Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ३८९

श्री नकल. १७१७ आश्विन शु. ३.


राजश्री रघोजी भौंसले सेनासाहेब सुभा गोसावी यासीः-

सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। माधवराव नारायण प्रधान आशीर्वाद विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष संस्थान गढेमंडलें, खेरीज चौरागड करून, रेवादक्षणतीरचे महालपैकीं बितपशील.
१ पा। बांचई.
१ पा बिछिया तालुके दोन.
१ पा बरगी तालुके आठ.
१ पा। भवरगड तालुके तीन.
१ पा। रायपूर चौरागड ता। सात.
१ पा। खांडेबान्हे तालुके नव.
१ पा। पलाहो.
१ पा। देवरघा.
१ पा। मकुंदपूर.
१ पा। संभलपूर.
१ पा। रामगड.
१ पा। कटोटिया.
------
१२

एकूण माहाल बारा पैकीं च्यार लक्ष बेरजेचे माहाल आपलेकडे द्यावयाविशीं राजश्री बाळाजी गोविंद यांसी अलाहिदा सनद सादर केली असे. तरीं ते माहाल लाऊन देतील ते घ्यावें. सदरहू माहालपैकीं ज्या माहालीं सरकारी अंमल बनला नसेल, तेथें आपण अंमल बसवून द्यावयाचा करार केला आहे. त्याद्यमाणे अंमल बसवून देऊन, आपलेबराबर बापूजी लक्ष्मण कारकून दिल्हे आहेत त्याचे हवालीं करून द्यावें. दिक्कत पडूं नये. रा। छ १ माहे रा।खर, सुहुरसन सीत तीसैन मया व अल्लफ बहुत काय लिहिणें ? लोभ आसों दीजे. हे विनंती.

पत्रांक ३८८

श्री.( नकल.) १७१७ आश्विन शुद्ध १


राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावीः-


पो माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहणे. विशेष. तीर्थस्वरुप कैलासवासी नानासाहेब यांणीं संस्थान गढेमंडळेपैकीं रेवादक्षणतीरचे सोळा माहाल कैलासवासी रघोजी भोंसले यांस करार करून दिल्हे होते. परंतु भोंसले यांचा अमल महालीं दखल जाला नाहीं. त्यास, हालीं राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेब यांणीं पुण्याचे मुक्कामीं येऊन व दक्षणतीरचे महालांविसीं रजबद्दल केली. त्यास मशारनिले सरकारलक्षाप्रमाणें चालतात. सबब त्यास सरकारांतून रेवादक्षणतीरपैकीं, खेरीज चौरागड करून, कमाल आकाराचे माहाल रु।। ४००००० च्यार लक्ष रुपयांचे द्यावयाचा करार ठहरला. ते महाल दक्षणतीरचे बीतपशील.
१ पा। बचई.
१ पा। बिछिया तालुके दोन.
१ पा बर्गी तालुके आठ.
१ पा। भोवरगड तालुके तीन.
१ पा सायपूर चव-यागड तालुके सात.
१ पा। खांडेबान्हे तालुके नव.
१ पा। कठोठिया.
१ पा पलाहो.
१ पा। देवरधा.
१ ता। मुकुंदपूर,
१ पा। संभलपुर.
१ पा रामगर.
-----
१२

एकूण बारा माहालपैकीं सरकार अमल ज्या माहालीं असेल त्यापैकीं किल्ले चौरागडच्या खर्चाबद्दल रुपये ५०००० पंनास हजार रुपयांचे माहाल व गांव किल्ल्या लगत असतील ते सरकारांत किल्ल्याचे खर्चास ठेऊन, बाकी सरकारअमली माहाल सेनासाहेबसुभा यांजकडे सदरहू चार लक्षांचे यावयाचे करार करून, ते सनद तुह्मांस सादर केली आहे. तरी मशारनिलेचे दुमाला करणें. चार लक्षांचे बेरजेहून अधीक बेरीज सरकारअमली माहाली जालियास, त्याचे माहाल सरकारांत ठेवणें, च्यार लक्षांचे भरतसि अमलीं माहालपैकीं बेरीज कमी आलियास, गैरअमली माहाल आहेत त्यापैकीं भरतीस कमाल आकाराचे बेरजेचा माहाल लावून देणें. जाणिजे. छ २९ रा। वल, सुसीत तीसैन मया व अल्लफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.

पत्रांक ३८७

॥ श्री. ॥ १७१६ माघ शुद्ध ५


राजश्री दवलतराव-बाबा शिंदे गोसावी यांसीं:--

छ अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य गंगाभागीर्थी अहिल्याबाई गाइकवाड मु।। देवळाली प्रो नाशीक विनंति विज्ञापना येथील कुशल ता। माघ शुद्ध ५ पावेतों आपले कृपा-अवलोकनेंकरून यथास्थित असों. विशेष. आमचें वर्तमानः आमचे धणी कैलासवासी जाले नंतर मानाजीराव गायकवाड यांनीं पंचवीस-तीस लक्षाचें * वितें घरांत होतें तें दरोबस्त लुटून नेलें. आह्मांस एक वस्त्रानसीं एक घर लहानसें होतें तेथेंच टाकीत ठेविले. आण मानाजीराव देवलकास गेले. तदनंतर गोविंदराव गायकवाड आले. त्यांनीं येतांच प्रथम आमची खायाखर्चाची नेमणूक दाहा हजाराची होती ते बंद केली आण घरास खणतें लाऊन एक लक्षाचें वितें नेले. मग तेथें आमचे चुलते नारोजी देशमुख होते त्यांजपाशी आह्मी डागिने चवलक्षाचे ठेविले आण आह्मी श्री मार्तडाचे दर्शणास जेजुरीकडे निघालों. आमचे मागें देशमुख मजकूर यांनी गोविंदराव-बावास सांगून डागिने चवलक्षाचे त्यांस दिल्हे आण आपण मामलत करून गेले. आह्मी ये प्रांतीं आलों. तेव्हां आह्मांस वारीस एक श्रीमार्तंड किंवा आपण आहेत यास्तव विनंति लिहिली आहे. तर, आमचा बंदोबस्त करून देविला पाहिजे. आह्मीं भेटीस यावें, तर येथें आम्हांस खर्चाची आबळ आहे, यास्तव हें पत्र लिहिलें. आपण गोविंद राव बावास ल्याहावें. आमचे धण्याचे हातची नेमणूक आहे ते आह्मांस देवावी. व हाली रावबा पुणें प्रांतीं येणार आहेत. त्यांजलाही ताकीद करावी, दुसरें: नारोजी देशमुख यांचे साठ गांव आहेत, त्यांतून तीस गांवांवर आपण जप्ती पाठऊन, आपण आह्मांस हात उचलून खायाखर्चास द्याल, त्यांत आह्मीं राजी आहों. आपण बहूतांचें पालन केले तैसें आमचें केलें पाहिजे. विनंतीपत्र लिहिलें आहे. हें उदास न करावी. दुसरें: आमचें धण्यास एकशेंसाठ बायका होत्या. त्यांत चौघी खाशा. गोविंदराव गायकवाड यांणीं बायका दरोबस्त काढून दिल्या आण आमची चौघींची हे गते केली. हें वर्तमान सेवेसी विनंती लिहिली आहे. तर, आमचा बंदोबस्त करून दिल्हा पाहिजे. आमचे धण्यानीं कोट्याणकोट पैका असोन, त्यांचे देऊळ कोणें बांधलें नाहीं, हें आपल्यास श्रुत होये. आपण पाटिलसाहेबाचे पोटी कुलदीप आहेत. मी धर्माची बहीण जाणेन, हें कार्य केले पाहिजे. आण हें न जाल्यास आपले पायापाशीं बोलाऊन घ्यावें. आपण शेर पीठ द्याल तर खाऊन बसूं. यादो भास्कर यांणी सर्व बंदोबस्त करून, घरोघर लाविले. दमाजीबावाचे हातचे दोनच्यार गांव पाटिलकीचे आहेत, त्यांत सर्वपरी काल यात्ता आहे, आमचें कोठें चालू देत नाहींत. आह्मांस पत्रें आणून दाखवितात कीं, आम्हांस धण्यांनीं सांगितलें. मग खरें किंवा खोटें हें नकळे. त्याजमागें मानाजी बावाचे वेळेस वाण्यांनीं उपसर्ग दिल्हा. त्याजमागें आतां तर परभूमयेच जालें. सर्व कारभार सोडून बायकांस लुटितात. सेवेसी श्रुत होय. हेतूप्रमाणें भरवसा जाणून, हें पत्र कोण्हास न दाखवणें आण उत्तर पाठविलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञापना.

पत्रांक ३८६

श्री. १७१६ माघ शुद्ध ३


राजश्रीयाविराजित राजमान्य राजश्री परशराम रामचंद्र स्वामी गोसावी यांसी:---

पोष्य माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहित जाणें. विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री नारायणाचार्य व शामाचार्य यांणीं हुजूर विदित केलें कीं, मौजे मांगलें, ता। सातवें. प्रां पनाळा, हा गांव दरोबस्त इनाम आपले वडील माधवाचार्यप्रभृति यांस श्रीमंत कैलासवासी राजाराम साहेब यांणी देऊन पत्रें करून दिल्हीं. त्यास, पांचजण भाऊ. त्यांपै।। कृष्णाचार्य यांचे नातू गोपाळाचार्य ह्मणों लागले कीं, गांव आपल्यासच दिल्हा. सबब त्याचा व आमचा कलह नऊ वर्षे लागला. त्याची पंचाइत सरकारांत होऊन, गोपाळाचार्य खोटे जाहाले. तेव्हां, पांचहजार एक रुपया आह्मां जवळोन हरकी घेऊन गांव पांच जणाकडे चालवावयाविशीं सरकारचीं पत्रें दिल्हीं. त्यास, आपण कष्टमेहनत केली. याजकरितां वांटणींखेरीज दर असामिनीं सालदरसाल शंभर रुपये प्रों चारशें आह्मांस चौघां भावांनी राजश्री माधवराव गंगाधर यांचे विद्यमानें द्यावयाचा करार करून, पत्रें करून दिल्हीं. त्याप्रों चालत असतां, अलीकडे चार रुपये द्यावयास दिकत करतात. येविशींची ताकीद जाली पाहिजे ह्मणून. त्याजवरून हें पत्र लिहिलें असे. तरी यांचे भावाबंदांनी दरसाल रुपये चारशें देत जावे ह्मणोन पत्रें करून दिल्हीं आहेत. त्याप्रों चालवावयास दिकत करीत असल्यास ताकीद करणें. जाणिजे. छ १ रजब, सु।। खमस तिसैन मया व अल्लफ बहुत काय लिहिणे ? हें विनंती.

लेखांक ११                                                                                                                                     १५६८ आश्विन शुध्द                                                                                                               
                                                                                                                                                                             तालीक

                                          11 1                                           11 2

अज दिवाण ठाणे प॥ सुपे त॥ ------------------------------------ देसमुखानि प॥ म॥              मोकदमानि मौजे + + + मजकूर सु॥ सबा अर्बैन अलफ त॥ बापदेभट बिन लक्षमीधरभट जोसी क॥ म॥ इळतमेसी केली जे मगळमूर्ती गोसावी सौ। मोरेस्वर यासि इनाम जमीन चावर व सालीना होन ५ पाच आहे दर सवाद बित॥

जमीन चावर एक दर                                सालीना सादिलवार
सवाद मौजे आबी बु॥                                नि॥ रया प॥ म॥
कुलबाब कुलकानू पटिया                           देसमुखी प॥ समधे
सहित चावर गजशराइणी                          घ्यावे होनु ५
प्रा। चावर १

एणेप्रमाणे आहे याचे भोगवटेचे कागदपत्र कुल आहेत गोसावी आणि आपण गुरुभाऊ यानिमित गोसावी वाराणसीस जाता सदरहू इनामती कागदपत्रसहित धर्मार्तबुधी देउनु आपण वाराणसीस गेले तरी आपणासी सदरहू इनामचे मिसेली पाहिजे ह्मणउनु बयानवार मालूम केले तरी बराये मालूमाती खातीरेसी आणउनु सदरहू इनामती गोसावियानी जोसियासि दिधले सही खातीरेसी आणउनु इनामती जोसीम॥चे दुबाळा केले असे दुबाळा कीजे तालीक घेउनु असेली परतोनु दीजे

तेरीख १ रमजान

                                                                माहे रमजान

                                                                                                                     11 3

पत्रांक ३८५

श्री. १७१६


यादी होळकर वा। ऐवजाच्या वरीता गाईकवाड यांसपासून घेतल्या सु।। खमस सितैन
५५००० अंताजी नागेश का। दार पा। ढवळकें. सदरहू वरातेचें वसुलास भिकाजी पंतही पैलाडू आहेत.
२५००० गोविंदराव गाईकवाड पो सिभेर नजीक बडोदें. सदरहू ऐवजाचे वसुलास गोविंद......व मनोहर किंकर यांस....
१०००० चिंतो त्रिंबक का। दार प्रा।...सराई. वसुलास माणूस दि।। लाडू ठेविले असे.
५००० चिमाबाई गायकवाड प्रा।. कोरळे सदरहू वरात वसुलास मनोहर नाईक किंकर.
५००० केदारजी गाईकवाड का।दार प्रां अंतापूर. सदरहू वरात मा।र निल्हेचेच हवालीं रा।। कृष्णाजी नाईकांनी केली.
----------
१०००००

सदरहू वराता रा। कृष्णाजी नाईक......यांणीं हेवालीं, जिकडील तिकडे केल्या आहेत.

लेखांक १०                                                                    श्री                                                              १५६८ अधिक श्रावण                                                                                                                 
                                                                                                                                                                             तालीक

                                                                                   10

अज रख्तखाने राजश्री सीवाजी राजे दामदौलतहू बजानीब हुदेदारानि हाल व इस्तकबाल व मोकादमानि मौजे लोणी बारकर्डियाची प॥ सुपे बिदानद की सु॥ सन सबा अर्बैन अलफ दरीं विले मोरेस्वर गोसावी सेकीन मोरेस्वर हुजूर एऊन इलतिमास केली जे आपणास इनाम ब॥ फर्मान हुमायूनु व ब॥ खुर्द खत वजिरानि दर सवाद मौजेमजकुरी चावर गजशरायनी १ प्रज एसू भोगवटा व तसरुफाती चालिली आहे ए बाबे पेशजी आपण हुजूर एऊन अर्ज केला की भोगवटियाची खुर्द खते आपणापासून फितरतीमध्ये गेली आहेती साल गु॥ सन सीता कारणे मौजेमजकूर साहेबास अर्जानी जाला ह्मणुन हुदेदार ताजिया खुर्द खताचा उजूर करिताति ह्मणुन अर्ज केलियावर हुजरून दुमाले खुर्द खत सादर जाले ते मौजे मजकुरास घेऊन गेलो माहालीचे हुदेदार उजूर करिताति की खुर्द खत लिहिले आहे की भोगवटे व तसरुफाती चालिली असेली तेणेप्रमाणे दुमाले करणे यावरून भोगवटियाची खुर्द खते पाहिजेत ह्मणून उजूर करिताति तरी दरी बाब याजबदल पेशजी अर्ज केला आहे की भोगवटियाची खुर्द खते फितरतीमध्ये आपणापासून गेली आहेत ए बाबे हाली मौजेमजकूरचे मोकदमी अर्जदास्त लिहिली आहे एसियास नजर एनायत फर्माउनु हुदेदार उजूर न करति ऐसे दुमाले खुर्द खत देविले पाहिजे ह्मणून मालूम केले तरी मोरेस्वर गोसावी से॥ मोरेस्वर यास इनाम चावर सुलतानी एक प्रज एसू देखील महसूल नख्तयात व तमाम लवाजिमे व वेठीबिगारी व फर्मायसी व बेलेकटी व + + पटी व पायपोसी व मेजवानी व मोहीमपटी व खर्चपटी व तेलपटी व कानूनी व कदीम व जदीद व तूप व फसकी व सादिलवार व हकलवाजिमे देसाई व सेटे व बाजे कुलबाब कुलकानू नकदी व ऐनजीनसी दुमाले करणे व सदरहू प्रजेचे सेत हाली मोजून हदमहदूद घालून देणे व नख्त + + + + + + कुल दुमालियावरी + + + लागले ढेपेच्या हिसेबाने बसेले ते व गला कमाविसेने एत जाईल तो एणेप्रो। वाराचीवार दुमाले करणे दरहर साल ताजिया खुर्द खताचा उजून न करणे तालीक घेऊन असल पत्र दरमियाने भोगवटा व तसरुफाती + + + + + + + याचा उजूर न करणे मोर्तब सूद

रुजू सुरुनिवीस
सुरु सूद
+ + + + जमादिलाखर

पत्रांक ३८४

श्री १७१५

देऊळगांवकर जाधव.
राजश्री रावजगदेव आनंदराव जाधवराव गोसावी यांसी,
छ अखंडित-लक्ष्मी


सातारचे दीक्षितास.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री रामचंद्र दीक्षित बावा स्वामीचे सेवेसी. सेवक दौलतराव सिंदे सां दंडवत. विनंति उपार येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें.


उजनकर खोबरे.
१ मुला कमरुदिन व सलाबुदिन खु।। बाषद आज दौलतराव सिंदे सलाम. येथील खैरखुसी जाणोन तुम्ही आपली खैर-आफियत कलमी करीत जाणें दीगर.


सुरतकर थोरले मुला.
महमद ईसफ व नजमुदीन यांसीं आखंडित ह्मणोन.


खंडाराजपुरीकर हाबसी यासी.
आजम याकुतखान दाम मोहबतहू.
छ रफायत व अवलि–मर्तबत-शोकत-मजीलत-दस्तगाहा बादज शोकमशे हूद-जमीर मुजीर गरदाजीदः मीआयदके येथील खैरखुसी जाणोन मोहिनी आपली खैर-आफियेत कलमी करीत असलें पो दीगर आ आकारपन्हाकडून बील फैल मोहबतनामा येऊन यकलासाचे तरीके याचा ईतम आज दाह दोस्तीचे जागां व्हाव तें न व्होतां आमुल होऊन खत खतूत न आलें यावरून ताजूब असे हमेशा मकातीब पाठऊन दोस्ती येकजहतीदीन बदीन ज्यादा होय तें नमुतत यावें ये बाब तारीख महिना सु।।.


हाजी अबदुल वजीद यास.
हाकायेकआगामारीफ-दस्तगाहा शाहा हाजी अबदुल मजीद हीफजुला हेताला.
छ आज ज्यानीब दौलतराव सिंदे येथील खैर दीगर तुझी आपली खैरयत लिहीत जावें.


तो सुवर्णदुर्गचे सुभेदार
मोरो बापूजी यांसी आखंडित-लक्ष्मी विनंती.


सौ बाइजाबाई सावतवाडीकर यांसी तीर्थस्वरूप आपत्यें
दंडवत विनंति. सेवटीं हे विज्ञप्ति.


राजश्री रंगरावआधा वेढकर
छ अखंडित विनंति उपरी.


आजम फ्रासिस्क-आंतोन-दावियोग-काबराल-गोवर्णदोरे-कप्तान -जनराल रुस्तुमुलमुल्क सर्फराजुद्दौले मुस्तकीम जंगबहादुर बंदर गोवा दाम मोहबतहू.


छ शाहामत-अवलि-मर्तबत व हशेमत-मंजलत-मवकत-दस्तगाहायेत ज्यादा दोस्तां आजी ज्यानीब दौलतराव सिंदे सलाम आंकी येथील खैर.


श्रीगणेशायनमः
श्रीकाशीजीकेराजा वगैरेह
श्रीस्वस्ति श्री श्रीमहाराज बहादुर चैतसिंघजी जोग्य श्रीमहाराजाधिराजके दंडवत.


राजश्री बालाराभाई रामजी जोग्य कुमाउचे पाहाडचे राजाको अलकाय ( ब ).


स्वस्ति श्रीमदगणित-विद्या-विनोद-कुशल-गाडगिलोप-नामक-श्रीजनार्दन भटेषु विद्यार्थिनोपमा माधवराव सिंदे कृतानेकेशः साष्टांग-नतयः समुल्लसतु शमिह श्रीमदाशिषा तत्र संतदिहामहे उदतसुमवादिय.


स्वति श्रीश्वरचरणस्मरणपूर्वक-रूप-नारायणेत्यादि-विबुध–बिरुदावालि-विराजमान-मानोन्नत-श्रीगिरिराज-चक्र - चूडामणि-श्रीमन्महाराजाधिराज-श्रीउदोतचंद्रदेवेषु सदा स्मरविजईषु.


उदेपूर.
श्रीमन्निषिल-निगदित-नीलोमारमण-चरण-शरण–श्रीमहाराजा श्रीभीमासंव्हजी एतान श्रीमहाराजाधिराज-श्री-महाराजा अलीजाह सुबेदारजी श्री माधौराघजी सिंदे केन वाच्यं अठाका समाचार भला छे अपका सदा सदा भला चाहिजे अपरं च.


बलमगडवाले.
श्रीमहाराजाधिराज श्रीमहाराजाबाहादुर आजितसिंघ जूदेव एते.


कृष्णगढ.
सिद्धिश्रीसर्वोपमा-महाराजश्रीप्रतापसिंघजी जोग्य


बेगुवाला
सिद्धिश्रीसर्वोपमारावत श्रीसवाईमेघसिंघजी-जोग्य.
सिद्धिश्रीसर्वोपमालायकमहाराजा श्रीमौहौकसिंघजी-जोग्य.


साहपुरा
सिद्धिश्रीसर्वोपमालायक-राजाजी श्रीभीमसिंगजी जोग्य.
सिद्धिश्रीसर्वोपमालायकरावतजीश्रीभीमसिंघजी जोग्य.


राणाजीची माता.
सिद्धिश्रीबाईजीराज एवे आठाका समाचार भला छे. अपका सदा भला चाहिजे. अपरंच


सिद्धिश्रीअमजरासु-थानें श्रीराजसिंघजी- जोग्य.


जोधपूर मारवाड.
सिद्धिश्रीसर्वोपमाश्रीमहाराजाधिराजराजराजेराजेश्वरमहाराजाश्री विजैसिंघजी
जोग्य अठाका स्माचार मला छै. राजरा सदा भला चाहिजे.


सिद्धिश्रीसर्वोपमालायकठाकरी श्रीगोवर्धनसिंघजी जोग्य.


सिद्धिश्रीसर्वोपमाठाकुराराजश्री-सवाई-सिंघजी–जोग्य.


बिकानेर
सिद्धिश्रीसर्वोपमाविराजमानमाहाराजाधिराजमहाराजासिरोमणिश्रीसुरतसिंघजी जोग्य.


करकेडी.
सिद्धिश्रीमहाराजकुवाश्रीअमरसिंघजी जोग्य.


सिद्धिश्रीसर्वोपमालायकमौणोग्यानमलजी जोग्य.


सिद्धिश्रीठाकराबुधसिंघजी जोग्य.

सिद्धिश्रीसर्वोपमामंगरीश्रीकील्याणदासजी जोग्य.


जैनगर
सिद्धिश्रीसर्वोपमाश्रीमहाराजाधिराजराजराजेंद्रमहाराजाश्रीसवाईप्रतापसिंघजी जोग्य अठाका समाचार भला छे. राजका सदा भला चाहिये. अपरंच.


सिद्धिश्रीसर्वोपमाश्रीमहारानिश्रीभामि चोंडावतजी जोग्य,


सिद्धिश्रीसर्वोपमाजोग्यरावबहादूरश्रीसहजसिंगजी जोग्य.


सिद्धिश्रीसर्वोपमालायकरावचतुर्भुजजि जोग्य.


सिद्धिश्रीसर्वोपमालायकविद्यागुरुभटराजाजीश्रीजज्ञदत्तजी जोग्य.


उनियारेवाला.
सिद्धिश्रीसर्वोपमालायकरावश्रीबिनसिंघजी जोग्य.


सिद्धिश्रीसर्वोपमाराजाबोहरेषु-सालिरामजी जोग्य.


सिद्धिश्रीसर्वोपमालायकठाकुरश्रीराजसिंघजी जोग्य.


सिद्धिश्रीसर्वोपमालायकरायजिश्रीरतनलालजी जोग्य,


अलवरमाचाडी.
सिद्धिश्रीसर्वोपमालायकरावराजाजीश्रीबषताबरसिंघजी जोग्य.


दुंदुवाला.
सिद्धिश्रीराजश्रीठाकुरापाहाडसिंघजी जोग्य.


सिद्धिश्रीषवासरोडाराम जोग्य.


बुंदि.
सिद्धिश्रीसर्वोपमामाहाराजश्रीरावराजाबिसुनासिंघजी जोग्य.


सिद्धिश्रीसर्वोपमामहाराजश्रीदिपसिंघजी जोग्य,


सिद्धिश्रीसाहालछिरामजि जोग्य वा पचोलिथानसिंघजी जोग्य.


सिद्धिश्रियाभाईबषतरामजी जोग्य.


कोटा.


सिद्धिश्रीसर्वोपमामहाराजश्रीमहारावउमेदसिंघज जोग्य.


सिद्धिश्रीसर्वोपमालायकपौंडरिकजी श्रीव्यासगोपालरामजी जोग्य.


सिद्धिश्रीसर्वोपमालायकराजश्रीराजजालिमसिंघजी जोग्य.


भदावर.
राजा सा। १८४८ सावण सुदि छ ८
सिद्धिश्रीमहाराजाधिराजश्रीमहाराजामहेंद्रप्रतापसिंघबहादुरदेवजू.


वेदमूर्तराजश्रीअग्निहोत्रिभोलानाथजी जोग्य.


सिद्धिश्रीसर्वोपमापुरोहितराजश्रीलक्ष्मीनाथाजि जोग्य.


बुंधेलखंड
पौंडछो
श्रीमहाराजाधिराज श्रीमहाराजाश्रीराजाविक्रममाजीतजूदेव,
दतिया
श्रीमहाराजाधिराजश्रीमहाराजाश्रीरावराजासभजीतबहादुरजूदेव.


सिमथरवाले.
सिद्धिश्रीमहाराजापाहाडसिंघबहादुर जोग्य,


चंदेरी.
सिद्धिश्रीसर्वोपमामहाराजश्रीराजारामचंद्रजूदेव.


पुरवणी दतिया.
श्रीमहाराजकौमारश्रीकुवरबहादुर फत्तेसिंघजूदेव.


डंगहाई
परणेवाला
श्रीमहाराजाधिराजश्रीमहाराजाश्रीढोकलसिंघजूदेव.


श्रीमहाराजकोमारश्रीदिवानमुसाहेबकेसरसिंघज.


सिद्धिश्रीहजूरिगजासिंघजू.
श्रीवगसिहरिकृष्णदासजूश्रीमहाराजकौमारश्रीनोनेअर्जुनसिंघजूदेव एते.


पुमानासिंघकेबेटावगैरे.


चरखारि


श्रीमहाराजाधिराज श्रीमहाराजाश्रीराजाबिजेबाहादुरजूदव,


श्रीमहाराजकौमारश्रीकुवरबाहादुरदलगंजनजूदेव.


श्रीअमलसिंघकुमालुम होय.


परवानोश्रीलालामानिकचंदजोगु.


श्रीमहाराजाधिराजश्रीमहाराजा-श्रीसरनेतसिंघजूदेव.


श्रीसाम्राटवाजपेईरमापतिजू तथा पं श्रीसाम्राटवाजपेईकीरतसिंघजू.


गुमानसिंघ.

बांदेवाला

श्रीमहाराजाधिराजश्रीमहाराजाश्रीराजासवाईबषतसिंघजूदेव.

गजासंघ
श्रीमहाराजाधिराजश्रीमहाराजाश्रीराजागजसिंघजूदेव,


सोपर


सिद्धिश्रीसर्वोपमालायकराजाश्रीराघिकादासजी जोग्य,
गढामडल,


श्रीराजाहारसिंघजूदेव,
षातोली.


सिद्धीश्रीषातोलिसुस्थाने जोरावरसिंघजी जोग्य.


सिद्धिश्रीसर्वोपमाठाकराश्री भोपतसिंघजूदेव.


सिद्धिश्रीसर्वोपमालायकठाकुरश्रीजोरावरसिंघजी जोग्य.


करोली
सिद्धिश्रीसर्वोपमामहाराजश्रीराजामानिकपालजी जोग्य,


वरकडे साधारण राजे यांस लिहिणें तर सिद्धिश्रीअमुकसुथाने कराव अथवा राजा अथवा ठाकुर याची चौकसी करून लिहित जावें.


नाथद्वारे जे गोसावि कागद सुडाचे लि।।


श्रीमद्वल्लभकुलभूषणेषुहरिभक्तपरायणेषु श्रीगोस्वामी श्रीगिरधारिजीमहाराज एतेश्री दंडवत बंचे अपके.
काकरोलीवाले गोसावी कागद बारीक.


स्वस्तिश्रीवृजभूषणजिगोस्वामि महाराज एतेश्री दंडवत आपके.
गावगन्नाचे जमिदार.


श्रीमंत राजश्री महाराजाधिराज आलीजाहा बाहादुर सुभेदारजिश्री दौलह
रावजि सिंदे इहांके सरकारें से मौजे.


करोलिवाले कागद बारीक
सिद्धिश्रीसर्वोपमालायकराजाश्रीमाणिकपालजी जोग्य.


सिवदास उदेपूरचे कारभारी.
सिद्धिश्रीसर्वोपमासासिवदासजी.

पत्रांक ३८४

श्री १७१५

आजम मेस्तर कोरनेल गाडर इस्कोयर दाम-मोहबतहू
छ मकान-मुखलिसान-दस्तगाहाये आतीजादज्यादा-दोस्ता दौलतराव सिंदे बादज-षौक आंकी येथील खैरखुसी जाणून आपली खैरखुसी कलमी करीत असले पाहिजे. दीगर.


गोवेकर प्रधान नवा आला आहे तो.
आजम जू-नेकेतान-पाचकतवार-शुक्रतार-दोइस्ताद खुषवख्त-बाषद मोहिबान-मोखलिसान-
छ दस्तगाहाये आजि दौलतराव सिंदे सलाम येथील खैर–खुसी जाणोन तुह्मी आपली खैर–खुसी कलमी करीत जावी दिगर.


आजम नवाब मोहिदीनखां नजमुदौले बाहादूर दिलावरजंग दाम मोहबतहू.
छ शाहामत-आवली-पन्हा-मर्तबात व सदामत व मंजीलत-मवाकत-दस्तगाहाये आंतीजाद-दोस्तां आजी ज्यानीब दौलतराव सिंदे सलाम येथील खैरखुसी जाणून आपली खैरखुसी कलमी करीत जावी दीगर.


गोवेकर राजा गोवर्णदोर.
आजम, फ्रासिस्क-आंतोन-दावियोग-काबराल–तेनेत-जनराल–गोवर्णदोर बंदर गोवा दाममोहबतहू.
छ शाहामत-आवली-मर्तवात व हशमत मंजिलत-मवाकत-दस्तगाहाये तज्यादा-दोस्तां आजी ज्यानीबा दौलतराव सिंदे सलाम दरबात आज पानम आंकी येथील खैरखुसी जाणोन आपली खैरखुसी कलमी करीत जावी दीगर.


महमदसाहेबखान टाके दाम-मोहबतहू
छ आज-दिस येकलास दौलतराव सिंदे सलाम आंकी येथील खैरखुसी जाणून आपली खैरखुसी कलमी करीत जाणें.


सुकेलदुखमान सयादतनकावेखान दान शेराफत सयेद शाहा निजामुदीन आहामद ज्यादा कदरहू.
छ आजदिल-येकलास दौलतराव सिंदे सलाम आंकी येथील खैरखुसी जाणून आपली खैरखुसी कलमी करीत जाणें.


शाहासाहेब आशफाम मजहरदाम मोहबतहू
छ आज दिल येकलास सलाम आंकी येथील खैरखुसी जाणून आपली आकीयेत कलमी करीत असावी दीगर.


गोवकर याचा कारभारी.
आजम सेखास्तियाव जुनेफेररवबरोकसकृतारदोईस्तोपंदु ।। बाषद.
छ मोहबत-दस्तगाहा आजी दौलतराव सिंदे सलाम आंकी येथील खैरखुसी जाणोन आपली खैर–आफीयेत हामेशा कलमी करीत जाणें दीगर.


फकीराचा माना
शाहादत पन्हा सयेद इंदरुसदाममोहबतहू
छ आजी दौलतराव सिंदे सलाम आंकीं येथील खैरखुसी जाणोन आपली खैर–आफीयेत कलम करीत जाणें दीगर.


काजी
शेरीयेत पन्हा                  दाममेहबतहू.
छ आजी दौलतराव     सिंदे सलाम सु।।.


नवाब आजम टिपू सुलतान-बाहादूर-सलमहूकताला.
साहेब-मेहर्बान-करम-फर्माये-मोकलिसान बादज-चौक-मुलाकात
मसरत-आमातमषहूदजमीरइतीहाददीजीरबाद येथील खैरखुसी जाणून आपली शादमानी कलमी करीत असलें पो दीगर.


गंगथडीचे कमाविसदार, राजश्री नारायणराव.
राजश्री नारायेणराव नागेश व बापूजी रघुनाथ का।दार मा। हाय पा। गंगथडी गोसावी.
छ दंडवत सु।।


सवस्थान विशाळगड.
राजश्री आनंदराव प्रतिनिधी गोसावी यांसि छ सकलगुणा


कडपेवाले पठाण
शाहामत व अली मर्तबात आलफखान बाहादूरसलामहूकताला.
छ आजी दिलये कलास दौलतराव सिंदे सलाम आंकी येथील खैरखुसी जाणोन आपली खैरयत कलमी करीत जावी. दीगर.


चंदीचंदावरचे राजे.
श्रीमंत महाराज राजश्री अमरसिंहजी–साहेबाचे शेवेसी.
विनंति विशेष दौलतराव सिंदे कृतानेक विज्ञापना. ता। छ पो. साहेबाचे कृपावलोकनें-करून वर्तमान यथास्थित असे विशेष.


इसनखान बाबा.
शाहामत व आवली-मर्तबात-भाई हसनखानदाम-मोहबतहू.
छ आजी ज्यानीब दौलतराव सिंदे बाद सलाम बजेबाद आंकी येथील खैरखुसी जाणून आपली खैरखुसी कलमी करीत जाणें दीगर.

पत्रांक ३८४

श्री १७१५

दाभाडे तळेगांवकर.
यशवंतराव दाभाडे सकलगुणा गंगाजळनिर्मळ मातुश्री लक्ष्मीबाई दाभाडे यास.
स्नेहपूर्वक विनंति.

देहूकर.
हरिभक्तपरायेण राजश्री खंडोबा गोसावी संस्थान देहू यांसी.
स्नेहपूर्वक दवलतराव सिंदे दंडवत विनंत उपरी.

रास्ते.
राजश्री आनंदरावजी रास्ते गो।।. छ सकलगुणा दंडवत विनंति उपरी लिहित जावें.

श्रीमंतांचे हातची चिटीचें उत्तर.
सेवेसी विनंति सेवक दौलतराव सिंदे कृतानेक विज्ञापना ता। छ पर्यंत स्वामीच्या कृपावलोकनें यथास्थित असे. विशेष मा। पत्रांतील जमेस धरून उधार लिहावा. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

श्रीरामदासवावा गुरूजी यांस पत्र.
श्री सचिदानंद परब्रम्हमूर्ति श्रीबावाजीचरणसेवेसी दासानुदास चरणराज दौलतराव सिंदे चरणीं मस्तक ठेऊन सां दंडवत विज्ञापना ता। छ पर्यत श्रीकृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

सुमंत
गंगाजलनिर्मळ मातुश्री गोपिकाबाई यांस स्नेहपूर्वक दंडवत विनंति.

सुरापूरचे बेरडास.
राजश्री व्यंकट आपा नाईक बहिरी महादर, संस्थान सुरापूर गोसावी यांसी:-

छ अखंडित-लक्ष्मी विनंति उपरी.

मे।। हिरु व बाढण पेंढारी यास सु।।

बीडकर.
१ सखाराम कृष्ण पासटे यांस अखंडित सु।। सन.
१ रामाजी अनंत व सखोरुद्र गो। विनंति.

श्री
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी
विनंति सेवक दौलतराव सिंदे, पुढें हातचिटी प्रें।।
.
श्रीमंत राजश्री पंतप्रतिनिधि स्वामीचे सेवेसीः-

सेवक दौलतराव सिंदे कृतानेक विज्ञापना तार छ पावेतों यथा.
स्थित असे विशेष.

गुरु ली बीडकर.

श्री श्री श्री परब्रह्ममूर्ति श्री श्री श्री हबीबासाहेबाचे चरण-कमल सेवेसी. दासानुदास दौलतराव सिंदे कृतानेक सां।। दंडवत विज्ञापना छ पावेतों श्री-कृपावलोकनें करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे.

खा। पत्र कादर साहेबाचे नावें.

सालीक मसालीक हकीकत जाहीज-मजाहीज मारफत श्रीकादरसाहेब ज्यात-कदरहू
आर्जदास्त बंदगी विनंति येथील कुशल,

सकल-गुणाचे
१ चंद्रोजी भोसले सेनासाहेब मुभा                      १ राजश्री गोविंदराव गाइकवाड
गो। लेखन करीत असावें.                                सेना-खासखेल समसेर बाहादूर गो।.
१ मानाजी आंगरे कुलाबकर वजारत                  १ राजे खेमसांवत भोसले बाहादर
-माब-सरखेल गो।                                          सरदेसाई प्रांत कुडाळ वगैरे महाला निहाय.
१ नीलकंठराव पुरंदरे.
यांत भोसले नागपुरवाले यांस मात्र लेखन करीत असावें, आण वरकडांसे लिहीत जावें.