[ ४० ] १६ मार्च १६८६
श्रीमहालक्ष्म्यैनम:
श्रीत्र्यंबकेश्वर
.ll श्रीसकलगुणालकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री देशमुख देशपाडे व ज्योतिषी व उपाध्ये व समस्त वेदमूर्ती, वस्ती कसबे हरसूल, प्रांत अवरंगाबाद व समस्त महाराष्ट्र कोकण देशस्थ विद्वद्वैदिक गृहस्थ गोसावी यांसीः-
पौष्य उपाध्ये व मोरेश्वर पडितराव आशीर्वाद अनुक्रमे नमस्कार उपरि गगाधर रगनाथ कुळकरणी कसबे हरसूल हा ब्राह्मण मोंगलापाशी सेवेसी होता कित्येक दिवस चाकरी करीत असता मोगली यावरी बलात्कार करून बाटविला भ्रष्ट करून यास तीन महिने बदखानी निर्बध ठेविला होता. तेथें यवनासी अन्नोदकससर्ग घडला त्यानंतर यास भाग्य अडीचसेहें मनसब देऊन चाकर करून ठेविला पांच वर्षे चाकरी करीत होता स्नानसंध्यादिक कर्मे करिता नयें, यास्तव राहिले पांचा वर्षांत अन्नोदकसंसर्ग केला नाही. दौलत करीत असतां भाग्याचें सुख टाकून, अत:करणी अनुताप मानून, आपले जातींत यावे यास्तव दौलत संपत्ती सर्व टाकून, अनुतापास्तव राजश्री छत्रपती स्वामीपाशीं रायगडास येऊन, एक वर्ष गंगाधर रंगनाथ दरबारीं आपणास प्रायश्चित्त द्या ह्मणऊन सरकारकून व न्यायाधीश व उपाध्ये व दानाध्यक्ष व भलेभले ब्राह्मण व समस्त आपले ज्ञातीस शरण येऊन, प्रायश्चित्त मागत होता त्याउपरि राजश्री समस्तराजकार्यधुरंधर वर्णाश्रमधर्मप्रतिपालक राजश्री छदोगामात्य स्वामी यास सर्व वर्तमान विदित जालें त्यानंतर त्यांहीं ब्राह्मणाचे कष्ट व अनुताप बहुत देखोनी राजश्री छत्रपती स्वामीस याचा वृत्तांत विदित केला. छत्रपती कृपाळू होऊन प्रायश्चित्त द्यावयासी आज्ञा दिल्ही त्याउपरि आह्मीं राजश्री छंदोगामात्य यांचे सभेसी समस्त विद्वद्वैदिक ब्राह्मणाचे संमतीनें मिताक्षरादि निबंध पाहोन, प्रायश्चित्त निर्वाह करून, गगाधर रंगनाथ यासी प्रायश्चित्त संकल्प सांगोन, श्रीयात्रेस, पाठविला. तेथें श्रीगिरिप्रदक्षिणा तीनशें साठी व यात्रा दोनी इतुके चतुर्विशत्यब्द प्रायश्चित्त पूर्वोत्तरांगसहित गंगाधरे केलें यथाशास्त्र प्रायश्चित्त विध्यक्त प्रकारें केलें. श्रीक्षेत्री समस्त धर्माधिकारी आदिकरून ब्राह्मणसगतीने तीर्थविधि करून, ब्राह्मणभोजन करून, अन्नप्रसादपंक्तीस गेतला. शुद्विभोजनें व प्रायश्चित्तप्रदक्षणा यथाविधि केला, ह्मणऊन श्रीक्षेत्रींच्या ब्राह्मणांचीं पत्रें व देशाधिकारी यांचीं पत्रें घेऊन आह्मापाशी आला पत्रें आह्मासी दिली. उपरि यथाविधि प्रायश्चित्त पूर्वोत्तरांगसहित निर्गमिले ऐसे वर्तमान राजश्री छंदोगामात्य गोसावी यांसी विदित केलें. त्याहीं पत्रें मनास आणून समस्त कारकून व न्यायाधीश यांच्या अनुमतें आह्मास आज्ञा केली जे गंगाधर रंगनाथ यास आपले पंक्तीस भोजन देऊन शुद्धिपत्र देणें ह्मणऊन. त्यावरून आह्मी आपले पंक्तीस भोजन देऊन यासी शुद्धिपत्र दिलें हा ब्राह्मण शुद्ध जाला, संव्यवहार्य जाहाला याउपरि यासी तुह्मी अन्नोदकादि व्यवहार यथापूर्व करीत जाणें जो कोण्ही याचा ब्राह्मण्याविषयी सदेह मानील तो देवब्राह्मणद्रोही महापातकी जाणिजे शके १६०८ सोळा शतें आठ, क्षय सवत्सर, चैत्र शुद्ध द्वितीया, भौमवार हे विज्ञप्ती मोर्तब.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)