Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखांक ९                                                                                                                                    १५६१ ज्येष्ठानंतर                                                                                                                       
                                                                                                                                                                          तालीक

अज रख्तखाने राजश्री शाहाजी राजे दामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि कर्याति बारामती बिदानद सु॥ अर्बैन अलफ दरवज बदल इनाम धर्मोजी काटे देसमुख कर्याती मजकूर जमीन चावर ४ च्यारी बित॥

दर सवाद कसबे बारामती चावर दोनी                               दर सवाद मौजे मलेद चावर एक
                      २                                                                             १
दर सवाद मौजे रुई चावर एक                                          लग
                     १                                                            ०

देखील नख्तबाबा महसूलबाब व कुलकानू अजरामर्‍हामती आले असे दुमाले करणे तालीक घेऊन असेल इनामदारास परतोन देणे दर हर साल खुर्द खताचा उजूर न कीजे मोर्तब*

पत्रांक ३८४

श्री १७१५

मांधळेतकर.
राजश्री राव सखतसिंग गो.
अखंडित-लक्ष्मी रामराम सु।।
.
पुण्याचे जकातदार
विसाजी भिकाजी, जकात प्रांत पुणें व जुनर गे।। दंडवत सु।।.

पनवेली कोकणप्रांत.
बाबूराव हरी,
बीडकरसाहेब.

श्री श्री श्री परब्रह्ममूर्ती श्री श्री श्री कादर सो बाचे चरण सेवेसी. दासानुदास चरणरज दौलतराव सिंदे सां दंडवत विज्ञापना. येथील कुशल ता।। छ पर्यंत आपले कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष.

तीर्थस्वरूप मातुश्री लखाबाई वडिलांचे सेवेसी.
अपत्य दौलतराव सिंदे दंडवत विनंति.

श्रीमंत राजश्री देव संस्थान चिंचवड स्वामींचे सेवेसी.
सेवक दौलतराव सिंदे विनंति उपरि येथील कुशल ता। छ पर्यंत श्रीचे कृपेंकरून यथास्थित असे विशेष.
१ राजे मा। जगदार दी तोफखाना खुषवख्त-बाषद आज दौलतराव सिंदे सलाम सु।। ज्यादा काय लि। पुढें मोर्तब किताबत नाहीं.

१ मे।। मानसिंग जगदार यास सु।।.

तीर्थरूप मातुश्री लक्ष्मीबाई व भागीर्थीबाई व यमुनाबाई सिंदे वडिलांचे सेवेसी.

आपत्यें दौलतराव सिंदे चरणीं मस्तक ठेऊन सां दंडवत. विज्ञापना ता। वडिलांचे आशीर्वादेंकरून वर्तमान यथास्थित असे विशेष.

हो।। ती।। केसराबाईस दंडवत विज्ञापना सदैव पत्रीं तोशवीत जावें.
हे।। रहिमान बिबी पन्हा–बाई व जोहारबाई व सरसरुपबाई व जिंनत व मुरादनबाई यांस दंडवत विज्ञापना सदैव पत्र पाठवून तशवीत जावें.

चिरंजीव बाळास.

वरकड बा।। प्रा। च तीर्थरूप मातुश्री मैनाबाई सिंदे यांस.

उभयतां आंग्रे मामा यांस तीर्थस्वरूप व दंडवत उपरी.

जैसिंग आंग्रे यांस आखंडित सु।। सेवटीं विनंति नाहीं. बहुत काय लिहिणें, येथें मोर्तब.

लक्ष्मण जामदार यास मौ ह्मणोन.

गंगाधर गोविंद सागरवाले यास अखंडित विनंति उपरी तीर्थरूपाचें नांव लिहावें.

राव रंभाजी जयवंत निंबाळकर यांस सकलगुणा विनंति लि। जावें.

रामचंद्र नारायण सुभेदार पुणें आखंडित विनंति.

मालोजी राजे घोरपडे आखंडित व विनंति.

विनंतीवाले.
१ मातबर पागे व सिलेदार.                  १ थत्ते.
१ आंबाजी इंगले भावासुधा.                 १ गोविंदराव भगवंत.
१ खंडेराव हरि.                                 १ माधवराव बाबर.
१ श्रीमंताकडील संभावित का। दार.      १ सेळूकर उभयतां.
१ आनंदराव बहिरव.                          १ माधवराव बाजी.
१ सखारामपंत बापू पानसे.                  १ वामनाजी हरी.
१ माधवराव रामचंद्र.                          १ पांडुरंग बलाळ नि।। कवीजंग बाहादूर
१ जगन्नाथराम व लक्ष्मण अनंत.            १ जगदले मानसिंग व राव व खंडेराव मसूरकर.
१ बाबूराव कृष्ण किलेदार साता-याचे.

पत्रांक ३८४

श्री १७१५

कोलापुरवाले राजे.

श्रीमन्महाराज राजश्री छत्र-पति स्वामीचे सेवेसीः-

विनंति सेवक दौलतराव सिंदे कृतानेक विज्ञापना. ता। छ पावेतों स्वामीचे कृपें करून मु।। सुखरूप असों, विज्ञापना ऐसी जेः-स्वामीनीं आज्ञापत्र पा। त्यांत आज्ञा जेः-पत्राचा सकल मा। जिनस पा। आहे, घेऊन पावलियाचें विनंतिपत्र पा। ह्मणोन त्यास आज्ञेप्रें याचप्रकारें सदैव परामृश करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना,

श्री
अकलकोटकर भोसले.
राजश्री राजे फत्तेसिंग भो। गोसावि.
सकलगुणालंकरण–अखंडितलक्षुमी-अलंकृत राजमान्य स्ने।। दौलतराव सिंदे रामराम विनंति.

श्री.
राजश्री पंतसचिव गोसावी यांसी
सकलगुणालंकरण-अखंडितलक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्ने।। दौलतराव सिंदे दंडवत. विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लि।। जावें. वरकड अष्टप्रधानास सकलगुणा-
--------
श्री.
भामगडवाला.
राजश्री राव बरजोरसिंग गो.
अखांडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्ने।। दौलतराव सिंदे रामराम सु।।.


मंदोसर.

मीरजा गुलसेन–बेग का। पा। मंदोसर वगैरे खुषवख्त बाषद
सुज्यायत–तहवर-दस्तगाह आज दौलतराव सिंदे सु।। सलाम.
मीरजा जमालबेग खु।। बाषद
आज दौलतराव सिंदे सलाम सु।.


नगरवाला मोंगल.
आजम सवाजे मोगल महमदखान कवीजंग बाहादर दाममोहबतहू. मोहिबान-मखालसान-दस्तगाह आजदिल यकलास दौलतराव सिंदे सलाम आंकी येथील खैरखुसी जाणोन तुह्मी आपली खैरखुसी कलमीं करीत जावी. दीगर खत पा। तें पावलें. लि।। मा।र.


प्रा। व पा। हाय देशमुख व देशपांडे.
मो आजम देशमुख व देशपांडे पा। सु।।.


राजश्री राज जालमसिंग गो. अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य रामराम विनंती उपरी.


बासवाईकर कुसलसिंग, राजश्री राणा कुसलसिंग गे।।
आखंडित रामराम विनंती उपरी.

पत्रांक ३८३

श्री १७१५ मार्गशीर्ष शुद्ध १४

वेदशास्त्रसंपन्न राजश्री नारायण दीक्षित व यज्ञेश्वरदीक्षित स्वामीचे शेवेसीः-

विद्यार्थी माधवराव नारायण प्रधान नमस्कार. विनंति. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. वेदशास्त्रसंपन्न सदाशिव दीक्षित वाजपेययाजी यांचा काल जाहल्यापूर्वीचे त्यांचे पत्र आलें, त्यांत आमचा माहाप्रयाण आहे असें लेहून वगैरे मजकूर लिहिला. नंतर दीक्षित यांस देवाज्ञा जाहाल्याचें वर्तमान कळलें. ऐशास, दीक्षित यांस आपलें माहाप्रयाणच आहे असें त्यांस समजोन त्यार्थी लिहिलें, हें परम आश्चर्य वाटलें. व त्यांचा काल जाहला, हे गोष्ट वाईट जाली. ईश्वरीछा प्रमाण. यास विवेकावांचून दुसरा उपाये नाहीं. याजकरितां विवेक करून चित्ताचे शांतवन करावें. रा। छ १२ जमादिलोवल, सु।। अर्बा तिसैन मया व अलफ. *बहुत काय लिहिणे ? हे विनंति,

पत्रांक ३८२

श्री १७१५ आश्विन-कार्तिक


विनंति उपरी. राजश्री गोविंदराव गाइकवाड यांजकडील खंडो आवजी अथवा गणेश कासी यांचे बनतां दिसत नाहीं. फौज जमा होऊन रिकामे दिवस जातात. याजकरितां त्याचें ह्मणणें आहे कीं, आम्हांस फौजसुद्धां गुजराथेस जावयास आज्ञा करावी, जातो, उद्यां दिनशुद्धी निरोपास आहे. याजकारतां त्यास तिकडे जावयास निरोप द्यावा. किंवा कसें करावें, हें लिहून पाठवावें. हे विनंति.

सरकार * लक्षाचा आंत कोणी असल्याखेरीज हातीं गोष्ट राहणार नाहीं. येवढा संदेह. वरकड जातात हें चांगले आहे. दोघांतून येक होता तर बरें होते. राजश्री माधवराव यास सांगोन कांहीं तरीं बंदोबस्त राही असें करून मग निरोप द्यावा.

पत्रांक ३८१

श्री. १७१४।१७१५


विज्ञापना. मषीरुलमुलूख यासीं उभयतां गोविंदराव यास नबाबाचे समक्ष बोलणें जाहलें की: इंग्रजांचें पत्र मिस्तर कनवी याचे विद्यमानें आलें आहे. व मीर अबदुल कासम याचे विद्यमानें आलें आहे. त्यास, प्रस्तुत त्याजला जाब लिहून द्यावा कीं, टिपूचा करार रावपंतप्रधान यांचा व आमचा राजश्री हरीपंत यांचे विद्यमानें जाहला होता त्यास तीन सालें जालीं. त्याजकडून कांहींशी पेशकदमी आढळून आली, श्रीमंतांशीं ऐवजाचा करार केला. तोहि कराराप्रों अमलांत न आला. यास्तव रावपंतप्रधान यांजला आह्मांस त्याची तंबी करणे जरूर होती. इतकियांत तुमचीं. पत्रें आलीं. त्याजवरून बाहिर निघावयाचा निश्चय केला. त्यास, तुह्मांस. खुषकींतून यावें लागतें. समुद्रांतून येणें, तेव्हां समीप पडतें. हा मजकूर एक. दुसरा मजकूर कृष्णापासून त्याचा तालुका लागतो. त्यास, तालुका टाकून पुढें येतां येत नाहीं. तालुका हस्तगत करून पुढें यावें. तालुका, किल्ला तैसाच ठेऊन पुढें आल्यास आमची स्वारी येईल. मागाहून वरचेवर लोक येणें, रसद येणें, त्याजला अडथळा होईल. यास्तव फौज पुढें रवाना करावी. रावपंतप्रधान याचे आमचे मुलाकात नाहीं. मुलाकात येऊन इतफा कोणत्याचे मुलखांत चालाणें जाहलें तर चालावें. अथवा अलाहिदा अलाहिदा चालावें, त्यास, रावपंतप्रधान यांची स्वारी प्रथमतः त्यास, मुहूर्त चांगला पाहून निवाले पाहिजे, थोरली मसलत च्यार महिने कमजादा जाहल्यास चिंता नाहीं, याप्रो पत्रें पाठवावीं असा निश्चय जाहला. हे विज्ञापना.

पत्रांक ३८०

श्री. १७१५


राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दादा स्वामींचे सेवेसीः---

पो महिपतराव जिवाजी सां नमस्कार विनंति, उपरी येथील कुशल छ १ जिल्हेज जाणून स्वकीय कुशल लिहित गेलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पा। तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाहाला. श्रीमंत उभयतां मंगळवारी प्रातःकाळीं स्वार होऊन सातारयास राजदर्शनास जाणार, श्रीमंत राजश्री नानासहि येथें येऊन च्यार पांच दिवस जाहले. त्यांणी आपल्यास यावयाविशीं पत्र लिहिलेंच आहे. लौकरीच दर्शनलाभ होईल. वरकड भेटी नंतर सविस्तर कळेल. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजेः हे विनंति. इ० इ०

पत्रांक ३७९

श्री

यादी होळकरा बा। ऐवजाच्या वराता गाईकवाड यांजपासून घेतल्या. सु।। खमस सितैन
५५०००     अंताजी नागेश का।दार पा। ढवळके. सदरहु वरातेचे वसुलास भिकाजीपंत पैलाडू आहेत.
२५०००     गोविंदराव गाईकवाड पे।। सिभेर नजीक बडोदें सदरहु ऐवजाचे वसुलास गोविंद......व मनोहर किंकर यांस.
१००००     चिंतो त्रिंबक का।दार प्रा...सराई...वसुलास माणूस दि।।डू ठेविलें असे.
५०००      चिमाबाई गाईकवाड प्रा।. कोरेळ, सदरहु वरात वसुलात मनोहर नाईक किंकर.
५०००      केदारजी गाईकवाड का।दार प्रां अंतापूर. सदरहू वरात मा।रीनल्हेचच हवाली रा। कृष्णाजी नाईकांनी केली.
-----------
१०००००

सदरहु वराता रा। कृष्णाजी नाईक....याणीं हवालीं जिकडील तिकडे केल्या आहेत.

पत्रांक ३७८

श्री

यादी राजश्री शिवाजीराव सुर्वे मोकाशी मौजे कुसगांव ता। पोनमावळ हा गांव सरकारांतून नानाजीराव सुर्वे आपले तीर्थरूप यांणीं सिद्दी सातावर वार केले सबब सत्तावीस जखमा आंगावर लागल्या, ह्मणोन बहुमान करून सदरहू गांव दिला. चुलता आत्माजीराव आपल्या तीर्थरूपाबरोबर चाकरीस होता. भाऊपण्याचा वेठाळेपणा सर्व ठीकच जाहला आहे. चाकरी मात्र एक जागां करीत होते. त्याजवर भाऊसाहेबांबरोबर हिंदुस्थानांत आपण व आपले चुलत भाऊ खंडोजी सुर्वे बिन भिंवजीराव सुर्वे गेलों होतों. तेथें सर्व घोडीं पिढीं जाऊन परतोन माघारें आलों. पुण्यांत कर्ज बहुत जाहलें. ते समई खंडोजी सुर्वे यांणीं आमचें व आपलें नांव घालून कुसगांवासी सनद सरकारांतून घेतली आण आपले घरास गेले. त्यापासून आज वीस बावीस वर्षे खंडोजीचें कोणी हुजूर चाकरीस आलें नाहीं. आपण सरकारची चाकरी करीत आलों दरम्यान धोडपेच्या सालीं निरोप घेऊन घरीं गेलों. मग धोडपेस स्वारी सरकारची जाली. ते समई आपणास चाकरीस बोलावणें गेले. नंतर आलों. तों स्वारी होऊन पुण्यास श्रीमंत आले. आह्मीं हुजूर पागेकडे निसबतीस होतों. त्यास, सदरहू चाकरीस चुकलों हें निमित्य ठेऊन गंगाधर पंत हुजूर पागेकडील याणीं गांव जप्त केला. त्याजवर गांव सोडवावयास सरकारांत नजर रुपये १३०० व दरबारखर्च ३०० एकूण सोळाशें रु।। पडिले. नंतर आणि एकवेळ चाकरीस यावयास चार रोज अधिक लागले ह्मणून मागतीस गांव जप्त करून रु।। ६०० घेतले. एकूण बेवीशें रुपये आपणास पडिले तें व्याजसुद्धां तीन हजार सावकाराचे जाहाले, तेव्हां व्याज भारी सबब कैलासवासी नारायणरावसाहेब यांचे कानावर मजकूर घालून, राजश्री महिपतराव कृष्ण यांजकडून तीन हजार रुपये एकत्रो व्याज घेऊन, सावकारास देऊन, गांव मा।रनिलेकडेस ठेविला. हाल्लीं इंग्रजांच्या दंग्यामुळें वगैरे, कोळ्यांच्या दंग्यामुळें व तोतयाच्या दंग्यामुळें गांव. दोनतीन वेळां वोस पडिला. मागती लावणी करून चाकरी सरकारची नेहमीं करीत आलों असतां हाल्लीं नारायणजी सुर्वे खंडोजी सुर्वे यांचे पुतण्ये, येऊन कजिया करितात. हाल्लीं ठकारदिक्षितांची भीड घालून गांवची सनद करून घेतली आहे. त्यास सनद माघारी घेऊन, साहेबीं वाजवी इनसाफ मनास आणून, कर्तव्य तें करावें. बेवीस वर्षे चाकरी सेवा कोणी केलीं? चाकरीची गांवबलांडे सोसले. रोजमुराहि आज दहावर्षे सुरळींत पाबत नाहीं. ऐसें असोन साहेबीं निमे गांवची सनद नारायणजीस दिल्ही! याची चौकशी जाली पाहिजे. शेवेसी श्रुत होय. हे विज्ञप्ति.

पत्रांक ३७७ श्री

राजश्री रामचंद्र माहादेव गोसावी यांसः--

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने। तुकोजी होळकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित आसिलें पाहिजे. विशेष. कसबें कडुस ता खेड येथील धर्माजी व काळोजी पोटे धणगर यांणीं विदित केलें कीं कसबे मजकुरीं आमचे मिरासी सेत नवखंडी जमीन आहे. त्यापौ कांहीं आह्मीं वाहतों व कांहीं पडित होती ते गांवकरीयांनीं दुस-यास लाविली, प्रस्तुत, जमीन आमचे आम्हीं मागत असतां द्यावयासीं गांवकरी दिकत करितात. येविशीं त्यांस ताकीद जाली पा।जे. ऐशियाशी, कसबे मजकुरीं आपल्याकडील कमावीसदार असेल त्यास पत्र देऊन याचा करीणा मनास आणून पोटे मजकूर याची जमीन ज्याकडे गेली असेल तो द्यावयासीं दिक्कत करीत असला तर त्यास ताकीद करून, वाजबी याचें मिरासी सेंत जें असेल तें झाडून यांचें यांजकडे देवावें. येविषयीं लढा * पुन्हां न राहे तें करावें. रा। छ २४. मोहरम. बहुत काय
लिहिणें ? हे विनंति, मोर्तबसुद.