Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[४५७ ]
श्री.
यादी हिंगणे याचे दौलतीस मूळ पुरुष वैकुंठवासी महादेव गोविंद हिंगणे. त्यासी पुत्र चौघे. वडील पुत्र बापूजी माहादेव, दुसरे पुत्र दामोदर माहादेव, तिसरे पुत्र पुरुषोत्तम माहादेव, चवथे पुत्र देवराव माहादेव, धाकट्याचा पुढें विस्तार. पुरुषोत्तम माहादेव यांचे नातू देवराव गोविंद, हाली बांद्यास आहेत. बापूजी माहादेव याचे पुत्र माधवराव झांशीस आहेत. त्यांचे पुत्र बापूजी माहादेव आपले वडिलापासून झांशीस होते ते येथें आले. देवराव महादेव यास पुत्र चोघे. वडील दामोदर देवराऊ, धाकटे पुरुषोत्तम देवराऊ. त्यास पुत्र दोघे. ज्येष्ठ अमृतराव पुरुषोत्तम, दुसरे गणपतराव. ते दामोदर देवराव यांनी घेतले. दामोदर देवराव याचा वृद्धापकाळ जाला तेव्हां वडीलपणा अमृतराव पुरुषोत्तम चांदेरीचे जागिरीवर वहिवाटीस आहेत, त्यास पुरुषोत्तम माहादेव व बापूजी माहादेव यांचे मागें दौलतीचें काम देवराव माहादेव यांणी केलें. त्यांचे मागें पुत्र दोन. वडील दामोदर देवराव हिंदुस्थानांत होते. येथें हुकुम पुरुषोत्तम देवराव यांनी दौलतीचे काम केलें. त्यांचे मागें अमृतराव पुरुषोत्तम यांनी केलें. हालीं करितात चांदोरी मुक्कामीं आहेत. बापूजी माहादेव यांचा वंश. नातू बापूजी माहादेव वडिलापासून चांदोरी मु॥ आले. ते विभाग मागावयास लागले. येविसीं खटला केला की, आजपरियंत तुह्मी व आह्मी एकत्र असतां तुह्मी उभयतां चुलते पुतणे विभक्त होऊन वाटणी करून घेतली, याचें कारण काय ? त्यास, आमचा विभाग आह्मांस द्यावा. तुह्मी आपले तिसरे विभागांत वाटणी तुह्मी करून घ्यावी. आमचे विभागाचे धनी तुह्मी कीं काय ? त्यास दौलतीचे विभागी तिघे; तिघांचा वंश कायम आहों. तीन वाटण्या कराव्या. याप्रों। खटपट केली; आणि त्याजवरून रुसून येऊन नाशिक मुक्कामीं कुंपिणी सरकारांत अर्जी लिहून पाठविली. त्याजवरून बापूजी माहादेव यास पुणें मुक्कामीचा बोलावण्याचा सरकारचा हुकुम आला. तेव्हां पुणे मुक्कामी जाण्यास तयार जाले. त्याजवरून मी पुणें
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४५६ ]
श्री
यादी वहिवाट सरकार राजश्री राजमंडळ कारकीर्द कैलासवासी थोरले शाहूमहाराज यांजपासून पेशवे सवाई माधवराव अखेर चालत आलीः--------
१ सरकारचें स्वदस्तूरचें निशाण व मुद्रा.
१ राजपत्रावर मुद्रा.
१ फडणिशी व चिटणिशी पत्रावर निशाण :------ बहुत
काय लिहिणें ?, व सुज्ञे असा, व छकार यथा सांप्रदायानें.
१ फडणिशी सनदेवर, व वरातेवर तारीख फड़णिसाची, व निशाण स्वामीचे.
१ चिटणिशी पत्रावर तारीख चिटणिसाची व निशाण स्वामीचें.
------
२
१ इनाम व सरंजाम गांव व वतन, हरकोणास द्यावयाचा हुकूम जाहलियास, त्याचीं राजपत्रें लिहून देणेंविशी पंतअमात्यास आज्ञापत्र होईल, त्याजवर निशाण स्वामीचें ; अथवा याद जाहलियास मखलाशीवर निशाण स्वामीचें.
१ नूतन राजपत्र करून देणें जाहलियास अमात्यास फडणिशी दफ्तरीं आज्ञापत्र लिहून निशाण स्वामीचें.
१ मालुमाती राजपत्र करून देणें जाहलियास अमात्यास चिटणिशीकडून आज्ञापत्र लिहून त्याज़वर निशाण स्वामीचें.
-----
२
----
३
१ पंत प्रतिनिधी याजकडे दाखला राजपत्रांवर शिक्का.
१ पंत प्रधान याजकडे दाखला राजपत्रावर शिक्का.
१ पंत अमात्य याजकडे राजपत्रावर निशाण. मजमूचे व इनामी
राजपत्रें नांवाचे व गांवचे मजमु दफ्तरी लिहावी.
१ पंत सचीव याजकडे सुरनिशी निशाण-सुरुसुद बार-राजपत्रांवर.
१ मंत्री याजकडे दाखला राजपत्रावर-संमत मंत्री.
१ सुमंत याजकडे दाखला राजपत्रावर-संमत सुमंत.
१ पंत राजाज्ञा याजकड़े सरकारी निशाणें.
१ राजपत्रावर संमत सरकार
१ रुजु खर्चाच्या चिट्या,-पोतें, जामदारखाना, कोठी वगैरे कारखाने --- यांजवर होतील, त्यांजवर, माहालचे हिशेबावर. शाहुमहाराज यांचे कारकिर्दीत.
------
२
१ कारभारी यांजकडे निशाण - परवागी- हुजुर चिट्यावर व माहालचे हिशोबावर, शाहु महाराज यांचे कारकिर्दीत
------
२
१ कारभारी यांजकडे निशाण - परवानगी - हुजुर चिट्यावर व माहालचे हिशोबावर, शाहु महाराज यांचे कारकिर्दीत
१ फडणीस यांजकडे हुजुरचे दफ्तर व फडणिशी काम.
१ राजपत्रावर बार व पाठीमागें तारीख.
१ सनदेवर व वरातेवर तारीख फडणिसाची व निशाण स्वामीचें.
१ नूतन इनाम व सरंजाम गाव व वतन हरकोणास द्यावयाचा हुकुम जाहल्यास, त्याची यादी अगर आज्ञापत्र पंत अमात्यास लिहिणें तें फडणिसांनी दफ्तरी लिहून तारीख करावी. निशाण स्वामीचे जाहलियावर आमात्यांनी राजपत्रें तीन ल्याहावीं. व चिटणिसाकडील तीन राजपत्रें तयार करून द्यावीं. हुजुर दफ्तरीं आल्यावर, बारनिशी पाहोन, बार ह्मणोन पाठीमागें तारीख घालावी.
१ चिट्यावर व माहालाचे हिशेबावर तारीख व एकुण हाती फडणिशी.
-------
४
१ चिटणिस याजकडे चिटणिशी कामाची पत्रें लिहिणें त्याचे कायदे.
१ राजपत्रें लिहिणें तारीख ध्धां.
१ हुजुरची पत्रें हातरोख लिहून तारीख चिटणिशी व निशाण स्वामीचें.
१ मालुमाती राजपत्रें देण्याविशीं आज्ञा जाहलियास, पंतअमात्य यांचे नांवे आज्ञापत्र चिटणिसांनी लिहून, निशाण स्वामींना करावें.
१ तहनामा ठरेल ते चिटणिसांनी ल्याहावा.
-------
४
१ बक्षी याजकडे लोकांची हजिरी, गणती, व चाकरी सांगणे.
१ पोतनीस याजकडे पोत्याचें काम कर्दिसुद्धां.
--------------
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४५५ ]
श्री.
यादी वंशावळ मृत्य पावले त्याच्याउ मित्त्या इ॥ ता। सु॥ खमस अशरीन मयातैन व अलफ.
१ बाळाजी अवजी यास संभाजी माहाराजांनी मारिलें मि॥ शके १६०३
१ खंडो बल्लाळ आश्विन शु॥ ५ शके १६४८
१ गोविंद खंडेराव आशाढ शु॥। २ शके १७०६
१ जिवाजी खंडेराव पौष वा। ७ शके
१ बापूजी खंडेराव आश्विन शु॥ ११ शके
१ बहिरव खंडेराव आश्विन वा। ११ शके
१ खंडेराव बापूजी माघ वा। ६ शके
१ भगवंतराव बापूजी चैत्र वा। ९ शके
१ लक्ष्मणराव गोविंद श्रावण शु॥ १४ शके १७२२
१ शिवराव गोविंद आषाढ वा। १२ शके १७१४
१ बाबाजी गोविंद ज्येष्ठ वा। १३ शके
१ देवराव जिवाजी आषाढ वा। १२ शके १७२४
१ रामराव जिवाजी आषाढ वा। ७ शके १७२५
१ हैबतराव बहिरव मार्गशीर्ष शु॥ २ शके
१ मैराळराव हैबत ज्येष्ठा शु॥ १ शके
१ लक्ष्मणराव हैबत भाद्रपद शु॥ ८ शके
१ रघुनाथराव लक्ष्मण श्रावण शु॥ १२ शके १७४०
१ सदाशिवराव लक्ष्मण ज्येष्ठा वा। १४ शके १७२७
१ मनोहरराव भगवंत पौष वा। ७ शके १७३३
१ अमत खंडेराव ज्येष्टा वा। ७ शके १७२०
१ भिमराव खंडेराव फाल्गून वा। ८ शके १७४३
१ वामन खंडेराव वैशाख शु॥ ४ शके १७४१
१ बापूजी खंडेराव पौष शु॥ शके १७२४
१ मल्लारी रामराव ज्येष्ठा वा॥ १० शके १७४५
१ विश्वनाथ शिवराव आश्विन शु॥ ७ शके १७४३
१ केशवराव विश्वनाथ चैत्र शु॥ ९ शके १७४४
१ हणमंतराव रघुनाथ कार्तिक शु॥ ६ शके १७४०
१ माधवराव बहिरव आश्विन वा। १२ शके १७२६
१ हणमंतराव अमृत वैशाख वा। ११ शके १७४२
१ व्यंकटराव बहिरव वैशाख (इसने)
१ निळो बल्लाळ पुणेकर
१ अवजी नीळकंठ
१ महिपतराव अवजी फाल्गून वा। ११ शके
१ त्र्यंबकराव महिपत ज्येष्ठा वा। १४ शके १७१७
१ महिपतराव त्रिंबक माघ शु॥ शके १७२२
१ मल्लार आनंदराव माघ
१ अवजी आनंदराव फल्गून शु॥ ४ शके १७४३
१ तुको नीळकंठ
१ नीळकंठ तुकदेव
१ आनंदराव तुकदेव ---------------------- पानपतांत
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[४५३]
श्री.
१ मानाजी आंगरे
१ राघोजी आंगरं
१ मानाजी आंगरे
१ बाबूराव आंगरे
१ मानाजी आंगरे
यादी वंशावळ आंगरे कान्होजी आंगरे यांचे बायकोस पुत्र दोन त्यांची नांवें :-
वडिलेस धाकटे संभाजी आंगरे.
उभयताचे नक्कल. सा। राखीस संतान जाले ते बा। कान्होजी आंगरे यांस राखी ३
त्यांस संतती
१ तुलाजी आंगरे येकी राखीस जाले. संभाजी आंगरे याचा काल जाला ते समई संभाजी आंगरे काईम दौलतीवरि असतां, त्याचे हाताखाली तुलाजी आंगरे कारभार करित होते. त्यांणीं श्रीमत् शाहू महाराजास विनंती करून आपले नांवें वस्त्रें घेतलीं. संस्थान चालूं लागलें ब्राह्मणांस उपद्रव फार केला. सबब, नानासाहेब पेशवे यांणीं महाराज कैलासवासी जाल्यावरि तुलाजी आंगरे यांस बहुत सांगोन पाहिलें; वकील पाठविले; तत्रापि न ऐकत. तेव्हां इंग्रज अनकूल करून घेऊन तुलाजी आंगरे धरिलें. किले वंदन येथें बेडी घालून ठेविलें ते बंदांत मेले. त्याचे पोटीं संतान कैदेत राखी ठेविल्या त्यास जालें त्यांची नांवें.
तुलाजी आंगरे वारल्यानंतर ती मुलें कोठें गेलीं, त्याचें ठिकाण समजलें नाहीं.
१ मानाजी आंगरे हें श्रीमंताचे आश्रयें कुलाबा वगैरे तीन किल्ले घेऊन राहिले. त्यांणीं शूरत्वाचेयागें कान्होजी आंगरे याचे खासे पुत्रास अगर तुलाजी आंगरे यास लक्षांत आणिले नाही. त्याचे पुत्रः--
१ राघोजी आंगरे. त्यांची संतती हल्लीं कुलाब्यास आहे.
१ तिसरे राखीस पुत्र जाहला. बाबूराव आंगरे व त्या पुत्राची कन्या महादजी शिंदे यांचे पुतणे यास दिल्ही. तिचे पोटी दौलतराव शिंदे जाले. ते महादजी शिंदे यांणी दत्तक घेतले. बाबूराव आंगरे दौलतराव शिंदे यांचे मामा. त्यांणी शिंदे याचे जबरदस्तीनें राघोजी आंगरे यांची मुलें कैद करून आपण संस्थानची वहिवाट करूं लागले पुढें बाबूराव आंगरे याचा काल जाल्यावरि कारभारी यांणी राघोजी आंगरे यांची मुलें हाती धरून कारभार चालविला.
---------------
चेउल उंदेरीपैकीं उत्पन्न केलें
चेउलपो।
१ आंगरे यांजकडुन इनाम आहे. त्याजवरि हक्कदारी घ्यावी असा करार केला.
१ नाना फडणीस यांजकडे
१ हरिपंत तात्या
१ विसाजीपंत लेले
१ सखारामपंत बापु
--------------
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४५२ ]
श्री
यादी हिंदुस्थान प्रांती स्वकीय व इष्ट मंडळी त्यांची पूर्वपरंपरा स्मरःणार्थ ---हितगीरी असावी यद्यर्थ ईकडील गेले त्यांची व तीकडील आहेत ----- तपसील, सलाश असर मयातैन व आलफ.
राजश्री बाबुराव अंग्रे वजारतमाम सरखेल यांची वानवाडीचे ----- स्नेह होता. व सीकारीत वगैरे मुकामी आगत्य वादाची ------ झाली. त्यांत सांप्रत उजनीस चीटकोपंताबरोबर पत्र पाठविले.
त्यावरून त्यांची बरदास्त करविली. ते पंताजी पंताचे पणतुनी स ------ तलेच होत.
२ पींगोरी नजीक श्रीजेजुरीकर विठोजी सिंद्यापा। यांचे पुत्र बापुजी ----- येसाजी रामचंद्र वाईकर यांचकडे रस्त्याकडून वाल्हे येथें होती, त्याजकडे पिंगोरी, वगैरे खडे याची कमाविस, यामुळें आमचेकडे येणे जाणे, ------जीबावाचे व पूर्वील वडीलाचा स्नेह, ह्यामुळें बहुत उपयोगी वानवाडीत होते.
३ राजश्री यशवंतराव बापु कोरडेकर, आनंदरावजी नींबाळकर वाटारकर यांचे व्याही, यांचा पुरातन स्नेह आबा भोईटे जानोजीबावा हींगणगावकर यांचे आप्तकीमुळें व त्याचा थोरपणा जीवाभ्य उपयोग करतील.
४ बापु निंबालकर वाटारकर सर्वत्र भाऊ ह्याचे पुतणे व ह्याचे पुत्र दाजीबा आदीकरून उपयोग अभिमानी.
५ वांईकर खानमहमदाचे मेहुणे हुसेनखान रसुलखानाचे बंधु पसरणीकर वोळख धरतील तर.
६ बापु माहाडीक राघो आपाजी निजाम पाडलीकराचे बंधू, मातबर पथिके, भीडही मोठी दादाचे, व पूर्व अनादी स्नेह वडीलार्जित स्मरावयाजोगे, संभावित, आपले उपयोग, जीवा भय करावयाचे.
७ भगवंतराव बाबाजी॥ बालाबाई सितोले जीवनराव माहादेव यांचे चुलते, आप्तवर्गा उपयोग करतील. त्यांचे मेहुणे बापु कवीजंग बारगांवीं आले होते ते परिचयांतील आहेतच त्यांचे मंडळात बाबाजी यादव याचे पुत्र कृष्णराव भाऊ व तात्या फडणीस नीसबत सितोले.
८ राजश्री रामचंद्र भास्कर, अन्याबा राजापुरकर कारभारी ------- अर्थ कुंटुबांतरगत स्त्रीपुरषांत फत्तेसिंगबावाचे कारकीर्दीत आह्मी राथेंत आलो तेव्हांपासोन ह्यांचाही स्नेह अद्वीतीय भरवंसा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४५१ ]
श्री.
यादी ----------------------------------------
----------------------------------------------
अटरा टोपी इंग्रज जात त्यांची नांवें.
१ फिरंगी राजा १ इटलीलयुत
१ फरासिस सिपाई १ सुईस
१ आरमानी १ दिगंमार
१ इंग्रेज लोहार १ किरस्तांव
१ आलेमान १ जनमार्ग
१ पुरतकाल १ तुंगमार्ल
१ गोलाद १ जिवजंगी कलागार
१ उरस
१ इस्मानयोल
१ इस्तंबोळ
ब्रह्मपुत्रो विश्वकर्मा तत्पुत्रस्तु मयः स्मृतः ।
मयीपुत्रास्ताम्रमुखा द्वीपांतरनिवासिनः ॥
सर्वविद्या सुकुशला शूराश्चातीव दुर्धराः ।
कलों राज्यं करिष्यंति आसमुद्रांतभूमिकम् ॥ १ ॥
( आनंदनाम ) अमले मार्गशीर्षस्य शुक्लाष्टम्यां तथैव च ॥
सोमश्रवणमध्यान्हे ताम्रराज्यं विनिस्यति ( विनश्यति ) ॥ २ ॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २९८
श्री १६४१ वैशाख वद्य ८
नकल
यादी वाटनी राजश्री नारो शंकर व माहादाजी शंकर गांडेकर सुहूर सन तिसा अशर मया अलफ कैलासवासी शंकराजी नारायण याणी माहादाजीपत दत्तपुत्र घेतले पुढे औरस पुत्र नारोपंत जाले त्या उभयतामधे कथला पडू लागला सबब मातुश्री येसूबाई याणी चौघास बोलाऊन उभयतांची समजूत करावी त्यावरून उभयतांनी चालावयाची कलमे
सचिवपद दौलतीचा अधिकार नारो शंकर याणी करावा दौलतपैकी हिसा निमे ह्मादाजीपंत मागतात परतु हे कलम सरकारी आज्ञेचे त्यास हुजूर ठरेल त्याप्रमाणे उभयतांनी चालावे दरम्यान तंटा करू नये कलम १ |
रोहिडखोरे वेलवंड खोरे येथील देशकुलकर्ण नवीन संपादित आहे त्यास दोनी खोरियाचे वतन ह्मादाजी शंकर याणी खावे नारो शंकर याणी मागू नये कलम १ |
सावोत्रा वगैरे वतनी बाब दौलत समधे आहे ती नारो शंकर व माहादाजी शंकर याणी निमे निमे महाली खर्च वजा जाऊन घ्यावी कलम १ |
दादाजी नरस प्रभु याचा कथला देशकुलकर्णासी रोहिडखोरे वेलवंडखोरे याबद्दल हुजूर पडला आहे त्यास कृष्णाजी प्रभू हरहुनेर कबजेत आणून उभयतानी एकविचारे राहून बोलावे प्रभु न थकल्यास त्याचे त्यास द्यावे लागेल सबब हिसे केले नाही कलम १ |
वडिलाचे वेळेचे दागिनी जवाहीर व नख्त सोने रूपे कापड वगैरे एकदर चीजवस्तसुधा निमेनिमे उभयतानी घ्यावी शामजी हरी सुभेदार याणी मातुश्री येसुबाई यास शफतपूर्वक पुसून वाटणी करावी त्याप्रमाणे उभयतानी चालावे कलम १ |
दौलतीचा कारभार माहादाजीपंतानी कारकून व लोक हाताखाली घेऊन करावा हुजूरचाकरी वगैरे बंदोबस्त ठेवावा कलम १ उभयतानी एकविचारे चालून मातुश्रीचे आज्ञेत राहून लौकिक राखावा कलम १ |
एकूण कलमे सात सदरी लि॥ आहेत त्याप्रो। निष्कपट चालून एकाएकाचे मर्जीनी वागावे दौलतीची वाटणी निमे निमे करून घ्यावी परतु किले व मुलुक सरकारी मामलती समधे आहे सचिवीस सरजाम व इनाम वगैरे आहे त्यास हुजूर सातार्याहून माहाराज आज्ञा करितील त्याप्रमाणे चालावे वरकड कलमे सदर लिहिलेप्रमाणे निमे निमे घ्यावी उभयतानी तटा न करिता एकविचारे चालावे छ २१ जमादिलाखर
→ पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
(हुजूर सातारियास याद समजाविली तिची नकल घेतली असे दफ्तरातून सरकार परवानगी राजाज्ञा व सुभेदार यास सरकारातून प्रभूचे वतन कसे दिल्हे ही अडती लाविली तेव्हा त्यास दाखविली)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २९७
श्री १६४१ फाल्गुन शुध्द ४
राजमान्य राजश्री दताजी सिवदेव राजाज्ञा यासि आज्ञा केली ऐसि जे कृष्णाजी दादाजी व येसाजी सदादाजी प्रभु देशपांडे व कुलकर्णी ता। वेलवडखोरे ता। रोहिडखोरे याणी हुजूर येऊन विदित केले की ता। मजकूरचे देशकुलकर्णाचे व गावकुलकर्णाचे वतन पुरातन आपले आजे नरसो सास प्रभु यासि पुत्र नाही ह्मणोन त्यानी आपले तीर्थरूप दादाजी नरसिह यासी दत्तपुत्र चौघाचे साक्षीने घेऊन वतनास अधिकारी केले नरस प्रभु वारल्यावर दादाजी नरसीह वतनचा भोगवटा करीत आले त्याजवर औरंगजेब पातशाहाची राजक्रांत जाली त्याजमुळे वतनावरून आपले वडिल दादाजी नरसिह परागंदा जाले ते समई कैलासवासी सक्राजी नारायण सचिव याणी चदीस कैलासवासी माहाराजास लेहून पाठविले जे हरदु तर्फेचे देशपांडियाचे नकल जाले बेवारीस वतन आपल्या बाहाल करून द्यावे त्याजवरून माहाराजानी चंदीहून वतनाची पत्रे करून पाठविली त्यापासून आपले वतन पंडित मशारनिले अनभवितात आमचे तीर्थरूप दादाजी नरसिंह वतनावर आल्यावर आपणासि सचिवपत जबरदस्तीने कजिया करू लागले येविसी मानसिग मोरे सेनापति याजवळून माहाराजास विनती केली तेव्हा माहाराजानी कागदपत्र मनास आणून दताजीपत यासि आज्ञा केली त्याजवरून पत मशारनिले याणी पतसचिव यासि सागून याचे वतन यास देवितो ह्मणून हुजूर करार करून आह्मास हाती धरून लेकराप्रमाणे वतन द्यावे ते न करिता तुह्मी नरस प्रभूचे दतक न ह्मणवावे अफलाद ह्मणवावे तुह्मास तीन गावचे कुलकर्ण व मौजे कारी र्ता। मजकूर येथे घरजागा व दोन टकियाचे सेत देतो ते खावून असावे ह्मणोन आपले तीर्थरूप दादाजी नरसिह व येसाजी दादाजी यासि राजश्री नारो पंडित व पताजीपत बोलू लागले ते याणी न ऐकिले ह्मणून उभयतास कोडून जबरदस्तीने सदरहूप्रमाणे कागद लेहून घेऊन मागील कागदपत्र होते ते हिरून घेतले त्यास माझा वतनासी कज्या नाही तर मजला तीन गाव कुलकर्णाचे व घर सेता देतो ते घेऊन समजणे का ह्मणतात बेवारस वतन ह्मणून लेहून वतन करून घेतले ते समई चदीस चौकसी काय जाली तरी माहाराजानी कृपाळु होऊन मनास आणून पंडित मशारनिले यासि आज्ञा करून माझे वतन मजला बाहाला करून देविले पाहिजे ह्मणून त्याजवरून याचे कागदपत्र पेशजी मनास आणिता हे नरस प्रभू देशपाडियाचे दत्तक खरे राजक्रातामुळे वतनावरून परागदा जाले ते समई सक्राजीपतानी चदीस माहाराजास लिहिले तेथे चौकसी व्हावी तर दूर देश त्यात राजक्रातीचे दिवस राज्यास उपयोगी जो जे लेहून पाठविल त्यास तसे करून द्यावे असे हि होत होते याजवरून पाहाता या गरिबाचे वृत्तीचा लोभ सक्राजीपती धरून केले तुह्मास आज्ञा केली तेव्हा तुह्मी याचे वतन याचे स्वाधीन करवितो ह्मणून बोलून हाती धरून घेऊन गेला आणि याजवरी जबरदस्ती करून कोडून कागद लेहून घेऊन तीन गाव कुलकर्णाचे व मौजे कारीस सेत व घर देतो ते घेऊन खाऊन राहणे ह्मणून राजश्री नारोपडित सचिव व तुह्मी ह्मणता हे उत्तम नाही पडित मशारनिले याणी या गरिबाचे वृत्तीचा लोभ न धरावा येविसी तुह्मी त्यास सागणे ते सागून याचे वतन सोडून याच्या स्वाधीन करीत ते करणे याचा बोभाट फिरून हुजूर येऊ न देणे पंडित मशारनिले याच्या भिडेने याच्या वतनास इस्किल न पडे ते करणे छ २ जमादिलावल सु॥ अशरैन मया अलफ वतन सोडून देवन सुदन आसा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २९६
श्रीनागेश १६४० वैशाख वद्य ६
.॥ मा। अनाम कृष्णाजी बाबाजी व येसाजी बाबाजी कुलकर्णी देहाये तर्फ भोर ता। रोहिडखोरे बि॥
मौजे करजिये १ मौजे सपानवाहल १ मौजे वावेघर १ यासि मताजी सर्जाराव जेधे देसमुख व नारो शकर व माहादाजी शकर देसकुलकर्णी ता। मजकूर सु॥ तिसा असर मया अलफ तुह्मास पुर्वी राजश्री सर्जाराव जेधे देसमुख ता। मा।र याणी नरस परभु पुर्वी देसकुलकर्णी होते त्याची अफलाद ह्मणौन सदरहू ती गावीची गावकुलकर्णे वतन दिल्हे ते तुमचे बाप बाबाजी परभु चालवीत होते त्यावरी अवरगजेब पातशाहा या राज्यावरी चालोन आले धामधुम जाली याकरिता तुमचे बाप परागदा होऊन गेले त्याउपर तुमचे बाप व तुह्मी कारीस येऊन दोन तीन साले राहिलेस आणि विनंती केली की सदरहू गावकुलकर्णाचे वतन आपल्या बापाने चालविले आहे ते आपले स्वाधीन केले पाहिजे ह्मणोन विनती केली त्यावरून तुह्मास विचारिले की पुर्वील वतनाचे कागदपत्र तुह्मापासी असतील ते दखल करणे तरी आपणासी काही कागदपत्र नाहीत गाव आपले हवाला करावे ह्मणोन त्यावरून सदरहू कुलकर्णे तुमचे हवाला केली असेत वंशपरंपरेने चालऊन या गावीचा हकलाजिमा व घरजागा पानवाहलेत पुरातन चालिला असेल तेणेप्रमाणे खाऊन वतनाची चाकरी करून सुखरूप राहाणे जाणिजे छ १९ जमादिलाखर