पत्रांक २९६
पो छ १ सफर श्री ‘लक्ष्मीकांत’'. १७०९ आश्विन शुद्ध ५
सन समान समानीन, कार्तिक १७०९
राजश्री हरीपंत तात्या गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रो रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. येहतिशाकजंग याजबाबत किस्तबंदीचे ऐवजाकरितां वारंवार आपलीं पत्रें आलीं. त्यास त्या ऐवजी येथून साडेतीन लक्ष रुपयांचा भरणा राजश्री रामचंद्र गंगाधर ओंकार यांचे दुकानीं केला आहे. मुदतीप्रों मा।रनिले ऐवज देतील. याजप्रो घेऊन पावलियाचें उत्तर पाठवावें. रा। छ ४ माहे मोहरम. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंती. मोर्तबमुद शिक्का ( पूर्वी दिल्याप्रमाणें ).