[ ४७२ ]
श्री
चिरंजीव राजश्री तात्या यास प्रति पुरुषोत्तम माहादेव आशीर्वाद उपरि. श्रीमंत स्वामीस पुरवणी पत्र लिहिलें आहे. त्यांत मजकूर की, अनवरुल्लाखान याजबराबर शाहअबदालीस हस्ती वगैरे सरंजाम पाठविला होता, तो कोठ्यापासून माघारे फिरून गेला. त्यास चिरंजीव देवराव माहादेव याजबा। हस्ती वगैरे सरंजाम पाठविल्यास सर्व गोष्टी उत्तमच होतील, ह्मणोन श्रीमंत स्वामीस लिहिलें आहे. तर, बनाव बनला तर, तुह्मी हें काम करून लौकरच आह्मापाशीं येणें. तुह्मीं शुज्यातदौलाकडील काम करूं ह्मणोन लिहिलें. त्यास, त्यापरीस हें काम उत्तम आहे. कळलें पाहिजे. कृपा करणार श्रीसमर्थ आहे. चिंता न करणें. सत्वर भेट होय ते सुदीन. हे अनेक आशीर्वाद. समस्तांस नमस्कार.