लेखांक २६३
श्री
तीर्थरूप महाराज राजश्री आनंदगिरी गोसावी महंत मठ श्री मु॥ निंब स्वामीचे सेवेसी विनंती गुरूचे बालक हरी देवगीर गोसावी नमो नारायण ओनमो नारायण विनंती आह्मी आपले आज्ञा घेऊन सुखरूप लष्करास छ ५ रजबीं पावलो आमचे कार्य पैकीयाकरिता अटकोन राहिले मग सूर्याराऊ देसमुख यासी विनंती करून बोलिले की जो टका पडेल तो कर्ज काढून देणे कर्ज समेत पैकी देऊनु ऐसे बोलोन मुचलका दिल्हा मग त्यानी कार्याचे मागती मनी धरून कामे चाली लाविले कळले पाहिजे आमचे घोडी आहेत तरी हरएक धामधुमे हलाली हरामी येतात बहुत सावध असणे मठास माणूस पाठऊन सेताभाताचे समाचार घेत जाणे आह्मी तो लौकर येत नाही जधी देसमुख देशपांडे येतील तधीं येऊनु तुह्मी आमचे वाडी करणे काम जाले तरी हे तोंड दाखउनु नाही दंश लघून फकीर होउनु जाउनु काहीं हजार दोनीशे रुपये पाठवणे ह्मणबजबे काम सरभरा होईल घरी मुलामाणसाचे परामर्ष करीत जाणे वाकोजी पाटील येथे आहे हरकोणी माणूस येईल तेव्हा स्मरण करून रामजी पाटील नादवाबालकर याचा कागद पाठवीत जाणे बहुत काय लिहणे कृपा असो दिजे नारायण
(निशाणी त्रिशूळ)