पत्रांक ३८४
श्री १७१५
दाभाडे तळेगांवकर.
यशवंतराव दाभाडे सकलगुणा गंगाजळनिर्मळ मातुश्री लक्ष्मीबाई दाभाडे यास.
स्नेहपूर्वक विनंति.
देहूकर.
हरिभक्तपरायेण राजश्री खंडोबा गोसावी संस्थान देहू यांसी.
स्नेहपूर्वक दवलतराव सिंदे दंडवत विनंत उपरी.
रास्ते.
राजश्री आनंदरावजी रास्ते गो।।. छ सकलगुणा दंडवत विनंति उपरी लिहित जावें.
श्रीमंतांचे हातची चिटीचें उत्तर.
सेवेसी विनंति सेवक दौलतराव सिंदे कृतानेक विज्ञापना ता। छ पर्यंत स्वामीच्या कृपावलोकनें यथास्थित असे. विशेष मा। पत्रांतील जमेस धरून उधार लिहावा. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
श्रीरामदासवावा गुरूजी यांस पत्र.
श्री सचिदानंद परब्रम्हमूर्ति श्रीबावाजीचरणसेवेसी दासानुदास चरणराज दौलतराव सिंदे चरणीं मस्तक ठेऊन सां दंडवत विज्ञापना ता। छ पर्यत श्रीकृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
सुमंत
गंगाजलनिर्मळ मातुश्री गोपिकाबाई यांस स्नेहपूर्वक दंडवत विनंति.
सुरापूरचे बेरडास.
राजश्री व्यंकट आपा नाईक बहिरी महादर, संस्थान सुरापूर गोसावी यांसी:-
छ अखंडित-लक्ष्मी विनंति उपरी.
मे।। हिरु व बाढण पेंढारी यास सु।।
बीडकर.
१ सखाराम कृष्ण पासटे यांस अखंडित सु।। सन.
१ रामाजी अनंत व सखोरुद्र गो। विनंति.
श्री
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी
विनंति सेवक दौलतराव सिंदे, पुढें हातचिटी प्रें।।
.
श्रीमंत राजश्री पंतप्रतिनिधि स्वामीचे सेवेसीः-
सेवक दौलतराव सिंदे कृतानेक विज्ञापना तार छ पावेतों यथा.
स्थित असे विशेष.
गुरु ली बीडकर.
श्री श्री श्री परब्रह्ममूर्ति श्री श्री श्री हबीबासाहेबाचे चरण-कमल सेवेसी. दासानुदास दौलतराव सिंदे कृतानेक सां।। दंडवत विज्ञापना छ पावेतों श्री-कृपावलोकनें करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे.
खा। पत्र कादर साहेबाचे नावें.
सालीक मसालीक हकीकत जाहीज-मजाहीज मारफत श्रीकादरसाहेब ज्यात-कदरहू
आर्जदास्त बंदगी विनंति येथील कुशल,
सकल-गुणाचे
१ चंद्रोजी भोसले सेनासाहेब मुभा १ राजश्री गोविंदराव गाइकवाड
गो। लेखन करीत असावें. सेना-खासखेल समसेर बाहादूर गो।.
१ मानाजी आंगरे कुलाबकर वजारत १ राजे खेमसांवत भोसले बाहादर
-माब-सरखेल गो। सरदेसाई प्रांत कुडाळ वगैरे महाला निहाय.
१ नीलकंठराव पुरंदरे.
यांत भोसले नागपुरवाले यांस मात्र लेखन करीत असावें, आण वरकडांसे लिहीत जावें.