पत्रांक ३०२.
श्री. १७१० आषाढ वद्य १०.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित वाजपेययाजी स्वामींचे शेवेसीं:-
विद्यार्थी बाळाजी जनार्दन सांं नमस्कार विनंति. येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष आपण राजश्री सदाशिव अनंत या समागमें पत्र पाठविलें, तें प्रविष्ट होऊन लिहिला अर्थ कळला. ऐशीयास राजश्री धोंडो बल्लाळ आपल्याकडील कामकाजाबद्दल येथें होते. त्याजवरून प्रसंगानुरूप तूर्त एक गांव हजार रुपयाचा, पा। सिरालें पैकीं, आपणास देविला आहे. व पा। सांगोलें येथील सन समानचे वर्षासनापैकीं पांचशें रुपये राजश्री विसाजी कृष्ण याजकडे राहिले होते ते त्यास सांगोन देविले आहेत, प्रविष्ट होतील. रा। छ २४ सवाल. बहुत काय लिहिणें? * लोभ असो दीजे. हे विनंति.