Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ५१ ] श्री. १६९९.
राजश्री भगवंतराऊ रामचंद्र सरदेसाई ता। साळसी गोसावी यांसीः-
छ अखंडितलक्ष्मी अलंकृतराजमान्य सेवक परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी नमस्कार सु।। तिसा तिसैन व अलफ. मौजे चिदर ता। मजकूर येथें हत्तीतोड व खोदमिराबाग कारकीर्द आदलशाई येहीं नवजिकीर बाग लावणी केली आहे ते अजिवरी खाल्ली. सा सालें दिवाणांत कमावीस चालत होती. सांप्रत राजश्री रामचंद्र पंडित अमात्य येहीं मौजे मजकूरचे कुळकर्णी राम शेणवी व गुण शेणवी याचे स्वाधीन केले होते. सन सलासापासून सालमजकुरातागाईत त्याणीं कमाविस करून उपभोग केला. याकरितां त्यांचे बापभाऊ उभे राहून कथळा कराया लागले. पुढें कुळकर्णी यांकडे बाग असिल्यानें कथळा वारत नाहीं व अवघे वतनदार हुजूर विशाळगडचे मुकामी आले होते त्यांचे विद्यमानें मनास आणितां सदरहू दोन्ही भाग त्याकडून दूर करावे असा निर्वाह जाहला त्यावरून राम शेणवी व गुण शेणवी कुळकर्णी चिदर यांकडून दोन्ही बाग दूर करून हत्तीतोड व खोदमिरा दोन्ही ठिकाणीं बागाईत याचे माथा शेरणी दाभोळी लारी १००० एक हजार करार करून तुह्मास दिले असे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४१९
॥ श्री ।। १७१८ मार्गशीर्ष वद्य १३
मसुदा सरकारचे ताकीद द्यावयाचे डिल्लीचे सुभादार येशवंतराव सिंधे यास ताकीद लिहावेयाचेः–काशीरामराय, कमळनयन मुनसी नि।। सरकार याचे पुत्र, कासीराम यास डिल्लीचे सुभाचे मुनिसीगिरी मोकरार जाहला आहे. तेथील लिहिणें-पुसणें वगैरे जाबसाल त्याजकडून घेत नाहीं, म्हणून कळलें, आणखी दुसरे चुनीलालकडून लिहिविता म्हणून समजलें. जें लिहिणें, फारसीचें लिहिणें काम काय असेल तरी सरकारचे मुनसीशिवाय दुसराकडून न घेणें. तुह्माकडील चुनीलाल यास बरतर्फ करणें. तो पहिला गुमास्ता त्या जवळ होता. हाली मुनसीसहि चुनीलालासहि बनत नाहीं, यास्तव तुह्मी त्यास बरतर्फ करणें. फारसीचें लिहिणेंचें जे कारभार असेल तरी कासीराम मुनसीचे हातीं घेत जाणें. कासीराम मुनसीस दरमहा रुपये ५० पन्नास देत जाणें, हे रोजमराबाबत रुपये पाछाई सुभेत खर्च मुजरा आहे. दर शेकडे रुपया .।।. आठ आणेप्रमाणें पादशाई सुभेचे मुनसीस तहरीर पादशाई महलाची आमदानीवर मोकरार आहे. हरयेक अमील यास ताकीद करून, हे रुपये कासीरामास देवित जाणें. या गोष्टीचे तकरार न होणें. याजविषई फिरियाद सरकारांत येऊं न देणें. आणि हरसहाय ह्मण्णार कमलनयन मुनसीचे नातू आहे, त्यास डिल्लीचे तैनांत महंमदीखान पलटण आहे त्या पलटणाचे फारसीचे सिरस्तदारी सांगितले आहे. तरी पलटणचे शिरस्तेचें कामकाज हरसहाय याजदून घेणें. यास रोजमरा मागला सिरस्तदारीचा यास देणें. कदीम सिरस्तदारास बरतर्फ करणें. याजविषई खानमजकुरास ताकीद करणें, दुसरेचे हातें एकंदर काम पारसीचें न घेणे. कासीरामाचा राजीनामा पाठविला आहे. फिरून बोभाट न ये तें करणें.
सारांश पाहून दोन पत्रें लिहावीं. छ. २७ जमादिलखर, सबा तिसैन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४१८
श्री. १७१८ मार्गषीर्ष वद्य ६
श्रीमंत राजेश्री बाबासाहेब साहेबांचे शेवेसीः-
आज्ञाधारक यशवंतराव व अमृतराव सिंदे कृतानेक रामराम विज्ञापना तागाईत छ २० जमादिलाखर मुकाम दिल्ली साहेबांचे कृपावलोकनें करून वर्तमान यथास्थित असे. विशेष. पेशजी आज्ञापत्र पाठविलें त्यांत आज्ञा कीं श्रीमंत राजश्री बाजीराव साहेब पंत प्रधान यांच्या व आपल्या भेटी जाहल्याचें वर्तमान लिहोन अर्जी हरजत पन्हा यासी पाठविली आहे. त्यास, तुम्ही हे अर्जी हुजूर गुजरून, याचे जबाब जलदी पाठऊन देणें; म्हणोन त्यावरून अर्जी व आज्ञापत्रें येथें येऊन पोचतांच, आशेप्रमाणें अर्जी हुजूर गुजरून प्रत्योतराचे शुक्याबदल अर्जी केली. तेव्हां शुके लिहावयाचा हुकूम होऊन आज शुके लिहिले. तयार करून सेवेसी पाठविले आहेत. साहेबाचे नांवें एक शुका, व श्रीमंत राजश्री बाजीरावसाहेब पंतप्रधान यांचे नावें येक शुका, व श्रीमंत राजश्री नाना फडणीस यांचे नांवे येक, ऐसें तीन शुके हुजूरून लिहिले ते हालीं डाके समागमें रवाना करून दिल्हे आहेत. प्रविष्ट जाहल्याचें प्रत्योत्तर द्यावयासी लेखन आज्ञा जाहली पाहिजे. यानंतर इकडील वर्तमान घेण्याचें पुण्यप्रतापेंकरून सर्वहि यथास्थित आहे. आम्ही अहिर्णिसीं हजरतपन्हाचे खिजमतींत हाजर राहोन, मुरशदजादे आदिकरून सर्वांचें तबीयतींत किंचितहि नाखुष न होऊं पावे अशी चौकशी क्षणक्षणा करून, सरकारसेवेच्या लक्षें हरयेकविशीं कामकाजाचा बंदोबस्त राखोन आहों. चाकरीची बूझ करून सांभाळ करणार घणी समर्थ आहेत. येथील किल्यांत किलेदारीचा जिमा गुदस्तापासून रा। मानसिंग गौतम यांचा होता. सांप्रतकाळीं मा।र्निल्हेचे चित्त सरकारचाकरीचे ठायीं कंपेश दिलगीर, ऐसे राजश्री जगोबाबापू यांस समजल्यामुळें, किलेदारीच्या सनदा आमचे नांवें करून पाठविल्या. त्या कालच आम्हांकडे येऊन पोचल्या. एका दो रोजांत किलेदारीची दखल घेऊन, किल्यांतील बंदोबस्त चौक्या पाहारे व दिली दर्वाजे वगैरेचा बदस्तुरी चालत आहे, त्या अन्वयें करून मागाहून सेवेसी विनंतिपत्र लिहोन पाठवितों. बहुत काय लिहूं ? कृपा निरंतर केली पाहिजे. हे विज्ञाप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ५० ] ११ ऑक्टोबर १६९८.
अमीलानी हाल व इस्तकहाल व देसमुखानी व देसपाड्यानी ताहाय पा। कोल्हापूर बिदानद सुहुर सन तिसा तिसैन अलफ, सन ११०८ फसली दरीविला, यादव शिवदेऊ नाडगौडा पा। मा।र हुजूर येऊन इलतमेस केला जे - आपणास पा। मजकुरीं जुजबी इनाम आहे. त्याने आपला अवकाती चालत नाहीं साहेबीं मेहेरबान होऊन परगणे मजकुरीं गांवगन्ना इनाम म-हामत केलिया पेस्तरसालाची लावणी करून प्रगणें आबाद करून, ह्मणोन अर्ज केला. बराय अर्ज खातरेस आणून पा। मा। रीं तुह्मांस तर्फहायपैकी अज-हाम-हामत इनाम जमीन म-हागत केली असे. छ २७ रबिलाखर
मोर्तब सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४१७
श्रीगजानन प्रा। १७१८ मार्गशीर्ष शुद्ध ७
पे।। सामरचे बंदोबस्ताविषई सरकारचीं पत्रें.
१ बुंदी व कोठेवाले यांसी कीं, बणजारा बेपारी तुमचे प्रांतांतून मिठाचे भरतीस जातात. सां।. पे।। सामर येथील कारकून तेथें राहून बेपारीयांची पेट करून सामरेस भरतीस पाठवावे, आणि सागरेखेरीज नावा पंचभद्राकडे मिठाचे भरती करून येतात त्यांजपासून फौजदारीचा हासील लागतो तो घेतात. ऐसें चालत आलें असतां, सालमजकुरी दोबस्त बणजारा मारवाडवाले यांच्या बंदरास पाठविले, सामरची फौजदारी घेऊं दिल्ही नाहीं, ह्मणोन विदित जालें. ऐसियासी, ये गोष्टीनें सरकार-नुकसान ध्यानास न आणितां, कादारास न मानून बखेडा करतां, तरी, इतःपर तुह्मीं बेपारी सामरेकडे भरतीस जाऊ न दिल्यानें पा। मारचे जमेंत कसर होऊन, त्याचा जाब तुह्मांस करणें लागेल, ऐसें समजोन सरकार अमलापासून वहिवाट चालत आल्याप्रमाणें चालवणें. फिरोन बोभाट येऊं न देणें.
१ लालाजीबावास पत्र ऐसें कीं, बुंदीकोठेवरून बणजारा बेपारी मिठाचे भरतीस जातात. त्यांस सामरेकडे जाऊं न देतां, मारवाडवाले याच्या बंदराकडे पाठविले. सामरेखेरीज भरती येते त्याजपासून फौजदारीचा हासील पो मा।रचा कारकून माणसें संस्थानमा।रीं असतां त्यास घेऊं न दिल्हा. रांगड्याकडून सरकार-अमलासी दिकत जाली. तरी तुह्मी त्यांस ताकीद करून सुरळित चालवावा, ऐसें न होतां, तुह्मांकडीलच कारकून रांगड्याचे तरफेचें बोलणें बोलतात. ऐसियासी, बेपारी कोणी सामरेकडे न पाठविला आणि फौजदारीचे हासीलांत दिकत केलीयानें पो मा।रची जमा कैसी बसते, हें तुह्मीं ध्यानास न आणल्यानें सरकार-अमलांत सालमा।रीं बखेडा जाला, ह्मणोन विदित जालें. त्यास, अतःपर फौजदारी वगैरे सरकारअमलापासून चालत आल्याप्रों हाली न चालल्यास सरकारनुकसानीचा जाब, ऐसें समजोन फौजदारी हासीलाचे वगैरे सुरळित चाले तें करावें. फिरोन बोभाट न ये तें करणें.
* सदरहूचा सारांश पाहून पत्र द्यावें. छ ६ जमादिलाखर सबा तिसैन, मेघशामराव जमे बक्षी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४१६
श्रीगजानन प्रा।. १७१८ मार्गशीर्ष शुद्ध ७
कृष्णगडवाले यांसी पत्र कीं, पो सामर येथील कमाविसदार याजकडील कारकून माणसें तुमचे गावीं राहून, सामरेखेरीज मारवांडवाल्यांची नाव पंचभद्रा वगैरे मिठाचीं बंदरें आहेत. तेथून मिठाची भरती करून, बेपारी तुमचे प्रांतांतून जातो. त्याजपासून फौजदारीचा हासील घेतात. दरम्यान तुह्माकडोन दिकत होते. व तुह्माकडील वकीलांनीं गैरवाका समजाऊन फौजदारी बाब पदरचे का।दारास नेली. ऐसियासि, सरकार-अमलापासून चालत आलें, त्यांत दिकत केल्यास ठीक नाहीं. सरकारनुकसानीचा जाब तुह्मांस करणें लागेल. तरी फौजदारीचा सरकार-अंमल सुरळीत चालेल, फिरोन बोभाट न ये, तें करणें ह्मणोन, व सदरहू-अन्वयें यशवंतराव सिवाजी, यासी, अंभेरीस पत्र.
* सदरहूअन्वयें पत्र निक्षुन द्यावें. छ ६ जमादिलाखर सबा तिसैन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४१४
श्रीरामजी. १७१८ कार्तिक.
श्रीमद्वलभकुलभूषणेषु हरीभक्तिपरायणेषु श्रीगोस्वामी श्रीगिरिधारीजी महाराज एते श्रीमहाराजाधिराज श्रीमाहाराजा आलीजाह सुवेदारजी श्रीदौलतराव सिंदेके दंडवत. वांच्य इहांके स्मांचार श्री-जीके कुपासु भले हैं. आपके सदा भले चाहिजै. अपरंच पत्र आपकों आपो. स्माचार वांच्या. आपने श्रीजीका प्रसाद वा प्रसादीवस्त्र उपाध्याय प्रद्युम्नजीके साथ पठवाया सो पोहच्यां. और सेवासंमंधी उपाध्याय–मुसारनिल्हेके कहेमाफक ईहासों ताकीदपत्र उगैरेह बंदोबस्त करवाय दीया हैं. संस्थानसो कोईका षलस न होगा. पत्र स्माचार हमेसा लीषत रहेंगे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७ १५८९
सु॥ १०७७
जाबीता नागवणा वतनाच्या रामाजी
बावाजी व बाबूराऊ यानी दिधल्या
आणि वाद सागाने वतन राखिलें
खर्च वाद पंताजी बोकील
रुपये | |
३०० | औरंगाबादेस गेले तेव्हा सांगाते खर्चास माहादावा नाईक सराफ याचे कर्ज पचोत्र्याच्या व्याजाचे घेतले आरभी पोटखर्चास वगैरे मुतसद्याच्या भेटीस व भेट दिवाण पातशाही व साहेब + + या कारणे घेतले |
१०० | शाहारास गेलियावरते परवाना मोकूफ करावयास खर्च |
१०० | इलतिमास लिहिणारास |
४०० |
दिवाणाचा परवाना घेतला सनदा दाखवून अबाजी खोटा केला परवाना घेतला त्यास खर्च मागती शाहाअलमास ++ पोहचाऊन वाद्याने हुकूम दिवाणास आणिला की मुजरसीने इनसाफ करणे त्यास खोजे मीर अमीन कचेरी पातशाही त्यावर दिवाणाने इनसाफ केला त्यावर |
५०० | खोजे मीर याजदेखील मुतसदी खर्च याने इनसाफ करून अ + + पोहोचाविला की अबाजी खोटा त्यावर वाद्यानी सोखा करून हुकूम आणिला की परगण्याची शाहिदी पाहिजे चाकर निळो कृष्ण अमीन व सरदारबेग वाकेनवीस व मानसिग करोडी यास हुकूम आणिला व सजावळ तवकलकी परगणा जमा करून मनास आणुन लेहोन पाठविले त्यावर |
५०० | ठाणे पुणे एथे अमीनास व देसकास व सजावल सागाते त्यास व आणीक साहित्यास खर्च त्याचा महजर हजूर नेला वाकनवीसास गुजराणिला |
७०० | कासीराम वोकनवीस यास पूजा कासीरामाने दिवाणाचे मारुफातीने अर्ज केला महजर सही केला |
१०० | दिवाणाचे दसखत मोकरर जाले की अर्ज मे॥ करणे त्यास खर्च |
१०० | खास दसखत करविले की अर्ज मोकरर पोहचला |
२०० | दिवाणाचे दसखत करविले की महजरावरून फर्मान तयार करविणे |
२०० | वाकेनवीसाने यादीदास्त सनदेची ठराऊन दिधली त्यास |
३०० | दिवाणाचे दसखत यादीवार करविले की पाहिली आणि स्वाद केला |
२०० | फर्माननवीस त्याने फर्मान लिहिला त्यास |
१०० | जिमीन लिहिणारास |
२०० | मवाजनेनवीस त्याचे दफ्तरी नकल विल्हे लाविली त्यास पूजा |
२०० | शाहेनवीस हजूर त्याजकडून हजूरचा शाहा दाखल करऊन नकल विल्हे लाविली त्यास पूजा |
२०० | दिवाणी दफ्तरी नकल विल्हे लाविली त्यास पूजा |
(४००) | दफ्तर इस्तिफकार तेथे सनद सही केली |
----------- | |
४७०० | |
२७०० | खास मोहर करविली त्यास |
२५०० ऐन नजामदारान | |
२०० कलमदारान | |
------------ | |
७४०० | |
२६६५ | दिवाणी परवाना केला त्यास खर्च |
२००० नजर मकरमतखान दिवाण | |
२०० दफ्तर खालसा नकल विल्हे लाविली | |
२०० दफ्तर मवाजम नकल विल्हे लाऊन निशानी केली | |
----------- | |
२४०० | |
२६५ महजर दिवाणी कचेरीचा तमाम मुतसदियाचे मोहोरानसी व शाहिदीनसी केला त्यास खर्च | |
------------ | |
२६६५ | |
------------ | |
१००६५ | |
१०५० | हजरत जिलसुभानी तुळापुरी होते कुल परगणियास जमा करून कौल दिधला तेव्हा माहादाजी एमाजी बोकील यास वाद सागोन खोटे केले त्यास खर्च रु॥ २००० पैकी |
यादी बा। कर्जदार खर्च वाद पताजी बोकील पाठराखा अबाजी सिधेश्वर तुराफा त्यासि औरगाबादेस रामाजी बावाजी यानी वाद सागोन वाद्या खोटा केला त्यास कर्ज घेतले कर्ज बिता। रामाजीपती घेऊन सरकारचे तगादे वारिले रुपये | |
३०० | बसीधर रजपूत याजपासून घेतले |
१४०० | जैतसिंग बिरादर हरिराम रजपूत पवार साकीन निंबे सरकार लखनौ याजपासून सन हजार १०८५ मधे कर्ज घेऊन तगादा वारिला व्याज पचोत्रा मुदल |
३०० | सुखदेव याजपासून मु॥ औरंगाबाद |
१९५० | विश्वभर शाडिल्या याजपासून घेतल्या मोहरा १५० दर १३ प्रो। व्याज पचोत्रा प्रो। |
३४२० | श्रीरंग त्रिवाडी नगरकर मु॥ औरगाबाद याजपासून कर्ज घेतले सु॥ सन १०७९ मधे कर्ज घेऊन दिवाणचा तगादा वारिला मुदल |
११०० | मल्हारराऊ रईस याजपासून कर्ज घेतले श्रीशके १६०४ मधे आणि औरगाबादेस सरकारचा तगादा वारिला मुदल |
१५० | उमदखान सन १०९६ मधे |
११०१ | मल्हार माहादेऊ + + + + व माहादाजी नाईक याजपासून कर्ज घेतले सन १० + + मधे मुदल ११०१ व्याज पचोत्रा |
------------ | |
९७२१ | |
४४ | विश्वनाथभट ढेरे होन १३ |
३०० | कर्ज माहादावा नाईक सरापूर क॥ सुपे |
------------ | |
१००६५ | |
यादी कर्ज ब॥ बाद रुपये अमल शास्ताखान | |
१४०० | असकर्ण परदेसी याजपासून घेऊन दिधले |
११२२ | आणीक कर्जदार वाद्या विष्णुभट बिन पद्मनाभभट बोकील शके १६९९ कर्ज घेऊन तगादा वारिला |
------------- | |
२५२२ |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४१३
श्री १७१८ कार्तिक वद्य १४
यादी मसुदे. पत्रें:--
जगो बापू पत्र जे. मौजे इच्छापुरी सदरहूअन्वयें एकच पत्रें दोन
व च्यटशहापुरा आमलेप्रमाणें जगोबाबापूस व यशवंतराव यांसि
माडोटी जागीर तुयुल-नबाब अजीमउल जेः मौजे सिंखेडा प्रा। ज्यलालाबाद
-निसाबेगम-पातशाजादी यांजकडे जागीर अलतमगा-मीर-मेहेर-अल्ली
चालत आहे. त्यास, हालीं तेथें व मीर-करमअल्ली यांजकडे पेशजी
कमालखान याचे पुत्रांनीं हर दो गांवचा पासून शाहा–निजामद्दीन याचे पर्यंत
अमल बसनद करितात. येविसी चालत आला. त्यास उभयतांस पत्र
जगोबा बापूकडून ताकीद पुस्तपना जे, पेशजी गांव चालत आल्याप्रमाणें
होऊन पेशजी चालत आल्याप्रमाणें मशारनिलेकडे सुदामत चालों देणें,
बेगम यांजकडे गांव चालेत, ह्मणून पत्रें.
सुरळित होय, तें करावें. फिरोन वोभाट * वाजवी असतां, जप्त करावयास
येऊं न देणें. अगत्यवाद धरून कारण काय ? तरी, सुदामतप्रमाणें
कार्य करीत जाणें. ह्मणून पत्र १. मशारनिलेकडे देवणें. म्हणेन पत्रें
* सनदेशिवाय कमालखान याणें गांव द्यावीं. छ २७ जमादिलाखर.
दाबावयास कारण काय ? तरी, सुदा
मतप्रमाणें बेगमेकडे चालूं करणें व
दोन पत्रें देवणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
यासी, ताब्राचे भविष्य त्याच्या महजबे शास्त्रप्रमाण की - दिल्लीस मागतीं हिंदू राजे छत्र धरणार गेरासे गेरा सन येतां दिल्ली हातीची जाईल त्याप्रमाणे वर्षे ४ चारी व चालते वर्ष एकूण रमारमीं पाच वर्षे उरलीं आहेत व ईश्वर सवत्सरीं दिल्लीचा राजा यासीं परम पीडा होईल. औरगशाहाचा पुत्र हल्ली दिल्लीस आहे तो रजपुतणीचे पोटीचा, त्यास हिंदूचा अभिमान असे, त्या फिसातीनें भाऊ भाऊ झगडोन हिंदू दिल्लीस जातील, प्रयागी ३ वर्षे छावणी करतील, फिरोज पठाण व मोगल जमाव करून दिल्लीहून हिंदूस काढितील पुढे नर्मदेची सरद पडेल या वर्षापासून भीमा दक्षण प्रांत सोड पडेल भीमा उत्तर प्रांत तहद प्रयाग २४ ।। साडेचोवीस वर्षे राजीक घाटेल, हें भविष्य असें यात कलिराजा चालतो युगाची सख्या आहे. घडेल तें प्रमाण परतु भल्याचे सदरहू भविष्य आहे.
याची तालीक चित्रमानु संवत्सरी श्रावणमासी शुक्लपक्षी तृतीया गुरुवासरी लिहिली असे. शके १६२४ दस्तूर राजश्री राघो व्यंकटेश दफ्तरदार, दि ।। मजमू, कुलकर्णी, का। भोर, तर्फ रोहिडखोरे, सुभा मावळ सु।। सलास मया अलफ, छ २९ सफर.
ताजाकलम-
औरंगशा पादशाही करीत असतां, सुलतान तारा औरगशाहाचा लेक छ
शके १६२८, व्ययनाम सवत्सरे, माघ १ जिल्हेज सन सबा फाल्गुन शुद्ध द्वितीया
बहुल अमावास्या, छ २८, ( अठ्ठावीस रविवासरीं पादशाही करूं लागला
असून सत्तावीस केलेला दिसत आहे तेव्हा
खरे कोणते ते समजत नाहीं ) जिल्काद
सन सबामध्ये, दोन प्रहरा मृत्यु पावले.
शाहा अलम दिल्ली प्रांती होता त्यावरी
अजमतारा चालोन गेला त्याचे याचें झूझ
चंबल नदीजवळी झाले. छ
ते भांडणी अजमतारा रणास पुत्र
नातूसहवर्तमान येऊन मृत्यु पावले हालीं
शाहाअलम तक्त कबज करून पादशाही
करुं लागला शके १६२९ सर्वजित्
सवत्सरे.