लेखांक ९ १५६१ ज्येष्ठानंतर
तालीक
अज रख्तखाने राजश्री शाहाजी राजे दामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि कर्याति बारामती बिदानद सु॥ अर्बैन अलफ दरवज बदल इनाम धर्मोजी काटे देसमुख कर्याती मजकूर जमीन चावर ४ च्यारी बित॥
दर सवाद कसबे बारामती चावर दोनी दर सवाद मौजे मलेद चावर एक
२ १
दर सवाद मौजे रुई चावर एक लग
१ ०
देखील नख्तबाबा महसूलबाब व कुलकानू अजरामर्हामती आले असे दुमाले करणे तालीक घेऊन असेल इनामदारास परतोन देणे दर हर साल खुर्द खताचा उजूर न कीजे मोर्तब*