित गेले पाहिजे आह्मी सेवक असो सेवेसी अंतर पडणार नाही सेवकासी आशीर्वादपत्र पाठवीत गेले पाहिजे