पत्रांक ३०१
श्री. १७१० ज्येष्ठ वद्य ६
दस्तक सरकार राजश्री पंतप्रधान ता। कमाविसदारान व चौकीदारान व बाजेलोकान व मोकदमान देहाय नावाडे वळेकरकेरी सु।। तिसा समानीन मया व आलफ. सरकारची जासूदजोडी पुंजाजी नाईक कामगारीस रवाना केली असे. तरी, मार्गी जातां येतां कोणेविसी मुजाहिम न होणें, नदीनाले पार करणें. जाणिजे. छ. १९ रमजान.