पत्रांक ३८४
श्री १७१५
मांधळेतकर.
राजश्री राव सखतसिंग गो.
अखंडित-लक्ष्मी रामराम सु।।
.
पुण्याचे जकातदार
विसाजी भिकाजी, जकात प्रांत पुणें व जुनर गे।। दंडवत सु।।.
पनवेली कोकणप्रांत.
बाबूराव हरी,
बीडकरसाहेब.
श्री श्री श्री परब्रह्ममूर्ती श्री श्री श्री कादर सो बाचे चरण सेवेसी. दासानुदास चरणरज दौलतराव सिंदे सां दंडवत विज्ञापना. येथील कुशल ता।। छ पर्यंत आपले कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष.
तीर्थस्वरूप मातुश्री लखाबाई वडिलांचे सेवेसी.
अपत्य दौलतराव सिंदे दंडवत विनंति.
श्रीमंत राजश्री देव संस्थान चिंचवड स्वामींचे सेवेसी.
सेवक दौलतराव सिंदे विनंति उपरि येथील कुशल ता। छ पर्यंत श्रीचे कृपेंकरून यथास्थित असे विशेष.
१ राजे मा। जगदार दी तोफखाना खुषवख्त-बाषद आज दौलतराव सिंदे सलाम सु।। ज्यादा काय लि। पुढें मोर्तब किताबत नाहीं.
१ मे।। मानसिंग जगदार यास सु।।.
तीर्थरूप मातुश्री लक्ष्मीबाई व भागीर्थीबाई व यमुनाबाई सिंदे वडिलांचे सेवेसी.
आपत्यें दौलतराव सिंदे चरणीं मस्तक ठेऊन सां दंडवत. विज्ञापना ता। वडिलांचे आशीर्वादेंकरून वर्तमान यथास्थित असे विशेष.
हो।। ती।। केसराबाईस दंडवत विज्ञापना सदैव पत्रीं तोशवीत जावें.
हे।। रहिमान बिबी पन्हा–बाई व जोहारबाई व सरसरुपबाई व जिंनत व मुरादनबाई यांस दंडवत विज्ञापना सदैव पत्र पाठवून तशवीत जावें.
चिरंजीव बाळास.
वरकड बा।। प्रा। च तीर्थरूप मातुश्री मैनाबाई सिंदे यांस.
उभयतां आंग्रे मामा यांस तीर्थस्वरूप व दंडवत उपरी.
जैसिंग आंग्रे यांस आखंडित सु।। सेवटीं विनंति नाहीं. बहुत काय लिहिणें, येथें मोर्तब.
लक्ष्मण जामदार यास मौ ह्मणोन.
गंगाधर गोविंद सागरवाले यास अखंडित विनंति उपरी तीर्थरूपाचें नांव लिहावें.
राव रंभाजी जयवंत निंबाळकर यांस सकलगुणा विनंति लि। जावें.
रामचंद्र नारायण सुभेदार पुणें आखंडित विनंति.
मालोजी राजे घोरपडे आखंडित व विनंति.
विनंतीवाले.
१ मातबर पागे व सिलेदार. १ थत्ते.
१ आंबाजी इंगले भावासुधा. १ गोविंदराव भगवंत.
१ खंडेराव हरि. १ माधवराव बाबर.
१ श्रीमंताकडील संभावित का। दार. १ सेळूकर उभयतां.
१ आनंदराव बहिरव. १ माधवराव बाजी.
१ सखारामपंत बापू पानसे. १ वामनाजी हरी.
१ माधवराव रामचंद्र. १ पांडुरंग बलाळ नि।। कवीजंग बाहादूर
१ जगन्नाथराम व लक्ष्मण अनंत. १ जगदले मानसिंग व राव व खंडेराव मसूरकर.
१ बाबूराव कृष्ण किलेदार साता-याचे.