[ ५६२ ]
श्री.
राजश्री दामोदरपंत गोसावी यासी :-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. तुह्मी गेला, तेव्हां बरोबर कनीराम हेही आले आहेत. त्यास, रोज माधोसिंग याजकडील जाबसाल, जो असेल तो, मशारनिलेच्या हातून करवीत जावा. दिवाण हरगोविंद याजला राजे माघोसिंग याच्या जाबसालांत न आणावें. तो लबाड, त्याच्या बोलण्याचा विश्वास नाहीं; याजकरितां जैपुरचा जो जाबसाल असेल, तो कनीरामजीच्या विद्यमानें करीत जाणे. रा॥ छ १६ मोहरम. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तबसूद.
श्रीह्माळसाकांत चरणीं
तत्पर, खंडोजीसुत
मल्हारजी होळकर.