लेखांक ११ १५६८ आश्विन शुध्द
तालीक
अज दिवाण ठाणे प॥ सुपे त॥ ------------------------------------ देसमुखानि प॥ म॥ मोकदमानि मौजे + + + मजकूर सु॥ सबा अर्बैन अलफ त॥ बापदेभट बिन लक्षमीधरभट जोसी क॥ म॥ इळतमेसी केली जे मगळमूर्ती गोसावी सौ। मोरेस्वर यासि इनाम जमीन चावर व सालीना होन ५ पाच आहे दर सवाद बित॥
जमीन चावर एक दर सालीना सादिलवार
सवाद मौजे आबी बु॥ नि॥ रया प॥ म॥
कुलबाब कुलकानू पटिया देसमुखी प॥ समधे
सहित चावर गजशराइणी घ्यावे होनु ५
प्रा। चावर १
एणेप्रमाणे आहे याचे भोगवटेचे कागदपत्र कुल आहेत गोसावी आणि आपण गुरुभाऊ यानिमित गोसावी वाराणसीस जाता सदरहू इनामती कागदपत्रसहित धर्मार्तबुधी देउनु आपण वाराणसीस गेले तरी आपणासी सदरहू इनामचे मिसेली पाहिजे ह्मणउनु बयानवार मालूम केले तरी बराये मालूमाती खातीरेसी आणउनु सदरहू इनामती गोसावियानी जोसियासि दिधले सही खातीरेसी आणउनु इनामती जोसीम॥चे दुबाळा केले असे दुबाळा कीजे तालीक घेउनु असेली परतोनु दीजे
तेरीख १ रमजान
माहे रमजान