लेखांक २६२
श्री
तीर्थरूप राजमान्य देवमान्य श्री महंत आनंदगिरी गोसावी मठ
श्री सदानंद मो। निंब याप्रती
पूर्वक सूर्याराउ देशमुख व गंगाजी शंकर व गिरमाजी झुंगो देशपांडे पा। वाई कृतानेक विज्ञापना नमो नारायण ता। छ २४ जमादिलावल मो। बीदरी सुखे असो महाराजाचे गोसावी रा। हरी देवगीर सनद बदल आह्मारोबर आले आहेत त्यास धर्मादायाचे पत्र दुरूस कयास करून दिल्हे इनामतीचे सनदपरवाना दिवाणी करून घेवा आहे त्यास फुरसती आहे गोसावी बहुत श्रम करितो विदित असावे हरी देवगीर श्री महादेवाचे यात्रेस जावया बहुत उत कठित जाले आहेत रुणानुबांधे यात्रेस रवाना करून सेवेसी श्रुत असावे कृपा असो दीजे हे विनंती राजगडतरफेस आपले धर्मादाउ आपले नावे करून घेतला त्यास वीस पंचवीस सुभ्रे खर्च जाले ते हरदेवगिरीस ठावके त्याचेच हाते जाले विदित असावे हे विनंती