[ ५६१ ]
श्री.
पौ। छ २ माहे सफर.
राजश्री बापूजी माहादेव व ता। राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासी:-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशळ जाणून स्वकीय कुशळ लिहीत जाणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावोन भावार्थ कळों आला. दिल्लीकडील वर्तमानः-- मालिक नवाब सफदरजंग यांजकडील कुशलवृत्त श्रवण होऊन संतोष जाला. पुढें सुभियाच्या बंदोबस्ताकारितां जाणार, ह्मणून पत्री लिहितां. त्यासी, काय मनमुबा ठहरला ? समजावीस जाली किंवा काय विचार ? तो तत्वतां लिहून पाठविणें. वरकड अर्थ पुरवणी पत्नीं तुह्मी लिहिला होता; त्याचें प्रतिउत्तर आलाहिदा पत्रीं आहे, त्यावरून कळो येईल. राव उभयता बंधूंचें स्वारस्य होऊन जलदीनेंच कूच होऊन, जिकडे जावयाचा निश्चय ठहरेल, तेणेंप्रो। तुह्मांस लिहून. छ २५ मोहरम. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
( मोर्तबसुद.)
श्रीह्माळसाकांत चरणीं तत्पर
खंडोजीसुत मल्हारजी
होळकर.