लेखांक २६५
श्री
महाराज राजश्री आनंदगिरी बावा महंत मु॥ का। निंब
स्वामीचे सेवेसी
सेवेसी सेवक सुर्याराउ पिसाळ देशमुख पा। वाई चरणावरी मस्तक ठेऊन दंडवत विनंती उपरी गोसावी धरून नेले ह्मणौन गाउकरानी लिहिले होते त्यावरून रदबदल केली यासी हरदोजणापासून मातबर जमान घ्यावे आणि दसनामात पाठऊन द्यावे तेथे जो इनसाप होईल त्याप्रा। जमानाने आणून हजीर करून द्यावे ऐसा तह केला आहे तरी स्वामीनी भोइज अगर हवेली मध्ये कोणी एके जागा गावीचा पाटील जामीन करून पाठऊन देणे व घासदाणाही मागतात तरी याचा कैसा विचार तो लेहून पाठवणे व जमानकतबाही पाठवणे अतीत मोईन पाठऊन हालीं दिसगत न लावणे आह्मासही धंदा उदंड आहे त्वरेने कार्य करून पाठवणे बहुत ल्याहावे तरी स्वामी देव आहेत हे विनंती