Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २७६
श्री. १७०५ माघ शुद्ध १३
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित वाजपेय याजी स्वामीचे सेवेशीः--
विद्यार्थी बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें, विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें.
लिहिला मजकूर सर्व कळला. मकरसंक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाटविलें ते पावले. स्वीकारले. फडतरे याजकडील ऐवजाविशींचा मजकूर लिहिला तो कळला. त्यांस, येविशीं फडतरे यास ताकीद करून ऐवज देविला जाईल. रा। छ १२ रौवल. लोभ असों द्यावा. हे विनंति.
पौ। फाल्गुन शु।। ६ शके १७०५
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २७५
श्री १७०४ मार्गशीर्ष शुद्ध ५
राजश्री रघोजी आंगरे वजारत-माब सरखेल गोसावी यांसीः-
सकलगुणांलकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माधवराव नारायण प्रधान आशीर्वाद विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहीत जावें. विशेष. सरकारांत लग्नाचे साहित्याबद्दल सर्वांप्रमाणें तुम्हांकडे ५०००० पन्नास हजारांची नेमणूक केली असे. तरी सदर्दू ऐवजाचा भरणा सत्वर हुजूर करावा. जाणिजे, छ ५ मोहरम, सारा सलास समानीन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती लेखन सीमा. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २७४
श्री १७०४ चैत्र
राजश्री सखाराम हरी यांसीः-
आशीवाद उपरी, बारभाईकडून संदर्भाचा मजकूर लिहिला. पांचांचे परगणे देणार, हजार फौजनशीं आपा अथवा जो यांतील मर्जीस येईल तो ठेऊन द्यावा, या अन्वयें लिहिलें. त्यासी, आह्मीं गंगातीरीं एकटें रहावें. त्यांण सारा दवलतीचा कारभार जवळ करावा. तेव्हां कोणाशीं बोलावयास कामास नये. रिकामें बोललों तरी तेंच निमित्य ठेऊन त्या माणसास धरून नेऊन पारिपत्य करावे. किल्यावर घालावें, तेव्हां आम्हांस राग यावा. राजकारण तरी करूं नये. ऐसें नाना उपद्रव सोसून रहावें, त्यापेक्षां दूर असावें. तेणेंकरून आह्मांस वाईट वाटणार नाहीं, त्यासही आमचें भय नाहीं. जवळ राहिल्यास परस्पर भय. निमित्य ठेऊन, आमचे माणसांचीं पारपत्यें करणार. याविशींचे अनुभव पूर्वी बहुत भोगिले आहेत. ते पांच देणार ते येथेंच पाठविले तरी काय वाईट ? आमचे मनांत भडोच अथवा सुरतेस नर्मदातीरीं रहावें ! बारभाई सरळ चालले तरी रणगची मर्जीची जागा आहे तेथे राहूं. आह्मां जवळ त्यांचे फौजेचं काय प्रयोजन ? तथापि पांचचारशें आमचे ममतेचे लोक राहिले तरी काय चिंता आहे ? तुफानें घ्यावयायोग्य, मात्र नसावें! आमचा खर्च निदान, दवलत सोडिली तरी, लक्ष रुपये दरमहा पाहिजेत, इतकें कांहीं त्यांस बहुत नाही. आम्हीं, मूल गंगाबाईचा खराच असल्यास, निमे दवलतेचे खावंद. तेथे बारा लक्ष बहुत नाहींत. तथापि ते लोभाविष्ट यास्तव, पांच देतात तितकेच घेऊन नर्मदातीरीं राहूं. आम्हांजवळ चौकी दाखल लोक नलगेत, चाकरीचे रीतीनें हजार पांचशें राहिले तरी राहोत. आपा राहिल्यास उत्तम आहे. परंतु येथील हुकुमाप्रों चालावें. असो. आह्मी ल्याहावें त्यांत व बारभाईचे बोलण्यांत अस्मान जमिनीची तफावत ! दहावीस मराठे व कारभारी मध्यें येतील, आपली खातरजमा करितील, ह्मणोन लिहिलें. तरी ते दरमजल देशाकडे जातात. आह्मी सुरतेंत आहों. दिवसेंदिवस लांबण पडते. तेव्हां त्यांची आस्था किती आहे, हें कळतच आहे ! मन्हाटेही रा। मल्हारजी होळकराप्रों। कोणी नाहींत. तथापि आहेत त्यांत चाकर मातबर मिळोन खातरजमा करितील, तरी पुढे सख्याचा मजकूर पडेल, तूर्त आह्मीं अंगरेजांचे पेट्यांत सुखरूप आहों! थोडेंबहुत खर्चास देतीलच. येथें कांहीं उपद्रव आह्मांस नाहीं. तिळमात्र बंदी नाहीं. मोकळे आहों, व सुखरूप आहों ! बरसात येथेंच होईल. पुढें जें नेमिलें तें होईल. सारांश, येथील सुखापेक्षां तेथें अधिक सुख वाटेल तरी येऊं. दाटून सुख टाकून दुःखांत कोण पडतो ? छ १० रा।खर,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २७३
श्री नक्कल १७०४.
रु।।
१६२६९०००
पैकीं वसूल रु।।
५९१६००० सन अर्बा सबैन पासोन ता। सन सबा. सालें ४
२९५८००० गोविंदराव यांच्या दंग्यामुळें दरोबस्त वसूल त्याजकडे पडला. सबब सरकारी देणें तें साल २ २९५८०००मा।निले अमदाबादेस राहिले. महीपारचा अमल त्यांनीं केला व सुरत अठाविशींत नेहमीं फौज त्यांत कडील राहिली; सबब माहालीं आकार न जाहला.
------------------
५९१६०००
२५००००० इंग्रजांचे दंग्यांत व श्रीमंत दादासाहेब यांजकडे सन खमस सबैन, दरबारचा खर्च वगैरे सुद्धां. १६००००० कित्ता
७००००० अमदाबाद आपले स्वाधीन करून
घेतली ते समई,
२००००० अमदाबादेस पलटण होतेममम ते काढावयास दिल्हे.
-------------
२५०००००
३५००००० भडोच इंग्रजांनी घेतली इ।। खमस सबैन ता। अर्बा समानीन सालें सुमारी १० दहा.
११६६००० वसूल सरकारांत पावला अजमासें.
५००००० वि।। अंताजी नागेश सन सबा सबैन,.
३००००० राजश्री बाळाजी नाईक. भिडे यांजकडून भरणा.
२००००० गु।। घनशाम नारायण मा। गोविंद गोपाळ.
-----------
५०००००
१६०००० मा गोविंद गोपाळ, सन इहिदे.
१००००० कापड
५०००० सन इसने.
५०००० सन सलास.
------------
१०००००
११५००० हरीभक्ति, सन सलास.
८५००० वि।। गमाजी पा।
८०००० दादासाहेब.
५००० विसाजी आपाजी वरात
पेसजी बा
----------------
८५०००
५००० मौजे काळुस वाभारें असले येथे जप्तीचा
२००००० अमदाबादचे सिबंदीस दिल्हे
१५०००० अमदाबाद
५०००० विरमगांव
२०००००
-----------
११६६०००
--------
१२०८२०००
या खेरीज इ।। पासोन फौज नेहमीं. दरमाही ठेवणें पडली. सबब सिबंदीच्या पेंचांत आहों. त्याचा खर्च आजपर्यंत भोगीत आहों. सरकारलक्षांत अंतर न पडावें ह्मणोन सर्व पेंच माथां सोसून सरकारलक्षीं अंतर केलें नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २७२
श्री.
१७०३ फाल्गुन वद्य ४
पो छ १९ रावल फाल्गुन, इसन्ने समानीन हा आंची.
पुरवणी शेवेसीं विज्ञापना. छ ५ रबिलावलीं संध्याकाळीं नबाबसाहेब यांनी राजश्रीं भुजंगराव यांस दरबारास बोलाऊन वर्तमान सांगितलें जें: फ्रांसीसाकडील जाहाजें येणार याची वार्ता होतीच. आतांच वर्तमान आलें जे फरासिसांची चाळीस जहाजें लढवाई पाण्यांतून चेनापटणास दाखल होऊन तीन रोज जाले. जाहाजांस लंगर टांकून इंग्रजांशीं व फरांसिसांशी लढाई षुरूजाली ह्मणोन वदंता आहे. याखेरीज वीस जहाजें खुषकीवरी उतरोन लढाई करावयाचे (इराद्यानें) फुलचरीस येऊन दाखल जाले. जमियत किती आहे, सरदार कोण आला आहे, हें वर्तमान कांहीं तहकीक लिहून आलें नाहीं. एकदोन राजांनी तपशीलवार लेहून येईल, म्हणजे मदारुलमहाले यांस लेहून पाठऊं. सांप्रत वर्तमान ऐकण्यांत आलें तें रावअजम कृष्णराव नारायण यांस सांगावें, तहकीक बातनी आली. त्यास बोलाऊं पाठऊन सविस्तर वर्तमान सांगू. मदारुलमहाम यांचा भरंवसा खचित जाणून, फ्रांसिसांत आणावयाचा उदेग केला. तेहि येऊन पोहोंचले. अशा समयांत मदारुलमहाम यांनी इंग्रजाच्या वकीलाकडे वचन गुंतऊ नये. तमाम खुषकींतील सरदारांनीं एकदिल होऊन इंग्रजांचें तंबीवरी कमरबंदी केली आहे. याजकरितां यावरी फरांसिस आले. मदारुलमहाम यांजखेरीज वरकड सरदारांचे भरंवसे समजले! असो ! आतांहि मदारुलमहाम यांनी कायमी राखिली तरी. आह्मी मदारुलमहाम वे फरांसिस तिघे मिळून इंग्रेजांची बेबुनियाद करू, अशास, त्याप्रमाणे राव मशारनिले याजकडून मदारुलमहाम यास साफ लेहून पाठवावें. इंग्रजांच्या तंबीचा समय प्राप्त जाला आहे. असा वख्त वारंवार यावयाचा नाहीं. याप्रमाणें राजश्री भुजंगराव यांस सांगितलें. सविस्तर स्वामीस कळवण्याकरितां लिहिलें आहे. आठ दिवसांत पंधरा दिवसांत खामखा येतात असें होतें. आतां लांबणीचा प्रकार नाहीं. दोन तीन रोजांत समजेल. सविस्तर श्रीमंत राजश्री नानांस राजश्री कृष्णराव तात्यांनी लिहिलें असे. याउपर फरांसीस येतात, ऐसें आहे. फरांशीस आलियावर इंग्रजांचें पारपत्य नवावबहादर यथास्थित करितात. मागाहून आणिक एखादे दिवशीं वर्तमान सेवेशी लिहून पाठऊं. वरकड सविस्तर अर्थ, आंचीबरोबर वरचेवर पत्र सेवेसी लिहिली असत, त्यावरून विदित होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २७१
श्री.
१७०३ फाल्गुन वद्य ४
पौ छ १९ रावल फाल्गुन, इसन्ने समानीन हा आंची.
पुरवणी शेवेसीं विज्ञापना विशेष. स्वामीकडून ब सरकारांतून निवळ पत्रे येतात, त्यांत दिकतीचा प्रकार कांहींच नसतो. त्याजवरून आह्मीं नबाब बहादूर यांसी खातरजमा करून बोलतों. आज पावेतों आमचें बोलणें व स्वामींचें लिहिणें यथार्थ जाणून बंगाल्याकडील वगैरे मसलतीविशीं जें जें बोलणें झालें तें वरचेवरी अंचीवरील पत्रें रवाना केलीं आहेत. अलीकडे इंग्रजाकडलि वकील पुण्यास येऊन जाबसालचें बोलणें निश्चयांत आले ह्मणून वकीलाचें लिहिणे; व बातम्या चहूंकडून खचित आल्यामुळें, यांच्या चित्तांत नानाप्रकारच्या कल्पना उत्पन्न होऊन, स्वामीस लिहिण्याचा प्रकार सांगून, आह्माकडून लिहविलें आणि अंतरगें विनंती पंताकडून चैनापटणकरांशीं संधानाचा सिलसिला लाविला. त्याजवरून इंग्रज सर्वप्रकारें मान्य करून मशारनिलेस पाठवून देणेविंशी लिहिले आहे, म्हणून वर्तमान ऐकण्यांत आलें. अद्यापि प्रगट नाहीं. खरेच असल्यास निदर्शनास येईल. बहुतकरून खरें असेल. येविशीं शोध करून मशारनिलेस त्याजकडेस पाठऊन देणार अगर कसें काय, तें मागाहून लिहून पाठवितों. आजपावेतों इंग्रजांच्या तंबीविशी दोन आधार होते, त्यापैकीं स्वामीकडील आधार बिलकुल तुटलासा झाला. दुसरा फरांसिस येण्याचा. तो कसा होतो तो पहावा. एकूण नबाबचें चित्त अंदेशांत पडून, इकडील मसलतीविश उदासीनता जाली. न जाणो, स्वामीकडील कायमी यथास्थित राहुन आठपंधरा रोजांत फरांसिसांचीं आमदानी जाल्या, योजिली मसलत सिद्धीस जाऊन नक्ष होतो. नाहीं तरी, हें इंग्रजाकडील राजकारण हरकसेंही समेटून घेऊन चाल कोण्हीकडे करतील, हें नकळे. याच बेतावरी इकडील प्रांताची आस्था न ठेवतां बेचिराख केला. अर्काट व अरणी हीं दोन मातबर स्थळें तींही खालीं करून तमाम सावकारा वगैरे लोक व तोफा घांटावरी लाऊन दिल्ह्या. किल्ला न पाडतां ठेवितील जरूर. असा प्रकार येथील जाला आहे. सर्व स्वामीस कळावयाकरितां विनंति लिहिली आहे. सर्व दूरंदेशीनें जें करणें तें नुमूस न पड़े ब लौकिकांत स्वामीचा नक्ष विशेष घडे असा प्रकार करावा. फरांसिस करार आलेच असले, तर एक दोन रोजांत तहकीक वर्तमान येईल तें जलद सेवेसी लेहून पाठऊं. फरांसिस यावयाचा प्रकार नसला, तर ही आवई पाहून इंग्रेजांसीं राजकारण हर त-हेनें समेटून घेतील. सेवेंशीं श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २७०
श्री
१७०३ फाल्गुन शुद्ध १५
पो छ १४ रावल, फालगुण, इसने समानीन. आंचीवर आलें. दोन बंदरास.
वैसी आनंदरावजी बाजी व गणेश केशव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना ता छ २६ सफर मुकाम मुसळीपाक येथें स्वामीच्या कृपावलोकनें करून वर्तमान यथास्थित असे. विशेष. श्रीमंत राजश्री नाना यांनीं छ ६ मोहरमचीं पत्रें जासूदजोडीबराबर राजश्री कृष्णराव तात्या यांस पाठविलीं तीं छ १६ सफरीं पावलीं. पत्रीं आज्ञा जेः बंगाल्याकडे फौजेच्या रवानगीची सिद्धताच आहे. पैक्याची सरबराई तर्तूद करून, जाबसाल उरकोन, उत्तरप्रत्योत्तराचा प्रसंग न पडतां, ऐवजाची रवानगीच होऊन येई तें करावें, छत्तिसांची तरतूद न होय, तर निदान तिसांचा जाबसाल उरकून पाठवावा ह्मणून. व दुसरें, पुरवणीपत्रीं लिहिलें जे: इंग्रजांच्या कबजांतील मुलुख मारून ताराज करावा. रसदेची वगैरे आमद रफ्ती होऊं नये, यास्तव सरकारातून लोक रवाना केले होते. ते स्वा-या करितात. यापुढें इंग्रजाकडीलही जमाव मुकाबल्यास येऊन, झटपट जागांजागां चालविलीच आहे. च्यार गलबतें भरून कांहीं जिन्नस व लोक मुंबईकडून इंग्रजांचे लोक मुकाबल्यावर कोहेजेकडे होते. त्यांच्या उपराळ्यास मनोरचे खाडींतून येत होते. त्याची बानेमी राखून, किल्ले कोहज येथील सरकारचे लोक कांहीं मेले व कांहीं पाण्यांत उड्या टाकून बुडाले. गलबतें सरकारच्या लोकांनी शिकस्त करून पाडाव आणिलीं. याजमुळें इंग्रजाकडील जमाव तिकडे रवाना झाला आहे. सरकारचे लोक तेथें आहेत. ते मजबुदीनें आहेत. व येथून भरतीस लोक वरचेवर रवाना होत आहेत. ह्मणून विस्तारें लिहिलें. ऐशियास, बंगाल्याचे मसलतीचे सरबराईविशीं सरकारांतून पत्रें आंचीवर जीं जीं आलीं तीं तीं नबाब बाहादुर यांस श्रवण करून, पत्राचे भाव समजाऊन, उत्तरें निरोत्तरे जालीं. त्या अन्वयें आंचीवर लिहित गेलों. सांप्रत, मुंबईहून वकील पुण्यास आल्यामुळें यांच्या बातम्या परभारे नानाप्रकारच्या येतात. तेणेकरून त्यांच्या चित्तांत विकल्पाचे वृक्षच वाढले आहेत. याचीं परिमार्जनें करावयाचीं ती करीतच आहों. सरकारचीं व स्वामीचीं पत्रें नबावास येतात. परंतु स्वामीच्या लिहिल्यानें व आमच्या बोलण्यानें खातरजमा होत नाहीं. याचे संशय निवारण व्हावयाचा विचार तर, मुंबईकर वकील माघारा लावून द्यावा व नबाब निनिजामअल्लीखा कराराप्रमाणें मसलतीस नमूद होत नसल्यास कृष्णराव बल्लाळ यांणीं नबाबाशीं रुष्ट, तुटक भाषण करून उठोन यावें. याप्रों जालें. ऐसीं परभारें वकीलांची लिहिलीं नबाबबाहादूर यांस आलीं ह्मणजे संशयाचा वृक्ष निर्मूल होईल. जाल्यास सरबराई तर्तुद, बंगाल्याची मसलत केल्यास, वीस लक्ष रुा ची होईल. तें प्रस्तुत घडत नाहीं. तेव्हां गुजराथ वगैरे प्रांत सोडवायाचे तजविजेस फौज रवाना केली ह्मणून वकिलांचीं लिहिलीं आलीं. म्हणजे साल मजकुराचे बारा लक्ष रुा पाठवून देतील. याच अन्वयें पत्र जासूदजोडीसमागमें राजश्री कृष्णराव तात्या यांनी राजश्री नानास व आह्मीहि सेवेसीं पाठविलीं आहेत. जासुदास पोहोंचावयास दिवसगत लागेल, याजकरितां आंचीवरही रवाना केलें आहे. सारांश, यांच्या चित्तांतील आशंकापरिहार, विना मुंबईकर वकील पुण्यास आला आहे तो तुटक गोष्टी सांगून माघारा लावून दिल्याखेरीज होत नाहीं. हा प्रकार घडावयाचा विचार कसा असेल, तो कळेना. स्वामीकडील बातनीनिसांची पत्रें विकल्पयुक्त येऊन बेमर्जी होती. नबाबसाहेब यांचा शोध फार सूक्ष्म, केवळ गंभीरपणेंच हा काल पावेतों आहेत. दुसरें कोणीं असतें तरी काय करतें कळेना. यांनी यांनीं आपले जागां निश्चय केला आहे कीं, आपल्याकडून अंतर पडेलसा शब्द लाऊन घेऊ नये. तिकडूनच न घडावयाची गोष्ट घडल्यास मग कळेल त्यारीतीनें आपला मतलब साधावा. या विवंचनेंत आहेत. आह्मांस सांगितलें आहे कीं, तुह्मी दररोज कळेल त्याअन्वयें येथील स्थितीचें व चहूंकडील ऐकण्यांत येत जातील तीं कोणे विषयींचे अंदेशे ध्यानांत न आणतां खुलाशाने लेहून आंचीवर मोहोरेनिशीं रवाना करीत जाणें. आह्मीं तुमचा लाखोटा कदापि फोडून पाहणार नाहीं. याप्रमाणें आह्मीं लिहिण्याकरण्यांत कांहीं आदि. पश्चात पाहूं ह्मणून खातरजमा करितात. व आजपावेतों तसेंच चालवितही आहेत. याजकडे दोष ठेवावयाचा प्रकार कांहीं दिसण्यांत तूर्त येत नाहीं. वरचेवर पत्रें उगऊन लिहून सेवेसीं रवाना करितों. स्वामीकडून समर्पक उत्तरें व त्या अन्वयें नवाबास परभारें बातन्या निखालस येतील तो सुदिवस होईल. सारांश, नबाबसाहेबांच्या चित्तांत विपरियास परिच्छिन्न आला आहे. स्वामी पत्रें लिहितात व आह्मी खातरजमा करितों. परंतु खातरजमा होत नाहीं. याउपर सर्व अर्थ ध्यानांत आणून, नवाबसाहेबांची खातरजमा होऊन, बोलावयाची उजागरी होय, ऐसें करणार स्वामी समर्थ असत. तपशील कोठवर ल्यांहावा ? ज्यांत सुदिवस दिसे तें करणार स्वामी समर्थ असत, सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ३९ ]
श्री राजाराम रघुवीर प्रसन्न. कदीम पद्धत महाराज सिहासनारूढ जालेयावर मान विडे व नारळ --
प्रथम विडा - |
देव प्रथम मातापिता ग्रामदेवता मुतालीक फडणीस चिटणीस कारकून सभासद सबनीस |
राजनीति पद्धत
प्रधान प्रथम विडा |
अठरा कारखाने |
अलीकडे नवे जाले
प्रतिनिधी देवडी
राजाज्ञा बक्षी
ममलकतमदार दिवाण
हिमतबहादर
सरखेल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ३८ ] यादीं पत्रें सुमारे ८.
कित्ताः-
२. राजश्री खेमसावंत सरदेसाई, कुडाळ, यांसी, शिवाजी राजे यांची
१ सताजी घोरपडे यांचें पत्र.
३
मातु. श्री ताराबाई यांचे पत्र १.
राजश्री चंद्रसेन जाधवराव याची चिठ्ठी १
राजश्री परशरामपत यांची पत्रें २, बंद ३ ---
राजश्री शिवाजी राजे यांचे पत्र राजश्री जयसिंग जाधवराऊ यांसी पत्र १.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
कळोपंत दफ्तरदार आपले वोओढीचा ह्मणोन वतनाची देखरेख सांगितली, आणि निळोपत हुजूर गेले त्यांस तेथें मोसबियास दोन वर्षे लागलीं. मोसबा वारून वतनावरी यावें तो पातशाहा मेहेरबान होऊन आणिकी ठाणेदारी सागितली तिकडे सात आठ वर्षे राहिले. तेथून पुन्हा वतनावरी आले येते समयीं महालची सरखोती दिवाणातून करून आले, आणि अंमल चालवूं लागले. त्यास, कळोपंत यारिदी याणे दिवाणची पाठी करून निळोपंतासी कलह माडिला याउपरि कितेका दिवसानीं मुरार सोमाजी कळोपताचा नातू याणें मारेकरी घेऊन येऊन मौजे भादाणें येथें निळोपत होते त्यांस व बायका, मुले, चाकर, बटिकीं देखील निळोपंत व त्यांचे पुत्र नारोपत मारिले त्यांत उरता नारोपताची स्त्री उरली. ते तान्हे मुल घेऊन, सोनजीपंत आपले आजे, पळोन घेऊन पुणियासी आली. त्यावर सोनाजीपंत परवरदा जाले. परंतु वतनावर गेले नाहींत आपले तीर्थरुप राजश्री छत्रपतीची सेवा करू लागले यामुळे वतनावर न गेले, परंतु वृत्तीचा कथळा माडिलाच होता. त्यास भानजी मुरारीचा आपला कथळा माडला अहे. परतु त्याणे फौजदाराची व काकाजीची पाठी केली. तथापि आपला मुतालीक जुनदअल्ली सुभा कल्याणी आहे त्याजवळी उभे राहून वेव्हार सागितला. अवघे गोत सुभा मेळवून, करीना मनास आणवून, आमचे वतनसें खरें जाहालें , गोही साक्षीनसी यांसी इनाम गांव पूर्वापार आहेत.
मौजे भादाणे मौजे कुकसें
१ १
याखेरीज हक्क गांव व इनाम व मानपान पेसजीप्रमाणें येविसी पत्रें करून द्यावीं.
आपल्या नावे फर्मान सुभ्यास पत्र
१ १
कल्याणच्या फौजदारास पत्र
१