पत्रांक ३८०
श्री. १७१५
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दादा स्वामींचे सेवेसीः---
पो महिपतराव जिवाजी सां नमस्कार विनंति, उपरी येथील कुशल छ १ जिल्हेज जाणून स्वकीय कुशल लिहित गेलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पा। तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाहाला. श्रीमंत उभयतां मंगळवारी प्रातःकाळीं स्वार होऊन सातारयास राजदर्शनास जाणार, श्रीमंत राजश्री नानासहि येथें येऊन च्यार पांच दिवस जाहले. त्यांणी आपल्यास यावयाविशीं पत्र लिहिलेंच आहे. लौकरीच दर्शनलाभ होईल. वरकड भेटी नंतर सविस्तर कळेल. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजेः हे विनंति. इ० इ०