Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४१२
१७१८ कार्तिक वा ८
श्रीमंत महाराजाधिराज महाराज आलिजाह दवलतरावजी सिंदे बाहादुर साहेबजी योग्यः-
माहाराज चेतसिंह बाहादुरकै आशीर्वाद. माहाराजके कुशलक्षेमतें इहांके समाचार भले है. आगें इहांसें षरीता सरकारमों भेजा है. सो राए ब्रजलाल वकीलने गुजराना होयगा. कृपा करकें जबाब ईनायत होयगा तद तसली होयगी. सरकारके कृपापत्र आवनेसे चित्तकोंबडा बोध रहता है. और रातदिन यही मनावते रहते हैं जो सरकारका तशरीफ ल्यावना हिंदुस्तानकों जलद होय, तो अपना दुष सब सरकारमें बिनती करें और कामयाब होवें. बाकी, समाचार रायमजकूर अर्ज करैगा जादा सुभ हमेशा कृपापत्रसें याद फरमाया कीजियेगा. मीती मार्गशीर्ष कृष्ण ८ मंगळवार, संवत १८५३ बहुत का लीखैं. आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४११
श्री १७१८ कार्तिक वद्य ४
राजश्री दौलतरावबाबा गोसावी यांसीः-
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। अलीबहादूर रामराम विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असले पाहिजे. विशेष यशवंतराव नाईक निंबाळकर यासी व वाघेले यासी लढाई जाली. नाईक सरकारकामास आले. त्यास, इकडे आपणाकडील फौज आहे. त्याजला ताकीद कुमकेविसी यावयाविशई पूर्वी सविस्तर लिहिलेंच आहे. त्यास, राजश्री जगन्नाथराम व आंबाजी इंगळे यांचीं पत्रें आह्मांस आलीं कीं, राजश्री माधवराव फाळके व पलटणें आह्मी कुमकेस पाठविलीं आहेत व आह्मीहि येऊन पोहचतों. ते येऊन पोहोचले ह्यणजे मोठीच गोष्ट जाली. त्यास आह्मांस आपल्याकडील भरवसा याप्रमाणेंच होता. त्याप्रों या समयीं द्दिष्टीस पडला. पूर्वापार स्नेह चालत आला आहे तोच लोभ आपण राखितील. त्यास, आह्मांकडील पुरावा करावयाची काळजी आपणांस असत जावी. रा। छ १७ जमादिलाखर, बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४१०
श्री १७१८ कार्तिक शुद्ध ९
यादी रघुनाथराव डुबल सावनेरीस लढाई जाहली. परसराम रामचंद्र यांचे ते समई जखमी जाले. सु।। सबातीसैन मया व अलफ. वि।। दौलतराव लक्ष्मण कारकून. छ ८ जमादिलावल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १६ १५८८ भाद्रपद
उत्तमगुणपरिपूर्ण निर्गवियासिरोमणि देवब्राह्मणप्रतिपालक माहाराज
राजश्री पंताजी गोपिनाथ स्वामी गोसावीयाचे सेवेसी
.॥ विनति सेवके हरि दिनानाथे सिरसाष्टांग नमस्कार विनति उपरि एथील क्षेम त॥ छ माहे रबिलोवल परयत क्षेम असो गोसावियानी आपले क्षेम लेहावया निरोप दिल्हा पाहिजे यानतर स्वामीनी पत्र लिहिली पाऊन समाचार वर्तमान मनासी आला लिहिले की तुह्मी सत्वर एणे कार्यप्रयोजन उदड आहे वा एते वेळेस र॥ बहिरो नारायणास बराबरी घेऊन एणे ह्मणउन लिहिल तरी आमचे पुतणे वेकोजीस बोरगावास पाठविले आहे व नागपचमी जाहालियावरी त्याचा वर्तमान आह्मास कळेल व तुह्मी लिहिले की र॥ अबाजीपतास कागद पावते केले की नाही ह्मणउन लिहिले तरी रा। अबाजीपतास हि माणूस पाठविले आहे त्याचा वर्तमान आठ पधरा रोजा एईल वा कागद हि घेऊन एणे ह्मणउन आज्ञा केले तरी कागदपत्र काही आह्मापासी वा रा। बहिरोपंतापासी नाहीत कागदपत्र हुकेरीस आहेत त्यास हि माणूस पाठविले आहे ऐसा वर्तमान आहे त्याचा मार्ग लक्षीत आहो याउपरि स्वामीने आज्ञा केली जे तुह्मी एणे ह्मणउन लिहिले तरी वर्तमान ऐसा आहे त्याचे उत्तर ए तोवरी आज्ञा जाहाली तरी राहून स्वामीने तैसे च एणे ह्मणऊन आज्ञा केली तरी एऊन बहिरोपंताचे उत्तर ए तोवरी वाट पाहातो त्याच उत्तर ए तोवरी मार्ग लक्षीत आहो उत्तर आलियाने स्वार होऊन एऊन कागदाचे उत्तर पाठऊन दिल्हे पाहिजे. स्वामी ह्मणतील जे गावी राहून कुलकर्णाचा कारभार करितो तरी काही गावीचे कारभार करीत नाही रा। बहिरोपताचे उत्तर ए तोवरी वाट पाहातो मग स्वार होऊन एऊन स्वामीने अभिमान धरिला आहे तो सिधी च पावेल वा अबाजीपंत हि तुमचे पत्र पावलियावरी ते हि सीर्घ च एतील जाणिजे कृपा निरंतर असो दीजे हे विनति
हे विनति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४०९
श्रीपांडुरंगायनमः १७१८ कार्तिक शुद्ध ८
राजश्री रघुनाथराव भोंसले गोसावी यासीः--
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य रो।।
दौलतराव सिंदे रामराम विनंति उपरी येथील कुशल ता। छ ७ जमादिलावलपर्यंत मुक्काम लस्कर नजीक ग्वालियेर, येथें येथास्थित जाणून स्वकीय कुशल लेखनीं संतोषवीत असावें. तदनंतर अलीकडे पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी, सदैव पत्रीं संतोषवीत असावें. यानंतर, किले जापानिर येथील महालासमीप आपल्याकडील फौज आपल्या माहालानिहायच्या बंदोबस्ताकरितां येऊन पडली आहे. तेव्हां इकडील किलेमा।रचे माहाली गावगन्ना कहीकाबाड व घासदाणा वगैरे उपसर्ग लागतो, ह्मणोन समजण्यांत आलें. ऐसियास, परस्पर पूर्वापार स्नेह. त्यापक्षीं तिकडील महालाचा बंदोबस्त होऊन इकडील मोहालीं उपसर्ग लागणें, हे अयुक्त. येविषई निक्षून ताकीद होऊन इतःपर इकडील माहलची तसनस न होय तें व्हावें. तेणेंकरून इकडूनही तिकडील माहलीं उपसर्ग व्हावयाचा नाहीं. घरोब्याचे ठाई पुरवील चालींत न्यन नसावें. ह्मणजे, स्नेहाची वृद्धी, पुरवीपासून अद्वैत, त्या अन्वयें उभयपक्षीं चालींत अंतर नसावें, हें स्नेहास चांगलें. बहुत काय लिहिणें ? लोभ असावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४०८.
श्रीरामजी. १७१८ आश्विन वा। १३
सिधि श्री सर्वोपमाजोग्य महाराजाधिराज आलीजाह माहाराजा श्रीसुबेदार दोलतिरावजी सींदे जोग्य लिषतं राव स्यंभूस्यंगकेन मुजरी बंच्या ऐंठाको समाचार भला छें. आपका सदा भला चाहिज्ये. अपरंच. आप कृपामेहरबानी राषे छे, तींसूं विशेष राषेंला. ओर दोन्यों दरबारांको ब्योहार कदीमसूं चाल्यो आवे छे, सो दिन-बरदिन बघतो जाणेंला. और केतायेक समाचार पंडित बालुबा तांतियाजीनें लिष्या छे, सो जाहरि करेंला. ओर कृपा करि कागद-समाचार लिषाबो करेंला, मीती काती बद १३ संवत १८५३ क.
माहाराजाधिराजआ. श्रीसूबेदार दोलतिरावजी सींदे जोग्य.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक. ४०७
श्री. १७३८ आश्विन वा १३
श्रीमहाराजाधिराज श्रीमाहाराजा अलीजाह सुवेदारजी श्रीदौलतरावबहादुर सिंदेजू. येते श्रीमहाराजधिराज श्रीमाहाराजा श्रीराजा धौकलसिंघजूदेवके वांच. आपर, उहांके समांचार सर्वदां भले चाहिजैं. इहाके समांचार आपुके करेतैं भले हौतें. आपर पाती षलीता आवो. हकीकति जांनीया. भांति लिषिवेमैं आई कै इहांके राज्यका बंदोवस्तु जलदी भयौ जातु है. फेर अपनै राज्यके कांमकौ जावुस्वालु करि जरूर निरयार करि पठवाईवेमैं आइ हैं. और श्रीमाहाराज कोमांर श्रीरावप्रथीसिंघजुदेवकौं लिषी है, तासौं जांनिवेमैं आइ है. ताकौ और हकीकती सब तपसीलवार श्रीरावककामुसारनलेकी याती तैं जांनी, सो भांतिभांति षातिर भई. आपके करे तै तौ जंबूदीप भरेके कार्जनकौ सुघारु होतु है. यौ राज्य तौ आपुहीकौ आई. अब हमांरे कांमकौ जरूर कैसला करि पठवाइवेमैं आवै. अब देर न होइ. जेठिनके पग वदले भाईचारे व्यौहारपर नजरि करिवेमै आवे. यौ राजु हम सब आपुहीके है. और हकीकति श्री–रावक कामुसारनलैके लिषे तैं जानिवेमैं आइ है. उहाके आनंद षुसी कीषवरें हमेस लिषवेमै आइ है. कातिक वदि १३ संवतु, १८५३ मुकांमु रींवां.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४०६
श्री लक्षुमीकांत प्रसन्न. १७१८ आश्विन शुद्ध ९
श्रीमण महादेव आलमेल मगापति श्री त्रिमलनाथ व्यंकटेशं त्रिभुवनपति आनंतकटिब्रह्मांडनायेक कल्पवृक्षं चिंतामण स्वामी दयानिधि परिपूर्ण सागर परजोतिप्रकाशगहना श्रीवछेलांछेन श्रीत्रिमलनारायेण भुवनवेकुंठपति निराकार त्रिलोकनाथ माहास्थळ शेशाचळपरवंत राजेलोक व्यंकटनायेक श्रीमाहाराज व्यंकटेश चिरंजीव भक्तं राजा शाहूछेत्रपति माहाराज व श्रीमंत पेशवे मुखे प्रधान व अष्टप्रधान व राजेउमराव व कमाविसदार यांसि समस्त पारपत्यकार रघुनाथ आचार्य मुद्राधिकारी फैजदार मुकाम तीरपति सरकार चंद्रगिरी देसी आसनपति देवद्वारी संनिध बसून आज्ञापत्र आसीरवाद. उपरि ल्ह्यावया कारण आसीजे. गोविंदआया देशमुख पराडकर याणीं हजुरगिरीस येऊन वर्तमाण विदित केलें कीं, समुद्रीपरियेत त्रिमलि याजकडे घरजमेचा यैवज थकला. वसूल होत नाहीं. त्याजवरून आज्ञापत्र रवाना केलें आहे. तर सरकारचे सिपाई देऊन, ताकीदपत्र देऊन, जेथवर त्रिमली असतील त्यास निक्षून ताकीद करून यैवज घरजमेचा गिरीस दाखल होये ते करावें. याचा फिरून बोभाट न ये तो आर्थ करावा. स्वामीची आज्ञा आहे. चिरंजीवास माझे मान्य करून स्वामीचे कार्यास ततपर असावें ह्मणजे चिंतले मनकामना पूर्ण होईल हा स्वामीचा पूर्ण भरवसा धरावा. तुह्मास प्रसाद गंध मनोहार पाठविला आहे. सेरी वंदून घेणें हा आसीरवाद. मिती सके १७१८ जळनाम संवतसरे आस्वीन शुद्ध ९ नवमी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४०५
श्री. १७१८ ज्येष्ठ-कार्तिक
मा। अनाम देशमुख व देशपांडे पो। लोणार यांसी:--
चिमणाजी माधवराव प्रधान. सु।। सबा तीसैन मया व अलफ, परगणें मजकूर येथील निमे मोकासा व तिजाई खारकुंडा श्रीहणमंतराव दरेकर सरलष्कर याजकडे फौजेचे बेगमीस सरंजाम पेशजीपासून आहे त्याप्रमाणें करार असे. तरी, सालमजकुरापासून रा। नारायणराव विश्वनाथ दिवाण व फडणीस नि।। सरलष्कर यांजकडील कमावसदारांसी रुजू होऊन परगणें मजकूरचा निमे मोकासा व तिजाई खारकुंडाचा अंमल सुदामत प्रों सुरळीत देणें. सरलष्कर यांजकडे न देणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५ १५८६ चैत्र शुध्द ७
सके १५८६ क्रोधी संवछरे चइत्र सुध सप्तमी बुधवार तदिनी खतलिखिते धनको नाम एसाजीपत आत्रे रिणको नाम गोपाल बाबाजी लेहोन दिधले ऐसे जे आत्मसुखे प्रवर्तसमधे घेतले रु॥ २०२ दोनी से वीस यासि कलांतर दर माहे सदे रु॥ १० पहिला महिना देउनु पुढिला महिनियात पैके राहिले तर दर सदे रु॥ ५ प्रमाणे देउनु हे लिहिले सही सदरहू दोनी से रु॥ देउनु हे लि॥ सही हे पैके रा। नरसिंहपंतापासून घेउनू दिधले हे पैके आपण देउनु हे लि॥ सही बिकलम
गोही
उधोजी झांबिरे रामाजी बाबाजी
मोकदम क॥ पुणे कुलकर्णी क॥ सुपे