Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४०४
पो छ ११ रा।वल सबा तिसैन. श्री. १७१८ श्रावण वद्य ५
अजम व अकरम सिद्धेश्वररावसाहेब साहेब सलाम हुताला:--
साहेब म्हेरबान मुशफक कदरदां फौज जाक्ष फौरसां अजिंदील एकलास सेख हिमतअल्ली अरब जमादार किल्ले बेळगांव सलाम बाजत सलाम मौवल करून आंकी: येथील खैर ता। छ १९ सफर साहेबांचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. दरिआयाम, अलीकडे साहेबांकडून आज्ञापत्र येऊन सेवकांचा सांभाळ होत नाहीं. तर, साहेबीं वरचेवर आज्ञापत्र लेहून दिलआराम होई तें करणार आपण धणी असां. चरणांजवळ यावयाचें मानस. गुदस्तापासून विनंती लिहितच आहें. परंतु येणेंविशीं आज्ञा आली नाहीं. तर, वर्षास साहेबाच्या चरणाजवळ एकदोन वेळां येऊन, चरण पाहिलेवर चित्त संतोष असतें, त्यास, विनंती लिहिण्यास आज्ञा येतच नाहीं. नाहींपेक्षां गणेश चतुर्थी होतांच शेवेसीं येतो. शेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४०३
श्री. १७१८ आषाढ वद्य १४
राजश्री नारायेणराव वैद्य गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रो रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित जावें. विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री व्यंकटशास्त्री द्रवीड रामानुज बाह्मण, थोर, सत्पात्र व दक्षणी गायनकळेविसीं निपुण, त्याणीं विनंती केली. याचे विनंतीवरून व राजश्री सदाशिव बापूजी यांचे लिहिल्यावरून, सविस्तर समजण्यांत आलें. त्यास, शास्त्री मशारनिले दक्षिणीगायनकलेंत वित्पन्न व ब्राह्मणहि थोर सृत्पात्र आहेत हें समजोन, इकडेस येण्याविसीं तेथें तुह्मीं व सदाशीव बापूनीं त्यांसीं बोललाच आहां. त्यापक्षीं त्यांणीं सरकारांत येण्याचें करावें. येविसींचे मजकुराची आज्ञी जी करणें ती तुह्मांकडील राजश्री राघो धोंडदेव यांसी केली आहे. लिहितील. व राजश्री सदाशिव बापूजी यांसी लिहिलें आहे. बोलतील, त्यावरून कळेल, व शास्त्री मशारनिल्हेचेहि नांवें पत्र सरकारांतून लेहून पाठविलें आहे. रा। छ २७ माहे मोहरम, बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४०२
श्री १७०८ आषाढ वद्य ५
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिवदीक्षत वाजपेय याजी स्वामींचे सेवेसी. विद्यार्थी बाळाजी जनार्दन कृतानेक सां नमस्कार, विनंत उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहाला. वरकड मजकूर व उभयेतां चिरंजीवाचे वेतनाविसीं लिहिलें तें कळलें. ऐशास, वेतनाचा ऐवज सोईसोईनें पावेल. आह्मी बदामीचा किल्ला घेऊन, तेथील बंदोबस्त करून, राजश्री हरीपंत तात्या यांस फौजसुधा करनाटकांत छावणीस ठेऊन, आह्मी पुण्यास आलों. नंतर हरीपंत तात्या गजेंद्रगड घ्यावयाकरितां गेले, तों किल्लेकरी यांणीं दहषत होऊन कौल घेऊन खालीं उतरले, किल्ला फते जाला. त्याजवर अदवानीकडे टिपूची फौज येऊन महसरा बसला. हें वर्तमान येतांच, चिरंजीव राजश्री आपा बळवंत व राजश्री बाजीपंत अणा फौजसुधा पाठऊन, कुमक करून, महासरा उठविला. तुंगभद्रेस पाणी येईल याजकरितां फौजसुधा अलीकडे आले, तों दुसरे दिवसीं पाणीहि नदीस आलें. सारांश, श्रीमंताचे पुण्यप्रतापेंकरून शत्रूवर जरब बसून फौजा अलीकडे आल्या. आपल्यास कळावें याजकरितां लिहिले असे. रा। छ १९ रमजान. * बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४०१
श्री १७१८ आषाढ वद्य २
वेदशास्त्रसंपन्न राजश्री लक्ष्मीनारायण दीक्षित स्वामीचे सेवेसीः-
विद्यार्थी चिमणाजी माधवराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित जावें. विशेष. सरकारांतून पालखी पाठविली आहे. तरी श्रावणमासाचे उत्साहाचे समारंभास आपण सत्वर यावें. रा।। छ १६ मोहरम, सु।। सबा तीसैन मया व अल्लफ बहुत काय लिहीणें? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४००
श्री नकल. १७१८ अषाढ शुद्ध १०
यादी संस्थान गढेमंडळसंबंधें दरबारखर्चाचे करार सु।। सबा तासैन मया व अलफ. मु। पुणें.
५००००० श्रीमंत राजश्री नाना.
५०००० गोविंदराव भगवंत.
५०००० नारायण बाबूराव.
३०००० किरकोळ दरकदार वगैरा.
पैकीं वसूल--------------------------------------रुपये---------------
३५००० श्रीमंत नानाकडे ७००० नारायण बाबूराव
दागिना आंगठी हि-याची. खर्चास.
-------- ------------
३५००० ७०००
--------------
४२०००
बाकी---------------------रुपये------------------------
५८८०००
तपशील.
९३००० बाकी चिठी सावकार पैठणकर दिनानाथ नाईक महाजन व राजाराम नाईक लदू व बापूदेव.
४९५००० पो वराता प्रांत वराड व गोंडवण मिळोन अलाहिदा असेत.
येकूण, पांच लक्ष अय्याशीं हजार रु, बशर्त अंमल रुपये पुणियांत चांदवड येणेंप्रमाणें करार.
छ ८ माहे मोहरम सन १२०७
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३९९
श्री ( नकल ) १७१८ ज्येष्ठ वद्य ३
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री सदाशिवपंत अभ्यंकर स्वामीचे शेवेसीः—
पो बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये लिहित जाणें. विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित वाजपेय यांजकडे सालाबाद सातारियाकडून नेमणूक पानसुपारी व दिवटीचें तेल व भाजी व मशालेचे पोत व शाई, येणेंप्रमाणें चालत आहे. त्यास, भाद्र. मासापासून अलीकडे चालत नाहीं. ह्मणून दीक्षितांनी लि।. ऐशास, किरकोळ कामाचा बोभाटा नसावा. सदर पानसुपारी शाकभाजी वगैरे सदरहूप्रमाणें सुदामत आल्याप्रमाणें यांजकडे देत जाणें. व सातारियाचे पोतापैकीं वर्षासन दीडशें रु।। पावतात ते सन अर्बापासून पावले नाहीत, म्हणून कळलें, ऐशास, त्यांच्या वर्शासनाचा ऐवज दीडशें रु।।प्रमाणें सन अर्बा व खमस व सीत तीनसालाऐवज यांचा वर्शासनाचा राहिला असेल तो देणें. रो छ १७, जिल्हेज बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३९८
श्री. १७१८ ज्येष्ठ वद्य ३
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री सदासिवपंत अभ्यंकर स्वामीचे शेवैसी.
पो बाळाजी जनार्दन सां नमस्कार. विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदासिव दीक्षित वाजपेय यांजकडे सालाबाद सातारियाहून नेमणूक पानसुपारी व दिवटीचें तेल व भाजी व मशालेचे पोत व शाई येणेंप्रमाणें चालत आहे. त्यास भाद्रपद मासापासून आलीकडे चालत नाहीं ह्मणोन दीक्षितांनी लिहिलें. ऐशास किरकोळ कामाचा बोभाट नसावा. सा। पानसुपारी शाकभाजी वगैरे सदरहू प्रों सुदामत चालत आल्याप्रमाणें यांजकडे देत जाणें व सातारियाचे पोतापैकीं वर्षासन दीडशें रुपये पावतात ते सन आर्बापासून पावले नाहींत ह्मणोन कळलें, ऐशास यांच्या वर्षासनाचा ऐवज दीडशें रुपये प्रों सन आर्बा व खमस व तीत तीन सालाऐवज यांचा वर्षासनाचा राहिला असेल तो देणें. रा। छ १७ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४ १५८०
प॥ सुपे
त॥ हकीम
भाडे
अमदानगरास
जोडीच्या बैलास बाजे जिनसास
दर एकास होनु दर बैलास
.ll= प्रताप .ll.
दौलताबाजेस याकूदखान
जोडीच्या बैलास बाजे जिनसाच्या
होनु १।. बैलास होनु
१
बकरकसाब
ख॥ सकताना ख॥ मेसी दर
दर एकास रुके एकास रुके
.ll. .l.
गोस्त दर पासरीस कची रंगावयास
रुके १० दिधली तरी रंगनावळ
सकतान मैसीस
रुके रुके
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक, ३९७
श्री. १७१८ ज्येष्ठ शुद्ध ११
तैनात–जाबता, रघु वा। फिरंगोजी.
सु।। सबा-तिसैन–मया व अलफ. मा। निलेचा मागील हा मोहरम ता। छ १० जीलकाद पावेतों हिसेबाचा फडशा करून पो छ ११ जीलकाद नवी तारीख असे बोली नवी सेर द्यावा व दरसाल रु।। २७ प्रों देणेब।। मा।निलेकडे तारीख मांडून दिल्ही असे.
१6(..) ई।। छ ११ रोज ता। छ २७ रोज १५ दरमाहा ३ प्रों सेर होता. छ. २८ रोजीं सेर बंद जाला.
ई।। छ २८ जिलकाद ता।
दरमाहा ४।। कोरडा. सेर नाहीं.
अदा होय.
११ माहे जिलकाद वैशाख.
१० रघू घरीं जातां जप्त.
१ गंगू.
------
११
माहे जिल्हेज, जेष्ठ मास.
१ खुर्दा पैसे ६४ शुद्ध ११
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३९६
श्री १७१७
राजश्रियी विराजित राजमान्य राजश्री बाबूराव स्वामीचे सेवेसीः-
पो बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा यांस बारशाचा अहेर व मुलास अलंकार व सनगें सांडणीस्वाराबराबर येणेंप्रमाणें खासगत आमचा.
सनगें. अलंकार मुलास दागिने.
७ अहेरास. २ मणगट्या पांच मण्यांच्या व
१ तिवट बागपुरी. मोत्यांच्या जोड १ यो दागिने यो
१ शेला बागपुरी. शहांत.
१ किनखाफ तांबडे. १२ मोत्यें.
२ जामेवारे बागपुरी. १० पांच ( दाहा ) मणी.
१ लुगडें पैठणी -----
१ खण पैठणी. २२
- १ पिंपळवन ये।। शहांत.
७ ९ हिरे.
२ मुलास सनगें बदली. १२ मोत्यें.
१ कुंची. ५ लोलकास.
१ पेहेरण. ७ सरास.
----- ------
२ १२
---- -----
९ २१
२ वाळे सोन्याचे पायांतील जोड
एक १ येणेंप्रमाणें दागिने.
------
५
यो सनगें नऊ व दागिने मुलांस पांच. पैकीं जवाहीर दागिने तीन व सोन्याचे दोन. येणेंप्रमाणें पाठविले आहेत. प्रविष्ट करून उत्तर पाठवावें. रा। छ. १ माहे जिलकाद. बहुत काय लिहिणें? लोभ असों दिजे. हे विनंती पो छ १२ माहे जिलकाद.