[ ४७५ ]
श्रीवरद.
एक अर्जी पातशाहास, व एक पत्र मजिदुद्दौलास पा। कीं, याचें समाधान होय. याप्रों। तुह्मीं पत्र लिहून जलदीनें पो।; व पत्रें आणवणें. व आह्मी, न भेटल्याची नालिश पाटिलबावास लिहील. यास्तव जलदीनें पत्रें पों। कीं, त्याचें समाधान राहे. येथें बापूजी होळकरासी त्यासी वितुष्ट होवून बापूजी होळकर जैपुराहून दाहा कोसांवर आहे. पातशाहाकडे चाकरी करावयाचा जाबसाल आपले विद्यमानें आहे. परंतु बापूजी होळकरापाशीं माणूस नाहींत. जातीनसी नादान; यास्तव उपाय चालत नाहीं. पोटास देत असतां गोसावी, अनुपगीर व आंबाजी नजबखानाचे धाकें पातशाहाचे लष्करांत येत नाही. ते खातरजमा आमची पूर्वी जाली आहे. परंतु ते भयभीत फार ; व समय जैनगरीहून रुपये घ्यावयाचा, व नजबखानाकडून तलबेची बाकी घ्यावयाचा समय ! व, पातशाहाकडून तलबेचा रुपया देऊं ह्मणतात. तो घ्यावयाचा समय आहे. ईश्वर घेऊं नदे, यास उपाय काय ? उपदेश करीत आहों. पुढें आमलांत येईल तें लिहूं. श्रीमंतांची फौज जवळ नाही. ग्वालेरचा किल्ला किल्लेदार सोडून जाणार. नजबखानाकडे व पातशाहाकडे पैगाम लागला आहे कीं, किल्ला घेणें, गोहदकरास न द्यावा. वरकड जो येऊन रसीद देईल त्याचे स्वाधीन करावा, हें मानस ग्वालेरचे किल्लेदाराचें आहे. ह्मणून एक कारकून आंबाजींनीं नजबखानास भेटविला आहे. पुढें अमलांत येईल तें लिहूं. तुमचें पत्र बहूत दिवस न आलें. श्री कृपा करो; भेट होय तो सुदीन ! श्रीकृपा करणार समर्थ आहे ! अलीकडे सीख मथुरेपावेतों पावले. कोठेडीकर प्रतापसिंग डीग-अगरेकडे धूम करितो. नजबखान येथें पातशाहापाशीं आहे. पुढें अजमेरीस जाणें पातशाहाचें आह्मी मना केलें. माघारे दिल्लीस जातील, तें ( पातशाहास अर्जी श्रीमंताची पोटगीफलाखी याची मान्य केली. समाधान जालें. ) मागाहून लिहूं. चिरंजीव बालासाहेबास आशीर्वाद. श्रीकृपेनें भेट घडे ते सुघडी ! श्रीकृपा करो ! चिरंजीव सौ। राजाबाईस आशीर्वाद. श्रीकृपा करो ! समस्त मंडळीस नमस्कार. लोभ कीजे.