[ ४१ ] श्री. ११ मे १६९०.
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके २५ प्रमोदिनाम संवत्सरे वैशाख शुद्ध चतुर्दशी भौमवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति याणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री नारोपंडित यांस आज्ञा केली ऐसी जे :- तुह्मीं स्वामीच्या दर्शनाकारणे येत आहां प्रस्तुत प्रभावळीस आलेस ह्मणोन कळों आलें ऐसियास तुह्मी स्वामीचे दर्शनास आलेस उत्तम गोष्टी केली तुमची स्वामीची भेटी सुमुहुर्ते व्हावी लागते. त्यास, उदईक दिनशुद्धी नाहीं आणि स्वामीही राजापुरास जाणेंकारणें प्रतिपदेस स्वार होऊन येत आहेत तरी तुह्मी तेथेच राहाणे स्वामीही येतील. तुमची व स्वामीची भेटी प्रभावळीसच होईल तुह्मी यावयाची त्वरा न करणे बहुत लिहिणें तरी तुह्मीं सुज्ञ असा.
मर्यादेयं
विराजते