पत्रांक २९७
श्री. १७०९ कार्तिक शुद्ध ७
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री महिपतराव कृष्ण गोसावी यांसीः-
सेवक माधवराव नारायणप्रधान नमस्कार. सुहूरसन समान समानीन मया व अलफ, तुह्मीं विनंतिपत्रें पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. लिहिला मजकूर अवगत जाहाला. शरीर प्रकृत चांगली आहे म्हणून लिहिलें, तें कळलें, तीर्थरूप मातुश्री ताईची रवानगी लौकरच करण्यांत येईल. रवाना छ ६ सफर, बहुत काय लिहिणे ? लेखनसीमा.