[ ५६६ ]
श्री.
राजश्री दामोदर साहेब गोसावी यासीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
जयाजी सिंदे दंडवत उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करणे. विशेष. तुह्मी पत्र पाठविले ते पावले. कामापावेतों आलों, पुढें वाट चालत नाहीं, स्वार पाठविले पाहिजेत, ह्मणोन लिहिलें. तर, श्रीमंत राजश्री दादासाहेबांनी लिहिलें असेल, त्याप्रमाणें वर्तणूक करणें. वाटेनें बहुत सावधपणें येणें. जाणिजे. छ ७ रा।खर. बहुत काय लिहिणें, हे विनंति.
( मोर्तब )
(सुद)
श्रीजोतिलिंगचरणीं तत्पर,
राणोजीसुत जयाजी सिंदे
निरंतर.