पत्रांक ३८३
श्री १७१५ मार्गशीर्ष शुद्ध १४
वेदशास्त्रसंपन्न राजश्री नारायण दीक्षित व यज्ञेश्वरदीक्षित स्वामीचे शेवेसीः-
विद्यार्थी माधवराव नारायण प्रधान नमस्कार. विनंति. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. वेदशास्त्रसंपन्न सदाशिव दीक्षित वाजपेययाजी यांचा काल जाहल्यापूर्वीचे त्यांचे पत्र आलें, त्यांत आमचा माहाप्रयाण आहे असें लेहून वगैरे मजकूर लिहिला. नंतर दीक्षित यांस देवाज्ञा जाहाल्याचें वर्तमान कळलें. ऐशास, दीक्षित यांस आपलें माहाप्रयाणच आहे असें त्यांस समजोन त्यार्थी लिहिलें, हें परम आश्चर्य वाटलें. व त्यांचा काल जाहला, हे गोष्ट वाईट जाली. ईश्वरीछा प्रमाण. यास विवेकावांचून दुसरा उपाये नाहीं. याजकरितां विवेक करून चित्ताचे शांतवन करावें. रा। छ १२ जमादिलोवल, सु।। अर्बा तिसैन मया व अलफ. *बहुत काय लिहिणे ? हे विनंति,