लेखांक २५९
श्री
राजश्री निळोपंत स्वामी यासि
विनंती उपरी तुह्मी पत्र पाठविले ते पावले श्री सदानंद स्वामी यास गावगनापैकी देशमुखानी वर्षासन करून दिल्हे आहे त्याविशी त्याजकडील
गोसावी कोरेगावी वर्षीका बा। आले आहेत त्यास काय सांगावे ह्मणून लि॥ त्यास आह्मी कोरेगावी आलीयावर जे करणे ते करावयास येईल तूर्त गोसावी यास जावयासी सांगणे छ ३० मोहरम हे विनंती