Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३०२.
श्री. १७१० आषाढ वद्य १०.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित वाजपेययाजी स्वामींचे शेवेसीं:-
विद्यार्थी बाळाजी जनार्दन सांं नमस्कार विनंति. येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष आपण राजश्री सदाशिव अनंत या समागमें पत्र पाठविलें, तें प्रविष्ट होऊन लिहिला अर्थ कळला. ऐशीयास राजश्री धोंडो बल्लाळ आपल्याकडील कामकाजाबद्दल येथें होते. त्याजवरून प्रसंगानुरूप तूर्त एक गांव हजार रुपयाचा, पा। सिरालें पैकीं, आपणास देविला आहे. व पा। सांगोलें येथील सन समानचे वर्षासनापैकीं पांचशें रुपये राजश्री विसाजी कृष्ण याजकडे राहिले होते ते त्यास सांगोन देविले आहेत, प्रविष्ट होतील. रा। छ २४ सवाल. बहुत काय लिहिणें? * लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ४२ ] श्रीभवानीशंकर. ४ अक्टोबर १६९१.
नेमपत्र हजीर मजालसीयानी, मुकाम किले सातारा, सु ।। इसने तिसैन अलफ बतेरीख छ २१ माहे मोहोरम, आश्विन वदि अष्टमी रविवासरे प्रजापति नाम सछरे बेहुजूर शके १६१३ प्रजापति नाम छवछरे कार्तिक सुध त्रयोदशी मंदवारः-
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
या विदमाने लेहून दिल्हे नेमपत्र ऐसे जे राजश्री रामचद्र नीळकठ गोसावी यासी कृष्णाजी बुलगो व मल्हारजी बुलगो व गोमाजी बुलगो व बावाजी शिवदेव व राघो शिवदेव व मल्हार शिवदेव देसकुलकर्णी व गावकुलकर्णी व जोतिषी पा। खटाऊ सु।। इसन्ने तिसैन अलफ आपले वडील पुरातन मिरासीदार पिढी दर पिढी खात असता, दरम्यान कथळा करून विसाजी काशी व विठ्ठल होणाजी अथर्वण यानें कथळा करून कृत्रमी कागदपत्र करून वतनास खलेल करितो. दोनी चारी वेळा झाडाझाडी करून खोटा ऐसे खळकास वा हक्कदामशाह यांसी जाहीर असतां लाच देऊन जोरावरी करितो. आपण बेतकवी, खावयास नाहीं, भाऊ बंद तमाम माणसें दुकाळेनें अर्धली जाहाली; व गनीम मोगल वरजोर ठाणें देऊन पा। मजकुरीं बैसला त्यास माहादाजी निंबाळकर याचे कारकीर्दीस आह्मीं पांढरीवरी हजीर जाहालों हरदोजणांचा निवाडा जाहाला. अथर्वण खोटा जाहीरला, आणि कथळा करितो, ऐसे निर्वाह सर्वांच्या मुखीं जाहाला. कागदपत्र होवे, जमानिता कराव्या, पेस्तर बिलाहरकत न व्होवी, ऐसा तह जाहाला, तो अगदीं टाकून, अथर्वण विजापुरास जाऊन, लाच देऊन, लुस्पत देऊन, अगदींच आह्मांस मारावें, नांव कुलीं घ्यावयास नाहीं, ऐसे कागदपत्र करून पा। मजकुरास आला. आह्मांस धरावें ऐसा विचार पुरता केला. तो आह्मास कळला. व माहादाजी निंबाळकरास ही पादशाह याचे तलब रोखा आला. आह्मास कोणाचा असीरा नाहीं. हुजूर पादशाहानजीक जावें तरी आपण बेतकवेदार, आणि अथर्वणांनीं हुजूर भाविलें जे, राजश्री छत्रपती स्वामीचे दरबारीं मल्हार बुलगो व बावाजी सीवदेव यांस पंचहजारिया सांगितल्या आहेती, परगणे मजकुरावरी चाली करिताती, वतन आपलें बळेंच ह्मणताती. ऐसे किताका खेसीनें हुजूर गोष्टी भाविल्या आहेती. याकरितां आमचे पोटीं धास्ती पडिली व गाठोळीच्या बळें व गवसाळा करून, हुजूर पादशाह यानजीक जाऊन आपलें वर्तमान वतनाचें साकल्य जाहीर करावें तरी आपण गैरमहसरदार. याकरितां गनीमाचे दिवाणांत जावेना मग, वतन अथर्वणमजकूर जोरीनें खातो, गोतांत न ये, गनीमाची पाठीवर जोर केली, आपणास कोठें टिकों देईनातसारखें जाहालें. मग आपण डोईत धुळी घालून स्वामीपाशीं आलों. ऐसियांस, आपली व स्वामीची भेटी न व्हे, आपण निराश्रि ( त ), असीरा नाहीं. ऐसे चितन करीत दरबारीं बैसलों होतों. तों काशीराम कुलकर्णी, मौजे कांभेरी, किल्ले परळी यानीं आपणास विचारिलें जे, तुह्मीं कोणे गोष्टीअस्तव विशाळगडास का आला ? मग आपण त्यास बोलिलों जे, आपलें वतन अथर्वण बळें खाताती, भाऊबंद बेतकवी पडले, दावा दद न चले, यास्तव आपले वतनास व आपल्या जीवास कोणी त-ही धणी कासीपतो जाहालियावेगळे जीव वाचत नाही, वडिलाचे वतन सुटेना, ऐसा विचार आपला आहे, याकरिता दरबारास आलो ऐसियास, काशीराम आपणास बोलिले जे, तुह्मी भेऊ नका, परमेश्वर बरेच करील, आजीउदियात राजश्री पत अमात्य स्वामीची भेटी करून देऊन, मग तुमचा उदित काळ असल तरी बरेच होईल ऐसे बोलोन ते आपले बिराडास गेले आपण ही बिराडास गेलों दुसरे दिवशीं काशीराम यानी स्वामी ( स ) विदित केले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ४१ ] श्री. ११ मे १६९०.
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके २५ प्रमोदिनाम संवत्सरे वैशाख शुद्ध चतुर्दशी भौमवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति याणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री नारोपंडित यांस आज्ञा केली ऐसी जे :- तुह्मीं स्वामीच्या दर्शनाकारणे येत आहां प्रस्तुत प्रभावळीस आलेस ह्मणोन कळों आलें ऐसियास तुह्मी स्वामीचे दर्शनास आलेस उत्तम गोष्टी केली तुमची स्वामीची भेटी सुमुहुर्ते व्हावी लागते. त्यास, उदईक दिनशुद्धी नाहीं आणि स्वामीही राजापुरास जाणेंकारणें प्रतिपदेस स्वार होऊन येत आहेत तरी तुह्मी तेथेच राहाणे स्वामीही येतील. तुमची व स्वामीची भेटी प्रभावळीसच होईल तुह्मी यावयाची त्वरा न करणे बहुत लिहिणें तरी तुह्मीं सुज्ञ असा.
मर्यादेयं
विराजते
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ४० ] १६ मार्च १६८६
श्रीमहालक्ष्म्यैनम:
श्रीत्र्यंबकेश्वर
.ll श्रीसकलगुणालकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री देशमुख देशपाडे व ज्योतिषी व उपाध्ये व समस्त वेदमूर्ती, वस्ती कसबे हरसूल, प्रांत अवरंगाबाद व समस्त महाराष्ट्र कोकण देशस्थ विद्वद्वैदिक गृहस्थ गोसावी यांसीः-
पौष्य उपाध्ये व मोरेश्वर पडितराव आशीर्वाद अनुक्रमे नमस्कार उपरि गगाधर रगनाथ कुळकरणी कसबे हरसूल हा ब्राह्मण मोंगलापाशी सेवेसी होता कित्येक दिवस चाकरी करीत असता मोगली यावरी बलात्कार करून बाटविला भ्रष्ट करून यास तीन महिने बदखानी निर्बध ठेविला होता. तेथें यवनासी अन्नोदकससर्ग घडला त्यानंतर यास भाग्य अडीचसेहें मनसब देऊन चाकर करून ठेविला पांच वर्षे चाकरी करीत होता स्नानसंध्यादिक कर्मे करिता नयें, यास्तव राहिले पांचा वर्षांत अन्नोदकसंसर्ग केला नाही. दौलत करीत असतां भाग्याचें सुख टाकून, अत:करणी अनुताप मानून, आपले जातींत यावे यास्तव दौलत संपत्ती सर्व टाकून, अनुतापास्तव राजश्री छत्रपती स्वामीपाशीं रायगडास येऊन, एक वर्ष गंगाधर रंगनाथ दरबारीं आपणास प्रायश्चित्त द्या ह्मणऊन सरकारकून व न्यायाधीश व उपाध्ये व दानाध्यक्ष व भलेभले ब्राह्मण व समस्त आपले ज्ञातीस शरण येऊन, प्रायश्चित्त मागत होता त्याउपरि राजश्री समस्तराजकार्यधुरंधर वर्णाश्रमधर्मप्रतिपालक राजश्री छदोगामात्य स्वामी यास सर्व वर्तमान विदित जालें त्यानंतर त्यांहीं ब्राह्मणाचे कष्ट व अनुताप बहुत देखोनी राजश्री छत्रपती स्वामीस याचा वृत्तांत विदित केला. छत्रपती कृपाळू होऊन प्रायश्चित्त द्यावयासी आज्ञा दिल्ही त्याउपरि आह्मीं राजश्री छंदोगामात्य यांचे सभेसी समस्त विद्वद्वैदिक ब्राह्मणाचे संमतीनें मिताक्षरादि निबंध पाहोन, प्रायश्चित्त निर्वाह करून, गगाधर रंगनाथ यासी प्रायश्चित्त संकल्प सांगोन, श्रीयात्रेस, पाठविला. तेथें श्रीगिरिप्रदक्षिणा तीनशें साठी व यात्रा दोनी इतुके चतुर्विशत्यब्द प्रायश्चित्त पूर्वोत्तरांगसहित गंगाधरे केलें यथाशास्त्र प्रायश्चित्त विध्यक्त प्रकारें केलें. श्रीक्षेत्री समस्त धर्माधिकारी आदिकरून ब्राह्मणसगतीने तीर्थविधि करून, ब्राह्मणभोजन करून, अन्नप्रसादपंक्तीस गेतला. शुद्विभोजनें व प्रायश्चित्तप्रदक्षणा यथाविधि केला, ह्मणऊन श्रीक्षेत्रींच्या ब्राह्मणांचीं पत्रें व देशाधिकारी यांचीं पत्रें घेऊन आह्मापाशी आला पत्रें आह्मासी दिली. उपरि यथाविधि प्रायश्चित्त पूर्वोत्तरांगसहित निर्गमिले ऐसे वर्तमान राजश्री छंदोगामात्य गोसावी यांसी विदित केलें. त्याहीं पत्रें मनास आणून समस्त कारकून व न्यायाधीश यांच्या अनुमतें आह्मास आज्ञा केली जे गंगाधर रंगनाथ यास आपले पंक्तीस भोजन देऊन शुद्धिपत्र देणें ह्मणऊन. त्यावरून आह्मी आपले पंक्तीस भोजन देऊन यासी शुद्धिपत्र दिलें हा ब्राह्मण शुद्ध जाला, संव्यवहार्य जाहाला याउपरि यासी तुह्मी अन्नोदकादि व्यवहार यथापूर्व करीत जाणें जो कोण्ही याचा ब्राह्मण्याविषयी सदेह मानील तो देवब्राह्मणद्रोही महापातकी जाणिजे शके १६०८ सोळा शतें आठ, क्षय सवत्सर, चैत्र शुद्ध द्वितीया, भौमवार हे विज्ञप्ती मोर्तब.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३०१
श्री. १७१० ज्येष्ठ वद्य ६
दस्तक सरकार राजश्री पंतप्रधान ता। कमाविसदारान व चौकीदारान व बाजेलोकान व मोकदमान देहाय नावाडे वळेकरकेरी सु।। तिसा समानीन मया व आलफ. सरकारची जासूदजोडी पुंजाजी नाईक कामगारीस रवाना केली असे. तरी, मार्गी जातां येतां कोणेविसी मुजाहिम न होणें, नदीनाले पार करणें. जाणिजे. छ. १९ रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३००
श्री १७१० वैशाख शुद्ध ६
वेदशास्त्र-संपन्न राजश्री सदाशिव दीक्षित वाजपेययाजी स्वामीचे सेवेशीः-
विद्यार्थी बाळाजी जनार्दन सांं नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहित जावें. विशेष. तुम्ही चैत्र वद्य सप्तमीचें पत्र पाठविलें तें पावलें, वैशाख–मासीं राजश्री पंतप्रतिनिधी यांचे विवाहाकरितां क-हाडास येणार, असें ऐकिलें. त्यास, येते-समई सातारि-यास येऊन श्रीमंत माहाराज छत्रपती यांचे व श्रीमंत आईसाहेब यांचे दर्शन घेऊन जावें. त्यांचा हेत आपले भेटीविसी बहुत आहे. मार्गशीर्ष-मासीं आम्हीं आपले भेटीकरितां मेणवलीस आलों होतो, त्यासमई श्रीमंताचे येण्याविशीं बोलिलों होतों. त्यास, श्रीमंतांचे येण्याचा अर्थ आपण घडवीतील त्या समई घडेल, परंतु आपले येणें याप्रांतीं आहे, त्याअर्थी सातारियास येऊन राजदर्शन करून जावें, म्हणोन लि. तें सविस्तर कळलें, त्यास, सातारियास * यावयाचे होतें. परंतु, राणी वारल्याचें वर्तमान आलें. त्यास, बहुता दिवसीं येणे तें सुतकामुळें दूर बसावें, मजुरा करतां नये हे ठीक नाहीं, याकरतां न आलों. परभारे क-हाडास जातों. आपणास कळावें. रा। छ ४ साबान, लोभ असों द्यावा. हे विनंति.
पो वो शुद्ध ७ सोमवार सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २९९
श्री १७०१ वैशाख शुद्ध २
(अस्सल व नकल)
यादी सिद्धेश्वर महिपतराव यांचे तीर्थरूप माहिपतराव विश्वनाथ मृत्य पावले. सबब मशारनिल्हेचे पुत्र यांचे नांवें सरंजाम पेशजी महिपतराव विश्वनाथ यांजकडे चालत होता त्यापैकीं सालमजकुरापासून करार. सु।। समान संमाननि मया व अलफ.
सालीना रुपये.
१०००० खासा तैनात पेशजीची बेरीज पै।। ४००००
७००० कारकून मंडळी पेशजीप्रों दरकदार वगैरे.
१००० शागिर्दपेशा पेशजी रु. ३००० पौ.
३६००० पागा व पथक.
२१००० पागेकडे सरंजाम पेशजी पंचवीस स्वारांचा साडेबारा हजारांचा होता. त्यास पागा जाली. सबब पेशजीची बोली दूर करून, पागेकडे मोघम चंदी लागवड बद्दल मुशाहिरा वगैरे मिळोन.
१२५०० कदीम
८५०० जाजती
--------------
२१०००
१५००० सरंजामी स्वार ५० दर ३०० प्रों.
-------------
३६०००
२५०० हत्ती सरकारचा रतीब लागवड बदल मोघम.
---------------
५६५००
छप्पन हजार पांचशें सरंजामाची बेरीज ठरली. त्यास, सदरहूप्रमाणें लाऊन दिल्हा असे. येणेंप्रमाणें करार करावे.
करार--
सरंजामास महाल लाऊन दिल्हे खेरीज तैनात
आहेत त्यास याजकडे वसूल सुरळीत १ इनामी गांव मौजे कारी, ता। वंदन
देणें, म्हणोन सनदा व ताकीदपत्रें प्रो वाई.
देवावीं. देणें. १ खेरीज तैनात मौजे न-हे ता०
कुरणा पौ गवत एक लक्ष कर्यात मावळ.
द्यावयाचा पेशजी प्रो नेमून द्यावें. येणें ---
प्रो करार करून चिठी देवावी. देणें. २
किता कलमें दोन गांव चालविणें. येणेप्रो
१ मौजे घोरपडी, तालुका हवेली करार करून गांवास ताकीदपत्रें देवावीं.
प्रांत पुणें जमीन बिघे १० देणे.
१ मौजे भिवंडी, तो कडेपठार, असाम्या पेशजीप्रमाणें
पौ पेशजी प्रो. १ किले नगर येथील मजमू.
-------- १ किले त्रिंबक येथील सबनिसी.
२ १ किले बेळगांव येथील सबनिसी.
सरंजामाचें कलम सालमजकुरापा- ------
सुन, म्हणोन लिहिलें आहे. त्यास ३
साल गुजरलें. याजकरितां, पेस्तरसा तीन आसाम्या करार करावे, वे
लापासून करार करून सनदा घ्याव्या. तन पेशजीप्रो। पावीत जावें, म्हणोन
येणें प्रो करार करावे. करार पागेच्या सनदा देवाव्या. देणें.
ठाण्याचे गाव छ ३० रजब सन समान वैशाख
१ मौजे वडाले, पौ। कांहीं. सनदा लिहिणें.
१ मौजे कुंभारगांव, पौ इंदापूर,
येणेंप्रमाणें करार केला असे. छ ३० रजब, सु।. समान समानीन मया व अलफ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २९८
श्री. १७०९ माघ शुद्ध ५
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री महिपतराव कृष्ण गोसावी यांसीः-
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार. सुहुरसन समान समानीन मया व अलफ. तुम्हीं विनंतिपत्र व मकरसंक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले ते प्रविष्ट जाहाले. रा। छ ४ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लेखन सीमा. ( पौ ) माघ शुद्ध १० मंदवासर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २९७
श्री. १७०९ कार्तिक शुद्ध ७
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री महिपतराव कृष्ण गोसावी यांसीः-
सेवक माधवराव नारायणप्रधान नमस्कार. सुहूरसन समान समानीन मया व अलफ, तुह्मीं विनंतिपत्रें पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. लिहिला मजकूर अवगत जाहाला. शरीर प्रकृत चांगली आहे म्हणून लिहिलें, तें कळलें, तीर्थरूप मातुश्री ताईची रवानगी लौकरच करण्यांत येईल. रवाना छ ६ सफर, बहुत काय लिहिणे ? लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २९६
पो छ १ सफर श्री ‘लक्ष्मीकांत’'. १७०९ आश्विन शुद्ध ५
सन समान समानीन, कार्तिक १७०९
राजश्री हरीपंत तात्या गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रो रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. येहतिशाकजंग याजबाबत किस्तबंदीचे ऐवजाकरितां वारंवार आपलीं पत्रें आलीं. त्यास त्या ऐवजी येथून साडेतीन लक्ष रुपयांचा भरणा राजश्री रामचंद्र गंगाधर ओंकार यांचे दुकानीं केला आहे. मुदतीप्रों मा।रनिले ऐवज देतील. याजप्रो घेऊन पावलियाचें उत्तर पाठवावें. रा। छ ४ माहे मोहरम. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंती. मोर्तबमुद शिक्का ( पूर्वी दिल्याप्रमाणें ).