पत्रांक ३८१
श्री. १७१४।१७१५
विज्ञापना. मषीरुलमुलूख यासीं उभयतां गोविंदराव यास नबाबाचे समक्ष बोलणें जाहलें की: इंग्रजांचें पत्र मिस्तर कनवी याचे विद्यमानें आलें आहे. व मीर अबदुल कासम याचे विद्यमानें आलें आहे. त्यास, प्रस्तुत त्याजला जाब लिहून द्यावा कीं, टिपूचा करार रावपंतप्रधान यांचा व आमचा राजश्री हरीपंत यांचे विद्यमानें जाहला होता त्यास तीन सालें जालीं. त्याजकडून कांहींशी पेशकदमी आढळून आली, श्रीमंतांशीं ऐवजाचा करार केला. तोहि कराराप्रों अमलांत न आला. यास्तव रावपंतप्रधान यांजला आह्मांस त्याची तंबी करणे जरूर होती. इतकियांत तुमचीं. पत्रें आलीं. त्याजवरून बाहिर निघावयाचा निश्चय केला. त्यास, तुह्मांस. खुषकींतून यावें लागतें. समुद्रांतून येणें, तेव्हां समीप पडतें. हा मजकूर एक. दुसरा मजकूर कृष्णापासून त्याचा तालुका लागतो. त्यास, तालुका टाकून पुढें येतां येत नाहीं. तालुका हस्तगत करून पुढें यावें. तालुका, किल्ला तैसाच ठेऊन पुढें आल्यास आमची स्वारी येईल. मागाहून वरचेवर लोक येणें, रसद येणें, त्याजला अडथळा होईल. यास्तव फौज पुढें रवाना करावी. रावपंतप्रधान याचे आमचे मुलाकात नाहीं. मुलाकात येऊन इतफा कोणत्याचे मुलखांत चालाणें जाहलें तर चालावें. अथवा अलाहिदा अलाहिदा चालावें, त्यास, रावपंतप्रधान यांची स्वारी प्रथमतः त्यास, मुहूर्त चांगला पाहून निवाले पाहिजे, थोरली मसलत च्यार महिने कमजादा जाहल्यास चिंता नाहीं, याप्रो पत्रें पाठवावीं असा निश्चय जाहला. हे विज्ञापना.