Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३९५
श्री. १७१७
यादी सरकारचा ऐवज हाप्त्याबाबद भोंसले यांजकडे येणें:-
४३३००० ऐन.
१५१५० ऐन हप्ता रु।। ४३३००० पौ हुजूर भरणा जवाहिर व हत्ती
वगैरे १३०००० बाकी ऐवज ३०३००० याची बट्टा हुडंणावळ सरासरी दरसेंहे रु।। ५ प्रों.
--------------------
४४८१५०
पैकीं वसूल.
२००००० केशवदास मारवाडी याजकडून.
१००००० गोमाजी पातेदार याजकडून.
१२५०० आंगठी हि-याची १०००० व बाळ्या हि-याच्या २५००
१३००० हत्ती नग ३ यो ८०००,५०००
३००० बा। देणें नारायण बाबूराव यांणीं खर्चास घेतले.
--------------------
३२८५००
बाकी ऐवज येणें ११९६५०
तपशील.
१०४५०० ऐन भरण्यापैकीं कार्तिक अखेर द्यावयाचा करार आहे तो देवावा.
१५१५० हुंडणावळ व बट्याबद्दल येणें.
--------------------
११९६५०
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३९४
श्री. १७१७
यादी सरकार भरणा यास भोंसले यांणीं ऐवज लावून दिल्हा. केशवदास याजकडून हप्ता रु।। ४३३००० पैकीं.
२००००० केशवदास यांजकडून.
२८५०० कित्ता ऐवज लावून दिल्हा त्याजबा।.
१३००० हत्ती नग दोन. ८०००।५०००
१२५०० आंगठी व बाळ्या हि-याच्या रवाना खंडो मुकुंद याजबा।.
३००० बा। नारायण बाबूराव यांस खर्चास.
------------
२८५००
४६६२॥ कर्जजमा, हुंडणावळीबा। गु।। विठ्ठलदास ऐवज रवाना केला त्याजबा।.
-------------
२३३१६२॥
ऐन भरणा सरकार.
१००००० जवाहीर दागीने तीन अन्याबा याजसमागमैं पा। ते.
५५००० पोंहोची हियाची.
३५००० आंगठी हि-याची.
१०००० स्मरणी पाचेची.
५०००० रोख हुंड्या चांदवड गु।। विठ्ठलदास.
----------------
१५००००
७५००० श्रीमंत अमृतराव साहेब यांजकडे.
२०००० कि।। चांदवड.
५५००० कि।। शिक्का गु।। विठ्ठलदास व केशवदास २५०००,
३००००
-------------------
७५०००
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ४९ ] श्री. १६९७.
पूर्वी राजे थोर थोर जाहाले, त्याची नांवनिशी यादी जाविता. पादशहा झाले त्याचा तपशील पुरुष १७३ एकूण मुदती वर्षे बितपशील. ता। शके १६१९ ईश्वर नाम संवत्सरपर्यंत कली गतकली. बेरीज. वर्षे ४७७९.
तपशील
महाराष्ट्र राजे पुरुष १२० एकूण मुदती वर्षे सुमार ३६७२ |
मुसलमान पातशहा पुरुष ५३ त्रीपन एकूण मुदती वर्षे देखील औरंगशहा शके १६१९ ईश्वर नाम सवत्सरपर्यंत वर्षे ११०७ |
तपशील
राजा युधिष्ठिर व त्याच्या घराणियांतील राजे पुरुष ३० तीस एकूण
मुदती वर्षे बेरीज महिने दिवस
१८५३ ११ ८
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३ १५७३ चैत्र शुध्द ७
अज रख्तखाने माहाराज राजश्री शाहाजी राजे दामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि प॥ सुपे बिदानद सु॥ इहिदे खमसेन अलफ बे॥ लक्षमीधरभट बिन जाऊभट जोसी कसबे मजकूर हुजूर एउनु मालूम केले जे आपणास इनाम व रोजमरा बितपसील
दर सवाद क॥ मजकूर जकाती चौत्रा क॥ म॥
बागबागायत चावर एक दे॥ पैकी रोजमरा दरोज
कटुबान टके नख्तयाती त॥ रुके सा ६
१५ पंधरा ठाणे व त॥ देहाय
विष्णु हरदेऊ कुलबाब कुलकानु
कुलकर्णी प्रज जाऊ प॥
अंबराईपेंडी एक बिन नरस प॥
१ भोडवा
एणेप्रो। ब॥ फर्मान व ब॥ भोगवटे वजिरानि व ब॥ खु॥ र॥ इ। त॥ साल गु॥ भोगवटा व तसरुफाती चालत आले आहे ऐसीयास सालमजकुरी कुल इनाम इमानत करणे ह्मणौनु माहालास एकदर खुर्द खत सादर आहे त्यावरून कारकुनी आपला इनाम अमानत केला आहे तरी साहेबी मेहेरबान होउनु आपला इनाम आपले दुमाले केला पाहिजे दरीं बाब खुर्द खत होए मालूम जाले जरी भटमजकूर हुजूर आला होता याच्या इनामाची कुल हकीकत हुजूर मनास आणौनु सदरहू इनाम पैकी अमानत केले बागबागायत कटुबान व अबा पेड एक व जमीन चावर .॥. नीम व रोजमरा रुके ४ च्यारी एणेप्रमाणे अमानत केले असे हे + + + बाकी भटमजकुरास इनाम करार
रोजकीर्दीपैकी चावर नीम रोजमरा दर सवाद जकादी
०॥० चौत्रा क॥ म॥ पैकी रुके च्यारि
४
+ + + + + व प्रज व बाबेहाय
सदरहू प्र॥
एणेप्रमाणे करार केले असे सदरर्हूप्रमाणे चालवीजे दरहर साल ताजे खुर्द खताचा उजूर न करणे तालीक लेहोनु घेउनु असेली भटमजकूरासी फिराउनु देणे + + + + जेमाखान पीरजादे मोर्तब सूद
र॥ छ ६ माहे रबिलाखर
रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३९३
श्री १७१७ माघ वद्य ७
मसोदा गाइकवाड यांस पत्र.
विशेष. इकडील ऐवज येणे, त्यास बहूत दिवस जाहले, अद्यापि निर्गमांत येत नाहीं. पेशजी दोन तीन पत्रें पाठविलीं, त्यांची उत्तरेंहि आलीं. तथापि ऐवजाचा निकाल पडत नाहीं. हालीं कारकून पाठवावयाची सिध्धता केली असतां, राजश्री नीलकंठराव अनंत व जावजी पाटील गौळी यांचें ह्मणणें कीं, येविस पेशजी पत्रें रवाना जाहली आहेत, हालीं पत्र लिहून द्यावें, आह्मी लिहितों आणि ऐवजाचा निकाल होये तें करितों ह्मणोन, त्याजवरून, आपणांस लिहिलें आहे. त्यास इतक्यावर सत्वर ऐवजाची सरबरा होऊन यावी. येथील जाबसाल मसलतसीर, ऐवजाची निकड. या प्रसंगी लिहिल्यान्वयें अमलांत आल्यानें, परस्पर घरोबा चालत आला त्यांत अंतर न दिसोन, उत्तरोतर ऐक्यत्वाची वृध्धि राहील. याउपरी उत्तम दिसेल तैसें घडावें. रा। रावजी आपाजी व जावजी पा। येथें निर्गमांत आणून देत, ऐसें तर्तूद जरूर करविली पाहिजे.
छ २० साबान, सन सीततिसैन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३९२
श्री (मसुदा) १७१७ आश्विन शुद्ध ३
राजश्री बाळाजीपंतनाना गोसावी यांसीः-
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी. आपणापासून कर्ज घेतले मु।। रुपये ३००००० तीन लक्ष चांदवडी. हे रु।। व सालमारीं सरकारांतून मंडले संस्थान आह्मांस दिलें त्याजबद्दल आपले कारकुनाचा ऐवज करार केला रु।। ५३५००० पांच लक्ष पस्तीस हजार चांदवडी, वि।। नारायण बाबूराव वैद्य, यांसी मुदती.
३००००० अलाहिदा खत आहे त्याप्रें। मार्गशीर्ष वद्य १
५३५००० बशर्त मंडळेयाचा अंमल बसे तोंपर्यंत नारायणराव वैद्य
यांजसी अनामत असावें. याचा फडशा पौष अखर शके १७१९ करून देऊ.
---------------
८३५०००
एकूण सदरहू दोन मुदतीस आठ लक्ष पस्तीस हजार रु।। देऊं. त्यांत पांच लक्ष पस्तीस हजार रु।।याचे अलाहिदा वराड व गोंडवण येथील आह्मीं आपले अंमलावर वराता लिहून दिल्या आहेत. त्याचा ऐवज पावेतों तेथें उपद्रव लागणार नाहीं. याप्रमाणें दोहों मुदतींनीं आठ लक्ष पस्तीस हजार रु।। क्षेपानिक्षेप श्रीरामचंद्रजीचे शफत पावते करूं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ४८ ] श्री. ३ एप्रिल १६९७.
राजश्री आबाजी सोनदेव भारद्वाज गोत्री गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक रामचंद्र नीलकंठ अमात्य हुकुमतपन्हा नमस्कार. सुहुरसन सबा तिसैन अलफ. तुह्मीं हुजूर विदित केलें कीं, आपले आजेसासरे पोसो बहिरव यांचें पतक बाजारदरवाजा, कसबे पाटगाउं, येथील वतन होतें. तें त्याहीं लग्नामध्यें आपणास आंदण धारादत्त दिलें त्याचीं अर्पण पत्रे आह्मांपाशीं होतीं. त्या पत्रांवरून तेथें जाऊन पतकाची कमावीश करावी तों, धामधूम झाली. त्या प्रसंगांत अनुकूल पडलें नाहीं याउपरी आपण कर्नाटक प्रांतास गेलों. मार्गी जातां उपसर्ग झाला. यास्तव पत्रें होतीं ती गेली कांहींएक दिवस कर्णाटक प्रातीं होतों. तेथून राज्य सुगम झालें. राजश्री छत्रपति स्वामीची आज्ञा होऊन या प्रांतास आलों पतकाची कमाविश करावी तों, राजश्री शामराऊ मुरुबकर याणी पतकमजकुरास कोणी खावद नाहीं, याकरिता आपणांस पतकमजकूर वतन करून द्यावे, ऐसा गौरवाका स्वामीस सांगितला. त्यावरून स्वामीनें त्यास सिर्णी होन पा। ५० पन्नास रास घेऊन वतन करून दिले असे ये गोष्टीस सा, सात वरुषे झालीं पुरातन आपले आजेसासरे यांचें वतन त्याणी आपल्या मनोदयें करून दिलें त्यांचीं पत्रे होतीं तीं गेलीं परंतु ये गोष्टीतें साक्ष बहुतजण आहेत आपले वतन आपलें स्वाधीन करून वतनाची सेवा घेतली पाहिजे. ह्मणून त्यावरून ये गोष्टीची चौकसी करून मनास आणितां हमशाही वतनदार आहेत, त्यापाशी ये गोष्टीची गोही साक्ष मनास आणिता, तुमचे आजेसासरे पोसो बहिरव याणीं आपले वतन आदण धारादत्त दिल्हे, हे सत्य जालें याकरितां बाजारदरवाजा, कसंबे पाटगाउ, येथील पतक तुमचे, असे खरेखुरें झाले यास्तव, शामराऊ मुरुंबकर याणें पहिले पतकास कोणी खावद नाहीं. ऐसा गैरवाका सागितला, आणि वतन करून घेतलें तें त्याचे वतन दूर करून, त्यास सदरहू वृत्तीचीं पत्रें दिल्ही होतीं, ते कुलीं रद्द केली; आणि त्यास सरदहू वृत्तीशीं सबंध नाही ऐसे केलें असें. तुमचा सदरहू वतनाचा भोगवटा चालिला नाही याबद्दल तुमच्या माथां सिर्णी होन पादशाही १०० एकसें रास ठेविले. आणि त्याचा वसूल हुजूर घेऊन, तुम्हावरी कृपाळू होऊन, सदरहू वतन पतक बाजारदरवाजा, कसबें पाटगावीचें , अजरामरामत करून राजश्री अंताजी विठ्ठल देशाधिकारी प्रांत कुडाळ यांच्या नावे सनद सादर केली असे. ते तुमचे दुमाले करून चालवितील तुह्मीं पुत्रपौत्रीं वंशपरंपरेस अनुभवून सुखरुप पतकमजकुराची कमाविश करीत जाणें. या वतनास हक्क लवाजिमा महतकदम चालिला असेल त्याप्रमाणें तुह्मांस करार केला असे. तुह्मीं घेत जाणें. जाणिजे. छ २० रमजान. निदेश समक्ष.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३९१
श्री १७१७ आश्विन शुद्ध ३
याद.
९ सरकार निसबती.
१ मंडले.
१ चौरागड पंन्नास हजाराची जागीर सुद्धां.
१ दस्तावेज पहिले द्यावेत.
१ गंगाथडीचे माहाल लाऊन द्यावेत.
१ किस्त नबाबाकडील बमय कलम.
,, ,, दरबार खर्च
१ नबाबास थैली.
१ गोविंदराव कृष्ण यांस.
१ बुंदेले यांस ताकीदा.
१ भोपाळकरांस पत्र.
----------
९
६ खासगत.
१ सनदा गांवच्या ३.
१ पंचवीस हजारांचे भरतीचे गांव व स्वराज्याची माफी.
---------
२
४ खासगत जातीचे.
१ जलगांव परगण्यांत गांव इनाम वंशपरंपरा.
२ पुण्यांत.
१ हवेली राहण्यास.
१ वाडी व जमीन एक चाहूर इनाम वंशपरे.
---------
२
१ १ असामी चिरंजिवाचे नांवें सरकारची.
---------
४
---------
६
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२ १५७१ पौष शुध्द १२
अज रख्तखाने माहाराज राजश्री शाहाजी राजे दामदौलतहू बजानिबु कारकुनानि प्रा। सुपे बिदानद सु॥ खमसैन अलफ माल मेहतरिया चांभार प्र॥ मजकुर हजूरु एऊनु मालूम केले जे प्र॥ मजकुरीच्या चांभारास गहदम सालाबाद सारा घेणे तो ऐन जिनस पायपोसी च घेत असेती नख्त काही आपण देत नसो ऐसे असता आणापासूनु ऐन जिनस जोडे घेत नाहीत दर जोडियास टके १lll. प्रमाणे नख्त घेताति याकरिता आपला काही हाल उरला नाही तरी साहेबी मेहरबान होऊनु सालाबाद प्रमाणे आपणापासूनु ऐन जिनस जोडे च घेतले पाहिजेती नख्ताची कमावीस कुली दूरी च केली पाहिजे प्र॥ मजकूर देखील क॥ बारामतीचे कुल चाभार आपल्या हाताखाले चालेत ऐसे केलिया आपण होनु ७५ पच्याहात्तर आपल्या हकलाजिमियापैकी साहेबाचे बादगीस पेशकश करून यास सालमजकुरी होनु ५० पनास झाडा करून देईन पुढिल साली होनु २५ पंचवीस एणेप्रमाणे झाडा करून देऊनु दरीबाब सरजाम होए मालूम जाले तरी नख्ताची कमावीस साहेबी कुली दूरी च केली असे प॥ मजकुरीचा चांभारापासूनु नख्त एक रुका ने घणे सालाबादप्रमाणे ऐन जिनस पायपोसाचे जोड च यापासूनु घेत जाणे ऐन जिनस जोडे याजपासूनु घेऊनु मुकासाईयास देत जाणे आणि मुकासाईयाच्या आबिया खाले दर जोडीस टके १lll. प्र॥ नख्त लिहीत जाणे कुल चांभारापासूनु एक रुका तो हि नख्त ने घणे व प॥ मजकूर देखील बारामती कुल विलायतीच्या चाभारास ताकीद करून माल मेहतरियाच्या हाता खाले वर्तवीत जाणे हिलाहरकत करील त्यास बरजोर ताकीद करीत जाणे व याची कबुंलाती सदरहू होनु ७५ पंच्याहात्तरी यास सालमजकुरी उसूल करूनु घेणे होनु ५० पनास व पुढिले साली घेणे होनु २५ पंचवीस एणेप्रमाणे दुसाला रुकियाचा रुका झाडा करून घेणे दर हर साल ताजे सनदेचा उजूर न करणे तुह्मी तालीक लेहोनु घेऊनु असल परतोन दीजे प। हुजूर र॥ शाहा अजम हैदरशाहा मोर्तब सुद
छ १० माहे रुजू
मोहरम सुरुनिवीस
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३९०
श्री ( नकल ) १७१७ आश्विन शुद्ध ३.
यादी राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा याजकडील जाबसाल सु।। सीत तिसैन मया व अल्लफ नबाबनिजामअल्लीखांबाहादर याजवर कालेंकरून बिघाड जाहला तर तुह्मीं शरीक असावें, हा पूर्वीचा करार. त्याजवर सरकारांतून बिघाड जाला. आह्मांस ज्या ज्याप्रमाणें इशारा केला त्याप्रों अंमलांत येऊन आमचें येणें होऊन, भेटीचा प्रकार घडून, सर्व प्रकारें शरीक जालों. नबावाचा सलुख जाहला, त्या वेळेस नबाबाकडून कामें उगवून दिल्हीं. कलमें.
प्रांत गंगथडीचा घांसदाणा एकंदर प्रांत गंगथडी येथील घांसदाण्या
रुपये ३५०००० साडे तीन लक्ष चा एकंदर ऐवज येणें. त्याप्रों ऐवज
करार ठरले. त्याप्रों प्रांत मजकुरीं लावून दिल्हा. बाकी मुबलक राहिली.
घांसदाण्याचें एकंदर माहाल तीन लक्ष ली, त्याचा ठराव रु।। २९०००००
अठरा हजार याचे माहाल लाऊन तपशील.
द्यावे. याप्रों ठरलें कलम १. १५०००००निक्त.
८००००० नबाबाचें येणें वराडांत
सन ११८५ सालीं जालें. तेव्हां
पांच लक्ष रुपये देऊन, आठ लक्ष
रु।। रोखा लिहून दिल्हा. तो माघारा द्यावा.
६००००० आपले भेटीस आलों
तेव्हां मागांत घांसदाण्याबा। ऐवज
असेल, तो मामलेदारांचे रुजु(वाती)
वराडांत सांप्रत नबाबाचा व आमचा नें मुजरा देऊन, बाकी राहील तो
अंमल चालत आहे तसा चालावा. ऐवज द्यावा.
पुढें परस्परें ज्यादा तलबी कलम १
होऊं नये, याजप्रों करार जाहला ----------------
आहे. कलम १. २९०००००