[ ५६७ ]
श्री.
राजश्री दामोधर माहादेऊ गोसावी यासीः--
छ अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य
स्नो। मल्हारजी होळकर व राणोजी सिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करणें. विशेष. तुमचें पत्र ढवळपूरचे मुकामाचें आलें तें पावलें. खजाना समागमें आहे, कोणे रोखें यावें ? ह्मणून लिहिलें. ऐसियास, श्रीमंत व आह्मी सर्व फौज एकत्र जाली आहे. तुह्मास श्रीमंतांनीं सिरोजेचे सुमारे बोलाविलें आहे. सरकारचें पत्रही पाठविलें असे, त्यावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. ( मोर्तबसुद )
श्रीजोती-
लिंग चरणीं तत्पर,
जनकोजीसुत
राणोजी सिंदे
निरंतर.