पत्रांक ३८९
श्री नकल. १७१७ आश्विन शु. ३.
राजश्री रघोजी भौंसले सेनासाहेब सुभा गोसावी यासीः-
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। माधवराव नारायण प्रधान आशीर्वाद विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष संस्थान गढेमंडलें, खेरीज चौरागड करून, रेवादक्षणतीरचे महालपैकीं बितपशील.
१ पा। बांचई.
१ पा बिछिया तालुके दोन.
१ पा बरगी तालुके आठ.
१ पा। भवरगड तालुके तीन.
१ पा। रायपूर चौरागड ता। सात.
१ पा। खांडेबान्हे तालुके नव.
१ पा। पलाहो.
१ पा। देवरघा.
१ पा। मकुंदपूर.
१ पा। संभलपूर.
१ पा। रामगड.
१ पा। कटोटिया.
------
१२
एकूण माहाल बारा पैकीं च्यार लक्ष बेरजेचे माहाल आपलेकडे द्यावयाविशीं राजश्री बाळाजी गोविंद यांसी अलाहिदा सनद सादर केली असे. तरीं ते माहाल लाऊन देतील ते घ्यावें. सदरहू माहालपैकीं ज्या माहालीं सरकारी अंमल बनला नसेल, तेथें आपण अंमल बसवून द्यावयाचा करार केला आहे. त्याद्यमाणे अंमल बसवून देऊन, आपलेबराबर बापूजी लक्ष्मण कारकून दिल्हे आहेत त्याचे हवालीं करून द्यावें. दिक्कत पडूं नये. रा। छ १ माहे रा।खर, सुहुरसन सीत तीसैन मया व अल्लफ बहुत काय लिहिणें ? लोभ आसों दीजे. हे विनंती.