[४६७ ]
श्री. पौ छ १७ रबिलावर.
श्रियासह चिरंजीव राजश्री राजेराव दामोदर माहादेव यासी प्रति महाराजे बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद. उपरि येथील कुशल ता। छ १० माहे रबिलाखर मुकाम इंद्रप्रथ जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान विदित जालें. तुह्मीं लिहिलें कीं, प्राश्याचा बंदोबस्त करून येऊं. त्यास जिनस पाठविला आहे हा पावेल
१॥- तांदूळ खासे
८॥- तुरीची डाळ
।- दाळ मुगाची धोई
येणेप्रमाणें पाठविलें आहे, पावेल. * या दिवसां तुमचें पत्र येऊन वर्तमान कळत नाही. तरी, ऐसें न करावें. आणि लौकर तजवीस करून, हवालदार ठेऊन, उभयतां चिरंजिवांस मातुश्रीचे दर्शनास घेऊन यावें. त्यानंतर यांजला कुरुक्षेत्र यात्रा करवावी. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.