पत्रांक ३८६
श्री. १७१६ माघ शुद्ध ३
राजश्रीयाविराजित राजमान्य राजश्री परशराम रामचंद्र स्वामी गोसावी यांसी:---
पोष्य माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहित जाणें. विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री नारायणाचार्य व शामाचार्य यांणीं हुजूर विदित केलें कीं, मौजे मांगलें, ता। सातवें. प्रां पनाळा, हा गांव दरोबस्त इनाम आपले वडील माधवाचार्यप्रभृति यांस श्रीमंत कैलासवासी राजाराम साहेब यांणी देऊन पत्रें करून दिल्हीं. त्यास, पांचजण भाऊ. त्यांपै।। कृष्णाचार्य यांचे नातू गोपाळाचार्य ह्मणों लागले कीं, गांव आपल्यासच दिल्हा. सबब त्याचा व आमचा कलह नऊ वर्षे लागला. त्याची पंचाइत सरकारांत होऊन, गोपाळाचार्य खोटे जाहाले. तेव्हां, पांचहजार एक रुपया आह्मां जवळोन हरकी घेऊन गांव पांच जणाकडे चालवावयाविशीं सरकारचीं पत्रें दिल्हीं. त्यास, आपण कष्टमेहनत केली. याजकरितां वांटणींखेरीज दर असामिनीं सालदरसाल शंभर रुपये प्रों चारशें आह्मांस चौघां भावांनी राजश्री माधवराव गंगाधर यांचे विद्यमानें द्यावयाचा करार करून, पत्रें करून दिल्हीं. त्याप्रों चालत असतां, अलीकडे चार रुपये द्यावयास दिकत करतात. येविशींची ताकीद जाली पाहिजे ह्मणून. त्याजवरून हें पत्र लिहिलें असे. तरी यांचे भावाबंदांनी दरसाल रुपये चारशें देत जावे ह्मणोन पत्रें करून दिल्हीं आहेत. त्याप्रों चालवावयास दिकत करीत असल्यास ताकीद करणें. जाणिजे. छ १ रजब, सु।। खमस तिसैन मया व अल्लफ बहुत काय लिहिणे ? हें विनंती.