Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ३३१

श्रीगजानन. १७११ पौष वद्य ९

रु
श्रीमंत राजश्री नानासाहेब स्वामीचे सेवेसीः----

विनंति सेवक विश्वासराव आपाजी कृतानेक सा। नमस्कार विज्ञापना येथील वर्तमान छ २२ माहे रबिलाखर मु।। गारदौंड स्वामीचे कृपेंकरून येथास्थित असे. विशेष. मिर्जामुजफर बक्त शहाजादे छ १९ तारखेस प्रातःकाळीं स्वारी बागांत येथून आदकोसावर गेली होती. फिरून प्रहूर दिवसांत होवलीदाखल जाले. यानंतरीं हिंदुस्थानांतून यांचीं पत्रें आखबार छ १९ तारखेस रात्रौ आलीं. त्यांत मा।रः राजश्री पाटीलबाबा रामघाटास सूर्यग्रहणास गेले आहेत. तेथें कार्तिकस्नान करून श्रीमथुरेस आले. वजिराकडून टिकावस्त्रें आली आहेत. बिलकारसाहेब वकील यांचे मार्फतीनें गुजरावलीं. येकवीस पाचें होते व तीन किस्ती जवाहीर, येक हात्ती, दोन घोडे याप्रमाणें आले. त्यांचे कडील भला माणूस आला होता. त्यास तीन खोन वस्त्रे व येक रकम दिली व वरकड जैपूरवाल्याकडील वकील रा। सुभेदार यांचे लस्करांत येऊन बसले आहेत सुभेदारांनी पाटील बावास + + + + + + + राजेमार यांचा कांहीं तह ठरावा. त्यास हे मसलत काहीं ध्यानास आणूं नये. मिर्जा इसमायलबेग याणें फितूर करून जैपुराकडे संधान लाविलें. आपलीं कुटुंबें गडास होतीं तीं काढून आपले लष्करांत नेलीं. जेपुरास रवाना करणार. जेपूरवाले राज्यांनी लाख रु।। खर्चास पा।ले आहेत. दिल्लींत आवई गेली आहे कीं, इसमालबेग फौजसुद्धां येणार. ह्मणून पातशहानीं शहरचा बंदोबस्त मांडिला आहे. दरवाजे दरोबस्त बंद करून तीन दरवाजे मात्र खुले ठेविले आहेत. रो। पाटील बावास शुका पार होता कीं इसब बेगचा इरादा दिलीस यावयाचा आहे. त्यावरून पाटीलबावांनी खातरजमा करून लेहून पों।. वरकड खर्चावेंचाचीं तंगचाई बहुत आहे. सलातनि यास उपोषणें गुजरतात. येक शहाजादा कनसल होता तो निघोन गेला. यास्तव पातशहानीं पाटील बावास लिं। होतें कीं, सलातीन उपासी मरतात. त्यास यांचा भक्षावयाचा बंदोबस्त करावा, अथवा यास आनात करून द्यावें. त्यावरून शाहनीजामुदीन यास लि। कीं, माहालांत ताकीद करून बंदोबस्त करावा. जाबेखान गुलामकादराचा भाऊ याणें साहरणपूर प्रांतीं राहिले व सिख जमाव करून रो।. बालोजी इंगळे यांची लढाई रुबकार आहे. याप्रमाणें आढळलेलें वर्तमान तें सेवकानें लिहिलें आहे. सेवेसी श्रुत व्हावें. पत्रोत्तरी आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लिहणें ? लोभ केला पाहिजे.

पत्रांक ३३० श्री

रु
पो छ ५ सफर तीसैन, १७११ आश्विन वद्य ५

श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः-

विनंति सेवक त्र्यंबकराव येशवंत कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना ता। छ १९ माहे मोहरम मुक्काम किले नरगुंद स्वामीचे कृपावलोकनें सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. तालुके–मजकुरीं येथील दुसालची वहिवाट तयार करविली आहे. दिपवाळीच्या सुमांरे कारकुनाची रवानगी करून सेवेसी पाठवितों. दक्षिणेकडील बातमीचे वृत्त तरीः खुद्द टिपू कोईमतुरानजीक जमाव सुद्धां आहे. अद्याप तह नाहीं. या तोंडीं फौज नवती. याकरिता मुरार्जी नलगे व गंगाजी सांवत वगैरे फूट सरदार पांच हजार फौज व पांच हजार बार येणेप्रों तुंगभद्रा उतरोन करजगीवर मुकाम करून राहिले आहेत. लस्करांत माणसे बातमीस पाठविलीं आहेत. मतलब काय आहे, याचे ठिकाण लाऊन मागाहून सेवेसी विनंति लिहितों. सेवेसी विदित होय हे विज्ञापना.

पत्रांक ३२९.

पो आश्विन वा १३ सा तिसैन

श्री १७११ आश्विन शुद्ध ८

शेवेसी कृष्णाजी जनार्दन ओक मो जंबूसर कृतानेक सा नमस्कार विज्ञापना ता। अश्विन शु।। ८ पावेतों यथास्थित असे. विशेष. मी जंबुसरास आलियावर आपले लिहिल्याप्रमाणें अजमासाची सरकारांत निकड आहे, त्यास, पत्र देवावयाची आज्ञा जाली पाहिजे, म्हणोन राजश्री दिवाणजीस विनंति केली. त्यावरून त्याची सालमा।रचे मखत्याप्रो साडे तेवीस हजार रु।। जमा धरून, आपले फाजील बाकीसुद्धां सतरा हजार येणें. त्यापैकीं जमेंत खर्च वजा होऊन, बाकी सा हजार रु।। फाजिलास टाकून, बाकी दहा हजार रु।। सरभुवनची रसद मेहेंदळे याजपासून घ्यावी, म्हणेन सरकारांत विनंतीपत्र लिहून पाठविलें. ते समई पाऊस पाणी चांगला प्रथमता लागों लागला. तेव्हां फारच पडिला यामुळें भाताचे तरु टाकिले त्याची तसनस जालियामुळें कपारी थोड़ी बहुत पडिली. तरूंची घट आली. पुढीं पाऊस ज्वारींचे पेरणीस चांगला उघडला. पेरण्या झाडून जाहल्या. नंतर मघा लागल्यापासून संतत पाऊस पडतो. येक दिवस उघडत नाहीं. यामुळें ज्वारी कुजोन गेल्या, व पेस्तर सालाकारणें किस्तंकार ढळिया पडावयाचा तो राहिला. येविसींचा मार सुभा समजाविला. त्यावरून येविसी सरकारांतही त्याची विनंतपत्र लिहून पाठविलें तें पावलेंच असेल; व त्या जासुदाबरोबर आपणही विनंति लिहिली आहे. हालीं उत्तराचा एक चरण राहिल्यापासून पाऊसांनी उघाड दिली आहे. परंतु रेचावड जमिनीची ज्वार दरोबस्त गेलियामुळें पांचचार हजारांचें नुकसान रयतेस मजुरा द्यावें लागेल. तेव्हां फाजिलास ऐवज नेमिला तो राहणार नाहीं. गुदस्ता च्यार हजार रु।। रदकर्जिस नेमिले. परंतु, आफतीमुळें व कौली लावणी सुभाहून जाली सा।, कमी आकार होऊन रदकर्जास ऐवज राहिला नाहीं. रसदेचे पैकीं फाजील राहिलें. सालमजकुरींही याप्रमाणें जालें. याज करितां सरकारांत विनंति करून, कांहीं ऐवज रसदेपो कमी करून, फाजिलास लाऊन द्यावा. शेवेसी श्रुत होय, हे विज्ञापना.

पत्रांक ३२८

श्री १७८०

सदासिव दि० बिन बाबदेव दि० ठकार. (तक्ता)

पत्रांक ३२७.

१७७७ चैत्र वद्य १४.


My dear Vinayakrowjee,
Allow me the liberty to introduce the bearer Bhaskerao Bhauoo to your favourable notice, who is cousin to the adopted son of the late Nana Farnavis, who, I have no doubt, will meet at your hand the honour due to his rank.
I do not know at which stage any application, respecting my honorary title, has arrived. Young gentlemen, I imagine, dislike corresponding with old hands, because they know Purvoe English, not *palatible to young ones, knowing gramatical language, but this, I hope, will not deprive me of the pleasure of hearing from you on the point in question; hoping you are in the enjoyment of good health. Belive me,
My dear J,
Yours Faithfully,
Moroba Sadasea.
Poona 15th April 1855.
Address:- Venayeckrao) Wassoodew Esquire, &c, &c, &c, Bombay.


(* Palatible, gramatical, वगैरे स्पेले मोरोबा सदाशिवाच्या Puvoe ( परभू English चे मासले आहेत. विरामचिन्हेंही मासलेवाईक आहेत. मुंबईच्या इंग्रज लोकांत Purvoe ह्मणजे खर्डेघाश्या, असा Purvoe या शब्दाचा रूढ अर्थ इ. स. १६०० पासून आहे.)

पत्रांक ३२६

श्री. १७६९ कार्तिक वद्य ३.


वेदशास्त्रसंपन्न राजश्री रामचंद्र दिक्षित ठकार स्वामी गोसावी यांसी.


शेवक परशराम श्रीनिवास प्रतिनिधी नमस्कार विनंति उपरी. श्रीमंत क्षेत्रियकुलावतंस श्रीमन्माहाराज राजश्री छत्रपति स्वामी याणीं चिरंजीव राजश्री श्रीनिवासराव याचे विवाहाचा निश्चय मार्गसीर्ष शु।। ९ गुरुवारी योजिला आहे. शरीरसंबंध राजश्री आंताजी नारायेण मुतालीक यांची कन्या वधू योजिली आहे. तरी तुम्ही सहकुटुंब सहपरिवारें लग्नसरंभास यावें. रा। छ १६ जिल्हेज, सु।। समान अर्बैन मयातैन व अलफ. बहुत काय लिहिणे, १ हे विनंति.

पत्रांक ३२५

श्री. (नकल) १७५९ आषाढ शुद्ध ९


हरीभक्तपरायण राजश्री विष्णुबावा संस्थान धावडशी यांसी:-


प्रति प्रतापसिंहराजे दंडवत उपरी. तुम्ही हुजूर विदित केलें कीं, संस्थानचे खर्चाकडे गांव व जमीन वगैरे आहे. त्याची वेवस्था आह्मी व आमचे भाऊबंद मिळोनं करीत होतों. दरम्यान आमचे भाऊबंद यांणीं कामांत बखेडा केल्यामुळें गैरव्यवस्था जाली. तेव्हां संस्थानचे जमाखर्चाचे वेवस्था नीट ठेवण्याकरितां हुजरून गोविंद माहादेव कारकून व व्यंकाजी भोंसले यांस पाठऊन, त्यांस माहितगारी करून देऊन, त्यांचे विद्यमानें वहिवाट करित जाणें. येविशीं आमचे व वासुदेव बाबूराव तांबे फडणीस संस्थान मजकूर यांचे नांवें सनतिस्सा अशरीनांत पत्र आलें. नंतर त्या सालीं गोविंद माहादेव कारकून हुजुर नेले. भोंसला राहून देवस्थान चौकशीकडून मुनीम राजश्री विष्णु माहदेव माहजनी वहिवाट, करित आहेत. त्यास हल्लीं आमचे भाऊबंद यांणीं पेशजींप्रमाणें संस्थानीं वागावें, गांवकामांत बखेडा करूं नये, असा बंदोबस्त करून घेतला आहे. या उपरी संस्थानचे जमाखर्च गैरवेवस्था होणार नाहीं. याकरितां स्वामींनीं कृपा करून पूर्ववतप्रमाणें संस्थान वहिवाट आम्हांकडे कायम करून, हुजरून भोंसला आहे त्यास आणून देवस्थानाकडील देखरेख होत आहे ती मना करण्याविशी आज्ञा जालीं पाहिजे. म्हणेन. त्याजवरून, संस्थान मा।रचे वहिवाटींत भाऊबंद बखेडा करीत नाहींत, हें आह्मी मिळोने एकविचारें पूर्ववतप्रमाणें व्यवस्था नीट राहून वहिवाट तुम्हांकडे कायम करून, लिहिलें आहे. तरी संस्थानाकडे इनामी गांव व जमीन वगैरे उत्पन्न परइलाख्यांतीलसुद्धां चालत आहे. त्याचा जमाखर्चाची वेवस्था दुरुस्त राखीत जावी. जाणिजे. छ ८ रबिलाखर, सु।। समान सलासीन मयातैन व अल्लफ. तारीख १२ जुलै सन १८३७ इसवी मोर्तब आहे.

पत्रांक ३२४

श्रीगुरुसमर्थ १७५५ श्रावण वद्य ९


पा। छ २७ रबिलावल,
सन अर्बा सलासीन.

श्रीमंत राजश्री नाना साहेब साहेबांचे सेवेसीः-

आज्ञाधारक रमाबाई देसाई नाडगौडा पा। गोकाक दंडवत विनंती विज्ञापना ता। छ २३ माहे रबिलावल पावेतों स्वामीचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. हणमंता काळे याजबरोबर आज्ञापत्र पाठविलें तें पावलें. धर्महाटीकर यांचे फैसल व्हावें लागतें, व दत्तक प्रकरणीं बोलोन ठरला पाहिजे, त्याजकरितां चिंचणीस येणेंविषयी आज्ञा, त्यास, एविशीं पेशजी राजश्री उडपी रामचंद्र याजबरोबर विनंतिपत्र देऊन पाठविलें होतें. मसारनिल्हेनें आपणास विनंति केलेच आहे. मी समक्ष येऊन, विनंति करावी, असें काय आहे ? मशारनिल्हे जे विनंति करतील तें माझें आहे. तत्राप चरणसांनिध येण्यास आलश नाहीं. परंतु, तूर्त शरीरीं नीट नाहीं. थंडीवा-याने प्रकृत बिघडेल. त्यास उडपीराव रामचंद्र यास इकडील मजकूर सांगून, विनंतिपत्र देऊन, पाठवितों. चरणास विनंति करतील. मनन करून आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तणूक करीन. इकडील जाबसालाविशीं मी याव असा भाव नाहीं. चेरणदर्शनाची इच्छा आहे. फुरसोतिन येईन. सारावश, आज्ञा बाहीर मी नाहीं. पाऊस गेल्यामुळे बखेडा माझी फार आहे. सर्वप्रकारें सांभाळ करणार स्वामी समर्थ आहां. मी विशेष लिहिणेस शेक्त नाहीं. ममदापूर कामयाविशीं आलाहिदा विनंतीपत्र लिहिलें आहे, त्याजवरून निवेदन होईल. मशारनिल्हे स्वामीकडे येऊन विनंति करितील, ते मनन होऊन जे आज्ञा होणें ते व्हावी. तूर्त कामती वगैरेस हरएक विशीं उपद्रव होऊं नये, या प्रमाणें हुजरेयांस ताकीदपत्र देणेंविसीं आज्ञा व्हावी. * सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

पत्रांक ३२३

॥ श्री ।। १७५२ आश्विन शुद्ध १४


रुजू


हकायक अगाहः मारीफत दस्तगाहा श्रीधरणीधरबावा देव, चिंचवड, सलामतः


छ आजी सौब मेजर जनरल सरज्यान मालकम साहेब-बहादून गौरनर बादज सलाम खैरीयत अंज्याम आं कीं:- येथील खैर सला जाणोन आपली शादमानी हमेशा कलमी करीत असावी. दरीविला आं-साहेबानीं, संस्थानचे इलाख्याचे गांवावर दिवाणी कामा बा। अर्ज्या होतात, त्यास संस्थानाकडे घेण्याविसीं सनद देविली पाहिजे. म्हणोन कलमी केलें. ऐशास, आं–साहेबानीं पत्रांत लिहिलेले मजकुराविसीं सरकारांतून बंदोबस्त होत आहे. मालूम होय. ता। १ आगटंबर सन १८३० इसवी. जादा काय लिहिणें? प्यार कीजे, हे किताबत.


N. M. Malcolm.

पत्रांक ३२२

॥ श्री ॥ १७५१ भाद्रपद शुद्ध १


रुजू


हकायत-आगाहा–मारिफत-दस्तगाहा श्रीधरणीधरबावा देव संस्थान चिंचवड सलमुलाहुतालाः

छ आजी-सौब-मेजर जनरल सरज्यान मालकम साहेब-बाहाद्दर गवरनर बादज-सलाम खैरयत-अंजाम आंकेः येथील खैरसला जाणोन, आपली शादमानी हमेशा कलमी करीत असिलें पाहिजे. दरीविला, आ-साहेबीं सरकारांत याद कलमी केली त्यांतील हासील कीं, संस्थानचे कामांत मामलेदार फिर्यादी मनास आणितात त्या आणूं नये येविशीं हुकूम व्हावा. ह्मणोन, त्यास, येविसीं मेहेरबा कलकटर-साहेब यास जाहीर केलें पाहिजे. ता। ३० माहे अगोस्त, सन १८२९ इसवी. ज्यादा काय लिहिणें ? प्यार कीजे. हे किताबत.


N. M. Malcolm.