[ ४६९ ]
श्री.
राजश्रियाविराजित राजश्री यादो रंगनाथ गोसावी यासी.
स्नो। बापूजी माहादेव व दामोदर माहादेव. नमस्कार. उपरि. येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करीत जाणें. यानंतरः वो। राजश्री बाळंभट जावाई याजसमागमें भोजराज जमादार आ। १०, व उंटाचे सारवान, व घोडियाचे माणूस, ऐ॥ बारा माणसांचा मुशारा दुमाही येथें रबिलावलपरयंत चुकवून दिल्हा आहे. घोडा व उंट तेथें तुह्मीं ठेऊन घेतलियावर सारवान घोडियास माणसास दरमहा १० दाहा रुपये देत जाणें. आणि जमादार दाहा माणसानसी इकडे येईल, यास दुमाही याजला खर्चास तेथें देणें. दरमाहायाचा येणेंप्रोः जमादार रुपये ६॥- आ। १० पंचावन अर्ध; आणि दर रुपयीं कसूर काढोन खर्चास देऊन इकडे रवाना करणें. उंट, घोडे, आपले पागेस ठेवणें. जाणिजे. छ ५ सफर. बहुत काय लिहिणे ? हे विनंति.