पत्रांक ३८२
श्री १७१५ आश्विन-कार्तिक
विनंति उपरी. राजश्री गोविंदराव गाइकवाड यांजकडील खंडो आवजी अथवा गणेश कासी यांचे बनतां दिसत नाहीं. फौज जमा होऊन रिकामे दिवस जातात. याजकरितां त्याचें ह्मणणें आहे कीं, आम्हांस फौजसुद्धां गुजराथेस जावयास आज्ञा करावी, जातो, उद्यां दिनशुद्धी निरोपास आहे. याजकारतां त्यास तिकडे जावयास निरोप द्यावा. किंवा कसें करावें, हें लिहून पाठवावें. हे विनंति.
सरकार * लक्षाचा आंत कोणी असल्याखेरीज हातीं गोष्ट राहणार नाहीं. येवढा संदेह. वरकड जातात हें चांगले आहे. दोघांतून येक होता तर बरें होते. राजश्री माधवराव यास सांगोन कांहीं तरीं बंदोबस्त राही असें करून मग निरोप द्यावा.