Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३४९
श्री १७१२ कार्तिक मार्गशीर्ष
मेहेरबान हरीपंत हमषान मित मुस्तफिद असतां आपण पंत मवासुफ यांस रोबरो जबान मबारकेनें फर्माविलें कीं, तुह्मीं मार्गे पुइतगर्मीवर राहून फौजेस इंग्रेजांकडे रवाना व मामुर करावें. ये विसींचा तपशील त्यांणी इकडे निगारीष केला. त्यावरून मुफसाल दर्याफ्त जालें. चुनाचे, आपण सलाह फर्माविली ते मसलहतीस बहुत मुनासीब. आइंदा कोणासही सरेमाय वेगळेपण दिसत नाही. दोन्ही उमद्या दवलतीच्या तकवीयतेस नेक व मुफीद आहे. लेकिन, मिस्तर मालिट यांचा सवाल आग्रहानें कीं, जनराल जातीनें कलकत्त्याहून मुकावल्यावर आले. सरकारांतून हरीपंत सरंजामसुद्धां मोहिमेवर रुखसत व रवाना झाले. हे खबर त्यांस कलमी कर्ण्यात आली. जनराल यांची दिलापासून खाहीष कीं, पंत मोईन यांणींच फौजफेरोजीसहित पुढें यावें. खुलस, मिस्तर मालिट यांच्या मुबालग्यावरून कियासांत आलें कीं, खुद्द हरीपंत सरंजामसुद्धा गेल्यावांचून फकद फौज गेल्यानें जनरलाची खुषी नाहीं. सबब, हुजुरांतून येविसीं पंतमोईन यांस लिहून पुढें जाणें होय तें करावें. ह्मणोन निजामद्दौला बाहादूर यांस फारसी पत्र नानाकडून.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३४८
॥ १ ॥ १७१२ कार्तिक वद्य ७
पंश्री राजेश्री बाबूराउ केसोराउजू ऐते श्री राजघरबहादुर गजसिंघजू श्री गंधृपसिंधजुके वांचने ओंपर अपने समाचार सदा सर्वदा भले चाहिजै. तापी छै यहाके समाचार भले है. आपकी मिहरवानगीते ओपर आगैतै आपुसौं श्री हजूरी सौ जिहतरह व्यौहार रहो आयौ है सो हमेतो तौनउ तरह समजै है. अरु आपु जेठे सरदार हौ. हमारी वातके ख्खैया आपऊ हौ. आपुसिवाइ हमै दुसरौ कोऊ नाहीं दिखातु आइ. अरु आगै पंश्री पंडित खंडोराऊ यहां आए हते सो राज्यकी जागा सवतहसन हसकरी अनै पश्री पंडित लछमनराऊ झासी बारे आए, सो हमारौ ऊनकौ सूत हतौ हमसौ ऊनसौ तौ भैटऊन हौन पाई. तुहलौ श्रीनौनै अरजुनसिंघनें न्याऊ करमार कै भगाइ दए अरु लूट लए. ऊनकौ भगाकै अव हमारे राज्यपै आए सो हमै छैकैहै. जौतौ इनकौ पारपत होई अरु हमारी मदत होवे. मै आवै तौ हम आपके ऊकमी है. जौ तो हमारी दसपंद्रा हजार घौरेकी मदत होवे, मै आवे अरु हमारे भया श्री गंधृपसिंघकौ संग लिवा ऐ आवै, तौ हम पैसान श्री की दैवेकी राहवांधै अरु राज्यकी सजल वैढै तौ हम हमेस आपुके ऊकमी है. अरु पंश्री पंडित वालजी यहां है सो ऐ हमारी वात नाहीं चितमें घरत आइ. आपुकौ वडौ दुवारौ है जिहमै राज्य कौ सुधार होई सो कीवी. अरु जिहमै हमारे भैयाको ऊवेल होइ अरु हमारी बात रहै सो आपु कीवी. या हकीकति श्री नानासाहिब कौ जाहिरकर जिहमै राज्यकौ सुधार होइ तौन आपुकौ करनी है. और विदीवार हकीकति श्रटिकसारीभावानीसिंघकौ लिखी है सो ए जाहिर कर है. अरु इनऊके हाथ आगौ पाती लिखी है सोवचवाइ देखवी. हम सब वातनपै काइम है सिखापनु होई. सुफुरमाइ पठैवी मार्ग वदि ७ संवत १८४७ मुकामु
मडफा (?)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ४४ ] श्री. २६ मे १६९३.
मा। अनाम यादो शिवदेऊ नाडगौडे ता। खानापूर यासी रामचंद्र नीळकंठ अमात्य सु।। आर्बा तिसैन अलफ. नाडगौडकी ता। मजकूर बा। सेरणी होन पा। पांचशे पैकीं बद्दल देणें ऐवज सुभा राजश्री सताजी घोरपडे सेनापती यांकडे होन पा। ३०० तीनशें तसर देविलें असेत आदा करणें सदर्हू ऐवज कर्नाटकाचे रवानगीस देविला असे. बिलाकुसूर पावणें उजूर न करणें जाणिजे. छ १० शौवल निदेश
समक्ष.
लेखनसीमा
समुल्लसति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३४७
श्री लक्ष्मीकांत १७११ ज्येष्ठ वद्य ११
वेदमूर्ती राजश्री नाना दीक्षित यांसीः-
प्रति रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंति. उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. खासा स्वारी पैठणास गंगा उतरत आहे. त्यास, कायगांवीं ज्या नावा असतील त्या पैठणास जलदी पाठऊन द्यावे. छ २४ माहे रमजान, बहुत काय लिहिणे ? हे विनंति.
पौ शके १७११, सौम्य संवत्सरे, आषाढ शुद्ध मंगळवार,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३४६
श्री ( नकल ) १७११ वैशाख शुद्ध ११
यादी राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा यांजकडील करारमदाराचीं कलमें पेशजी कैलासवासी मुधोजी भोंसले सेनाधुरंधर पुण्यास आले तेसमयीं करार जाला त्याप्रों वगैरे. सु।। तिसा समानीन मया व अलफ. |
घरचा अगर बाहेरील कसाहि पार गंगथडी येथील महाल सरकारांत
प्रसंग पडला तर सरकारचे लक्षाशि- कारांतआले आहेत. तेथील घांसदाणा
दुसरें लक्ष धरणार नाहीं. येणें तुमचा तो तुह्मीं घेऊं नये.
प्रो करार. याचे ऐवजीं प्रा। वराड येथील सरदेशमुखी
इंग्रजांचा बिघाड झाला तर शरीक व बाबतीचा ऐवज सवादोन
सरकारचे येणेंप्रो करार. लक्ष रु।। तुह्मांकडे दरसालचें येणें तें
त्रिवर्ग बंधू सरकारचे लक्षांत राहूं, तुह्मांस माफ केलें. याप्रों करार
दुसरें लक्ष धरणार नाहीं, येणेंप्रों सन इसने-तिसेनांत जाला आहे व
करार. अलिकडे सन तिसा तिसेतांत ब्रह्मेश्वरचे
पांचहजार रुपयांचें कापड बाळापूर सालीं अकरा महालचा घांसदाणा
व वासीम पेशजचें कराराप्रों दरसाल घेऊं नये असा करार आहे. त्याचा
सन सीत समानीनापासून सरकारांत फडशा पेस्तर सालीं करावा, असा
देत जावें, असा करार आहे. त्यास करार कैलासवासी सेनाधुरंधर यांणीं
कराराप्रमाणें मागील कापड देऊं. सन सीतसमानीनांत केला आहे. त्यास,
पुढें दरसाल देत जाऊं. येणें प्रों तूर्त नागपुरास जलदीनें जाणें याजकरितां
करार. फडशा महकूफ करावा. पेस्तर
संस्थान गढे मंडळे, रेवा-उत्तरतीर, सन तिसैनांत याचा फडशा क्षेपनिक्षेप
राजश्री खंडोजी भोंसले सेनाबाहाद्दर करून देऊं येणेंप्रों करार.
यांस फौजेचे सरंजामास सरकारांतून ब्रह्मेश्वरचे मुकामीं कैलासवासी
करार करून दिल्हें. त्याचे जानोजी भोंसले सेनासाहेबसुभा यासीं
कलमबंदीची याद सन सीतसमानीनांत करार जाले आहेत. त्याप्रों वर्तणूक
जाली आहे. त्याप्रों सरकारांतून करूं. येणेंप्रों करार.
चालवावें, अह्मीं कराराप्रों निभावणी
करूं. येणें प्रों करार.
छ ७ साबान, सन तिसा समानीन, वैशाखमास, मुकाम पुणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३४५
श्री १७१० पौष वद्य १२
तीर्थस्वरूप मातुश्री ताई वडिलांचे सेवेसीं:-
अपत्यें माधवरावाचे साष्टांग नमस्कार विनंती. येथील पौष बहुल द्वादशी पर्यंत वडिलांचे आशीर्वादें करून यथास्थित असे, विशेष. आपणाकारणें मकर संक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले आहेत. स्वीकारून उत्तर पाठविलें पाहिजे. बहुतकाय लिहिणें ? हे विनंती.
पौ छ ३ जोवल उर्फ माघ शु।। ४ शुक्रवार शके १७१०
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३४४
श्री १७१० मार्गशीर्ष वद्य १४
छ मा। अनाम देशमुखदेशपांडे मामले बीड यांसीः-
माधवराव नारायण प्रधान सु।। तिसा समानीन मया व अलफ. मामलेमार पो दिगर जाहागिरीचे गांव राक्षसभुवन वगैरे येथील अमल महिपतराव विश्वनाथ यांजकडेस जातीस व पागापथकाचे बेगमीस सरंमजाम चालत होता. त्यास ते मृत्य पावले, सबब त्यांचे पुत्र राजश्री सिद्धेश्वर महिपतराव यांजकडे जातीस व पागा पथकाचे बेगमीस सरंजाम सालमजकुरापासून करार करून दिल्हा असे. तरी, मा।रनिलेशीं रुजू होऊन, अमल सुदामत प्रों सुरळीत देणें. जाणिजे, छ २७ रबिलावल. आज्ञा प्रमाण, लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३४३
श्री. १७१० मार्गशीर्ष शुद्ध १
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री महिपतराव कृष्ण गोसावी यांसी:-
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार. सुहुरसन तिसा समानीन मया व अलफ. तुह्मीं पत्र छ ६ सफरचें पाठविलें तें छ २७ मिनहूस प्रविष्ट जाइलें. लिहिला मजकूर सविस्तर अवगत जाहला. श्री नरहरीसानिध्यें करून शरीरप्रकृत चांगली आहे, ह्मणून लिहिलें. उत्तम आहे. रा। छ २९ सफर. बहुत काय लिहिणें ? लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३४२
श्री. १७१२ अधिक आषाढ वद्य १
पंश्री मुख्य प्रधान श्रीराव सवाई माधौ राइजू. येते श्री महाराजाधिराज श्रीमहाराजा श्रीराजा धौकलसिंघजू देवके बांचनै आपर उहांके समाचार भले चाहिजै. इहांके समाचार भले है. आपर जादा दिननतै अपने पाती समाचार नहीं आये है, सो लिखिवी. अरु उधरकीं इधरकी बात आगै तै येक चली आई हे. काहूतरह जुदाइगी नहीं रही है. तिहितै अव आपकौ जादा जादा चलाउ नौ, इहां तै पश्री पंडित मोरौजी कौ पठवाये है. सो हकीकति इनके कहैनानि वी. पाती समाचार लिखत रहिवी. असाढवादि १ संवत् १८४६ मु।। परना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३४१
श्री १७११
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित वाजपेययाजी स्वामीचे सेवेसी:- विद्यार्थी बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष. आपण पत्र राजश्री बाळाजी भिकाजी याजबरोबर पाठविलें तें पावले. राजमंडलचे तैनातीचा व वर्षासनाचा ऐवज पावत नाहीं, व एखतपुरचा मा।र लिहिला व मारनिलिनें सविस्तर सांगितलें, त्याजवरून कळलें: ऐशास, आपले लिहिल्यावरून, राजश्री हरीपंत यांस वर्षासनाचे ऐवजाविशीं सांगितलें आहे; व सरकारची सनद येक हजार रुपयांची सालाबादचे ऐवजाची मा।रनलेस दिली आहे. सनदेप्रमाणें आपल्यास ऐवज पावता करतील व इनाम गांवचाहि बंदोबस्त करून देतील. * लोभ असो द्यावा. हे विनंति.