[ ५६९ ]
श्री.
पौ। छ ३ रजब.
राजश्री पुरुषोत्तम महादेव व देवराव महादेव गोसावी यासीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जावें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावून लेखनार्थ अवगत जाला; व कितेक अर्थ राजश्री कृष्णाजी हरी यांणी सांगितला तो सकल कळला. ऐसियासी, तुह्मी आपलें सर्व प्रकारें समाधान रक्षून आमचे भेटीस येणें. कोणेविसी फिकीर न करणें. रा॥ छ २ रजब. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तवसुद.
श्रीह्माळसाकांत चरणीं तत्पर,
खंडोजीसुत मल्हारजी होळकर.