[ ४६८ ]
श्री.
पौ। छ १८ मोहरम
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यासी बापूजी माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ १ जिल्हेज मु॥ इंद्रप्रस्थ जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष. भवानीदास साहुकार बहुत मातबर भला माणूस श्री यात्रेउद्देशें जाणार. समागमें गरीबगुरबेहि चालतील. त्यास, मार्गाचें दस्तक वजीरमुमालिकाचे समागमें असलियां उपद्रव होणार नाहीं. धर्मकार्य आहे. करणें. जरूर केलेंच पाहिजे. त्यास, नवाबास अर्ज करून, यादिदास्त पाठविली आहे त्याप्रमाणें दस्तक हस्तगत होऊन ये, तो योग करावा. x t जे समयीं आपल्यास पत्र पावेल तेच समयीं दस्तक करून घ्यावे. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.